पोषण- जीवनाची मूलभूत गरज : राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे महत्त्व
पोषण- जीवनाची मूलभूत गरज : राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे महत्त्व
मानवी जीवनात पोषक तत्त्वांचे महत्व, अन्य साधारण आहे कारण आरोग्य हीच खरी संपती आहे. हे आरोग्य चांगले ठेवण्या साठी उत्तम सकस आहार घेणे अतीशय महत्त्वाचे आहे . त्यामुळे भारतीय लोकांमध्ये पोषक तत्वा विषय आणि आरोग्या विषय जागरुकता निर्माण करण्यासाठी पोषण सप्ताह साजरा करण्यात येतो. आजच्या धाव पडीच्या युगात बरेच लोक आपल्या आहारा बाबत खूप बेफिकीर झाले आहेत. आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. भारतातील बहुतेक लोकांचे अन्न हे पौष्टिकतेच्या दृष्टीने अपुरे आहे, केवळ भूक भागवण्यासाठी अन्न खाल्ले जात नाही, जर का याभावनेने अन्न खाण्यात आले तर मनुष्याला असले अन्न जिवंत ठेवण्यासाठी पुरेसे आहे. केवळ अपुऱ्या अन्नाद्वारे शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या आपण निरोगी राहू शकत नाही. देशातील उच्च बालमृत्यू दर, रोगांचे उच्च प्रमाण, कुपोषणाची उच्च टक्केवारी, कुपोषणामुळे होणारे आजार आणि साक्षरतेचे कमी प्रमाण या भेडसावणाऱ्या समस्या आहेत. आरोग्य आणि आहाराबाबत जगरुकता निर्माण करण्याकरीता भारत सरकार तर्फे दरवर्षी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो.दरवर्षी त्यासाठी एक थीम ही ठरवळली जाते. राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२४ ची थीम ‘प्रत्येकासाठी पोषक आहार’ ही आहे.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा संक्षिप्त इतिहास
अमेरिकन डायटेटिक असोसिशन् (ADA) ने मार्च १९७५ मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरु केला. आता अमेरिकन डायटेटिक असोसिशन् ही पोषण आणि आहार विज्ञान अकॅडमी मन्हून ओळखली जाते. लोकांना त्यांच्या आहार आणि आरोग्या विषयी जागरूकता निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता. सन १९८० पर्यंत या मोहिमेला लोकांचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की तो एका आठवड्या ऐवजी संपूर्ण महिनाभर साजरा केला गेला. सर्वप्रथम पोषण सप्ताह अमेरिकेमध्ये सुरू करण्यात आला होता. तिथे या उपक्रमात आरोग्या संबंधी बरीच जनजागृती करण्यात देखील आली. जीवनसत्वे , प्रथीने , इत्यादी पोषण तत्वांचा निरोगी आरोग्यासाठी किती चांगला वापर होतो हे दाखवून देण्यात आले. त्यामुळे पोषण सप्ताहाला अमेरिकेमध्ये खूप छान प्रतिसाद मिळाला . यानंतर , १९८२ मध्ये, भारत सरकारने लोकांना पोषणा विषयी जागरूक करणे आणि त्यांना निरोगी जीवनशैली साठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पोषण सप्ताह भारता मध्ये सुरु केला गेला .
भारतातील पोषण संबंधित आव्हाने
असे मानतात की आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे, हे स्पष्ट करण्यासाठी, भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे (Ministry of Women And child Development) अन्न आणि पोषण मंडळ दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे आयोजन करते. या दरम्यान लोकांना त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा “समावेश करण्यासाठी जागरुक केले जाते ,ज्याद्वारे त्यांच्या शरीराचे पोषण होऊ शकते, रोगप्रतिकार शक्ती वाढविता येते आणि शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवता येते .
संयुक्त राष्ट्रांनी २०२० मध्ये केलेल्या सर्वेनुसार असे आढळून आले की भारतामध्ये १८९ दशलक्ष लोक हे कुपोषित आहेत. म्हणजेच संपूर्ण लोकसंखेच्या १४ टक्के बालके ही कमी वजनाची आहेत , त्यांचे वजन शरीरयष्टी च्या मानाने अगदी कमी आहे. तसेच ३४ टक्के बालके ही जी ५ वयो मर्यादे पेक्षा लहान आहे त्यांची उंची ही खुंटलेली आहे. यावरून असे, लक्षात येते की भारतातील लोकांच्या आहारातील पोषण स्तर खुप मोठ्या प्रमाणात घटला आहे तर हा स्तर वाढविण्यासाठी आणि लोकांमध्ये पोषणा बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (NFHS) नुसार मुलांच्या पोषणाचा आढावा घेतल्यास असे आढळून येते की,बाल पोषण निर्देशक अखिल भारतीय स्तरावर थोडीशी सुधारणा आहे .अखिल भारतीय स्तरावर स्टंटिंग चे प्रमाण हे ३८ % वरून ३६ % पर्यंत घसरले आहे आणि कमी वजन श्रेणी चे प्रमाण ३६ % वरून ३२ % झाले आहे . राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाल पोषणाच्या संदर्भात परिस्थिती सुधारली आहे परंतु बदल लक्षणीय नाही कारण या निर्देशकांच्या संदर्भात कमी कालावधीत तीव्र बदल होण्याची शक्यता देखील नाही.जास्त वजन असलेल्या मुलांचा वाटा २.१ % वरून ३.४ % पर्यंत वाढला आहे. लोहाची कमतरता , अशक्तपणा ही जगातील सर्वात सामान्य पोषण समस्या आहे. जगभरातील अंदाजे २ अब्ज लोकसंख्या या समस्येने प्रभावित आहे . विकसनशील देशांमध्ये अशक्तपणा गरिबी, अपुरा आहार, काही आजार आणि आरोग्य सेवेचा अभाव यामुळे हे प्रमाण जास्त आहे.ॲनिमिया ची स्थिती बघता असे लक्षात येते ५ वर्षांखालील मुलांमध्ये (५८.६ ते ६७ %), महिला (५३.१ ते ५७ %) आणि पुरुष (२२.७ ते २५ %) मध्ये ॲनिमियाचे प्रमाण वाढले आहे. भारतातील राज्यांमध्ये २० % -४० % प्रमाण हे साधरणा मानल्या जाते . भारता मध्ये केरळ वगळता (३९.४ %) इतर सर्व राज्ये “गंभीर” श्रेणीत आहेत.
अनारोग्यकारक आहार पद्धतींचा होणारा परिणाम
सर्वोच्च आरोग्य संशोधन संस्थेच्या अंतर्गत कार्यरत हैद्राबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थे च्या अहवालानुसार भारतातील अंदाजे ५६.४ % आजार हे अनारोग्य आहाराच्या सवयीं मुळे आहेत . संस्था ठळकपणे सांगते की निरोगी आणि पौष्टिक आहार पद्धती राखणे आणि नियमित शारीरिक हालचाली केल्याने कोरोनरी हृदयरोग (CHD ) , उच्च रक्तदाब (उच्च रक्तदाब) आणि टाइप २ मधुमेहाचा धोका ८० % पर्यंत कमी होतो. त्यांनी प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा जास्त वापर, ज्यात साखर आणि मीठ जास्त असते, तसेच कमी शारीरिक हालचालींमुळे भारतीयांमध्ये सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता आणि जास्त वजनाच्या समस्या निर्माण होतात.भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालया तर्फे अन्न आणि पोषण समिती कडून सुरू करण्यात आलेला हा पोषण सप्ताह योग्य पोषण तत्त्वे आणि त्याचे कार्य यावर प्रकाश टाकततो . सध्या भारतामध्ये कितीतरी कुपोषित बालके आहेत आणि त्यांना आपले आरोग्य सुधारण्याची नितांत गरज आहे.तर अशा मुलांसाठी किवा बालकांसाठी पोषण आहाराचे महत्व समजावून सांगणे खूप गरजेचे आहे.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या माध्यमातून पोषण जागरूकता
या संपूर्ण सप्ताहास पोषण आहाराचे मूल्य जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण, कार्यक्रम,जनजागृती शिबिरे आणि समुदायीक बैठका इत्यादि उपक्रम राबविले जातात. आपल्या देशातील चार विविध प्रदेशांमध्ये अन्न आणि पोषण समित ने आखलेल्या कम्युनिटी फूड अँड एक्सटेन्शन यूनिट नूसार हा उपक्रम राबवण्यात येतो.या पोषण सप्ताहात रोगप्रतिकार क्षमता त्यांचे महत्त्व, संतान आणि स्वच्छतेचे तत्व, अन्न बनवताना पोषण तत्त्वांचे केले जाणारे जतन अशा अनेक बाबीवर प्रकाश टाकून माहीती दिली जाते .भारतीयांसाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) ने १७ नवीन ICMR आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत
१ ) संतुलित आहार सुनिश्चित करण्यासाठी पौष्टिक आणि विविध पदार्थ खा.
२ )गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करवण्याच्या काळात अतिरिक्त आहार आणि आरोग्य सेवा प्रदान करणे सुनिश्चित करा.
३ )पहिले सहा महिने अनन्य स्तनपानाला प्रोत्साहन द्या आणि दोन वर्षांपर्यंत आणि त्यापुढील स्तनपान चालू ठेवा.
४ )सहा महिन्यांच्या वयानंतर लगेचच लहान मुलांना घरगुती अर्ध-घन पूरक आहार द्या.
५ ) मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी पुरेसा आणि योग्य आहार द्या ज्यामुळे वाढीस चालना द्या आणि आजारपणात बरे होण्यास मदत करा.
६ )भरपूर भाज्या आणि शेंगा खा.
७ )तेल/चरबी वापरा; चरबी आणि अत्यावश्यक फॅटी ऍसिडस् (EFA) च्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तेलबिया, नट, पोषक तृणधान्ये आणि शेंगांची श्रेणी निवडा.
८ )चांगल्या दर्जाची प्रथिने आणि अत्यावश्यक अमीनो ऍसिड (EAA) पदार्थांच्या योग्य मिश्रणातून मिळवा आणि मांसपेशी वाढवण्यासाठी प्रथिने पूरक आहार टाळा.
९ ) ओटीपोटात जादा चरबी, जास्त वजन आणि लठ्ठपणा निर्माण होण्याचा धोका टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली जगा.
१० ) चांगले आरोग्य राखण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा आणि नियमित व्यायाम करा.
११ ) मीठाचे सेवन आणि उच्च प्रक्रिया केलेले पदार्थ मर्यादित करा.
१२ ) सुरक्षित आणि स्वच्छ पदार्थांचे सेवन करा.
१३ ) योग्य पूर्व-स्वयंपाक आणि स्वयंपाक पद्धतींचा अवलंब करा
१४ ) पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
१५ ) जास्त चरबीयुक्त, साखर, मीठ (HFSS) आणि अल्ट्रा-प्रक्रिया केलेले पदार्थ (UPFs) यांचा वापर कमी करा.
१६ ) आरोग्य आणि निरोगीपणासाठी वृद्ध प्रौढांच्या आहारात पौष्टिक समृध्द पदार्थांचा समावेश करा.
१७ ) माहितीपूर्ण आणि निरोगी अन्न निवड करण्यासाठी अन्न लेबलवरील माहिती वाचा.
मानवी जीवनात पोषणाचे महत्त्व
अन्नातून बरेच जीवनसत्त्व, प्रथिने, लोह आणि मिनरल इत्यादी घटक जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि उत्तम संगोपनासाठी आवश्यक आहेत ते मिळत असतात. त्यामुळे आपण जो काही आहार घेत असतो त्या मधून मिळणाऱ्या पोषण तत्वाकडे दुर्लक्ष केले तर आहारा संबंधीचे बरेच रोग आपल्याला उद्भवू शकतात.
आपल्या शरीरात योग्य पोषनाद्वारे शक्ती निर्माण होते.शरीराच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक पोषक घटक आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: बालपणात पोषक आहार हा अतिशय महत्त्वाचा असतो.
निरनिराळ्या साथीच्या रोगापासून आपला बचाव योग्य पोषणाद्वारे होतो. पोषक घटकांचे योग्य सेवन केल्याने शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे आरोग्याला धोका कमी होतो.
योग्य पोषनाद्वारे, संतुलित आहारा द्वारे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते.
सकस आहार ग्रहण केल्याने आपले मन सुद्धा प्रसन्न आणि सकारात्मक रहाते . योग्य पोषण मानसिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. उदाहरणार्थ, डिप्रेशन आणि चिंता कमी होते
योग्य पोषणामुळे आपले आरोग्य चांगले राहून वयो मर्यादा वाढते.
तसेच योग्य संतुलित आहारातून मिळणा-या घटकामुळे आपली एकाग्रता देखील वाढते.
आहारातील पोषण मूल्यांच्या अभावामुळे उपोषण होते, त्यामुळे शरीर यष्टीवर बाहेरून आणि आतमधून खोलवर गंभीर परिणाम होतात. आपल्याला मानवी जीवनात पोषणाचे महत्व तर संजलेच सोबत आपण कुपोषण काय आहे हेही आपण थोडक्यात पाहुया !
कुपोषण
आहारातील पोषण मूल्यांच्या कमतरते मुळे शरीराची शारिरीक वाढ न होण्याच्या अवस्थेला कुपोषण असे म्हणतात कुपोषणाची काही लक्षणे खालील प्रमाणे बघावयास मिळते
> कुपोषणा मुळे वाढ मंदावते.
> वयानुसार योग्य वाढ न होणे.
> उंचीच्या प्रमाणात वजन कमी असणे.
> भूक मंदावणे किंवा खाण्यातील रस निघून जाने.
> थकवा जाणवणे.
> नेहमी थंडी वाजणे.
> अंगातील मेद वायू उती यांची संख्या कमी होणे.
> त्वचा कोरडी, रुक्ष आणि पिवळसर होणे.
> केस आणि नाखून कमकुवत होणे.
> सतत आजारी पडणे.
कुपोषणा पासून बचाव करण्यासाठी आपण आपले शरीर निरोगी राहिले पाहिजे.
राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विविध कार्यक्रम ग्रामपंचायत, तालुका स्तरावर राबविणे महत्वाचे ठरते.
परसबाग -प्रत्येक शाळे मध्ये परस बागेचे फायदे या विषयाबाबत विद्यार्थ्यांच्या माहिती साठी सत्र आयोजित करणे व ज्या ठिकाणी परसबागेसाठी जागेची उपलब्धता आहे तिथे जास्तीत जास्त परसबाग करण्यावर भर देणे. पालेभाज्या, पपई, पेरू यांसारखी फळे वाढवण्यासाठी सामुदायिक किचन गार्डन्स किंवा वैयक्तिक किचन गार्डन्सना निर्माण करणेअशा कृती ना प्रोत्साहन दिल्यास समाजाला पुरेशा प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते .
विविध स्पर्धा – शाळा/ ग्रामपंचायत/ जिल्हा स्तरावर विभिन वयोगटातील लोकांमध्ये स्पर्धा राबवून पोषण आहाराचे तसेच पोषण मूल्यचेही महत्त्व पटवून देने , शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तूव स्पर्धेचे आयोजन करणे.
जनजागृती – किशोरवयीन मुला मुली मध्ये पोषणमूल्य तसेच आरोग्याविषयी जन जागृती करणे. अशक्तपणा ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे जी आरोग्याव्यतिरिक्त अभ्यास आणि कार्य क्षमता प्रभावित करते. त्यामुळे पालक आणि मुलांना माध्यमांद्वारे माहिती देऊन या समस्येची जाणीव करून दिली पाहिजे. सामान्य अन्नपदार्थांच्या जागी, लोहयुक्त अन्नपदार्थ आणि त्यांचे शोषण वाढवणारे अन्नपदार्थ सेवन करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे जेणेकरून ही आरोग्य समस्या आपल्याला शक्य तितकी कमी करता येईलचर्चा सत्र – पोषण मूल्या बाबत विविध स्तरावर चर्चा घडवून आणणे पाण्याचे महत्व- पाण्याचे महत्व रुजवणे त्याचा वापर बचत याबाबतची माहीती देणे.
अक्षय सु. ढेंगळे आचार्य पदवी विद्यार्थी कृषि विस्तार शिक्षण विभाग डॉ. पं.दे.कृ.वि अकोला
अनुज ग .राऊत आचार्य पदवी विद्यार्थी कृषि विस्तार शिक्षण विभाग डॉ. पं.दे.कृ.वि अकोला
श्रीकांत शे.पाटील आचार्य पदवी विद्यार्थी कृषि विस्तार शिक्षण विभाग डॉ. पं.दे.कृ.वि अकोला
Importance of Artificial Intelligence in Agriculture
https://krushigyan.com/imp-of-artificial-intelligence-in-agri/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा