बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

शेती म्हणजे केवळ व्यवसाय नव्हे, तर ती आपल्या मातीशी असलेली नाळ आहे. या नाळीचा पाया असतो — बियाणं! हे बियाणं म्हणजे शेतकऱ्याच्या स्वप्नांचं बीज, त्याच्या कष्टांचं भविष्य.

शेतकरी जेव्हा शेतात पेरणी करतो, तेव्हा त्याला एका छोट्या दाण्यावर अपार विश्वास ठेवावा लागतो. पण जर तेच बियाणं भेसळयुक्त, जुने किंवा फसवे निघाले, तर मेहनत, वेळ आणि पैसा सगळं वाया जातं.

आजच्या बाजारात माहितीच्या अभावामुळे अनेक शेतकरी चुकीच्या बियाण्याच्या फसवणुकीला बळी पडतात. म्हणूनच, या लेखात आपण बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, काय तपासावं, कायदेशीर हक्क काय आहेत — याची सविस्तर आणि शेतकऱ्याच्या भाषेत मांडणी केली आहे.

हा लेख म्हणजे शेतकऱ्याच्या मेहनतीचं रक्षण करणारा एक छोटा पण महत्त्वाचा टप्पा आहे.

🌱 बियाण्याचे प्रमुख प्रकार व त्यांचे विश्लेषण

प्रकार वैशिष्ट्ये फायदे तोटे शेतकऱ्याला प्रत्यक्षात काय दिलं जातं?
१. देशी बियाणे (Desi / Indigenous Seeds) पारंपरिक वाण. शेतकरी स्वतः जतन करून पुढील हंगामात वापरतो. स्थानिक हवामानास सुसंगत, रोगप्रतिरोधक, कमी खर्च उत्पादन तुलनेने कमी कमी प्रमाणात वापरले जाते; आजकाल फारच थोडे शेतकरी वापरतात.
२. संकरित बियाणे (Hybrid Seeds) दोन भिन्न वाणांची संकर करून तयार केलेली उंचउत्पादीत बियाणे. उत्पादन अधिक, बाजारपेठेत लोकप्रिय पुन्हा वापरता येत नाही, दरवर्षी नवीन विकत घ्यावे लागते सध्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वाधिक प्रमाणात हाच प्रकार दिला जातो.
३. प्रमाणित बियाणे (Certified Seeds) अधिकृत संस्था (उदा. MAHA-BEEJ, NSC) यांनी तपासणी व गुणवत्ता प्रमाणपत्र दिलेले बियाणे. अंकुरण क्षमता, शुद्धता व गुणवत्ता हमीसह किंमत थोडी जास्त सरकारी योजनांतून किंवा अधिकृत विक्रेत्यांमार्फत हे बियाणे दिले जाते.
४. टी.एल. बियाणे (Truthfully Labelled Seeds) कंपनी स्वतः गुणवत्ता तपासून विकते, परंतु सरकारी प्रमाणपत्र नसते. क्वचित चांगले असते, सहज उपलब्ध दर्जाबाबत खात्री नाही, फसवणूक शक्य बहुतांश दुकानांतून, खासगी एजंटकडून शेतकऱ्यांना हेच सर्वसामान्यपणे दिले जाते.
५. जी.एम. बियाणे (Genetically Modified) जनुकीय सुधारणा केलेले बियाणे (जसे BT कापूस) विशिष्ट कीड प्रतिकार, अधिक उत्पादन नैसर्गिकता नाही, साठवण व परत वापर वर्ज्य केवळ कापूस (BT Cotton) मध्ये अधिकृतपणे वापरले जाते. इतर पिकांसाठी भारतात अनुमती नाही.

बियाणं कुठून घ्यावं?

  • शासकीय विक्री केंद्र (MAHA-BEEJ, NSC, आदि)

  • सुपरव्हायझर किंवा अधिकृत एजंटकडून

  • कंपनी प्रतिनिधी / विक्रेता दुकान

  • कृषी प्रदर्शन, कृषी सहायक कार्यालय इ.

बिल घ्यावं. थैलीचा फोटो व व्हिडीओ काढून ठेवावा.

३. बियाण्याच्या थैलीवर तपासायच्या गोष्टी

थैलीवर ही माहिती असणे आवश्यक आहे आणि ती व्यवस्थित वाचूनच बियाणं घ्यावं:

  • बियाण्याचे नाव व वाण

  • उत्पादन व वापरायची शेवटची तारीख

  • अंकुरण दर (%)

  • स्वच्छता टक्का

  • आर्द्रता टक्का

  • लॉट क्रमांक / बॅच नंबर

  • विक्रेता व निर्माता कंपनीचे नाव

  • T/L किंवा Certified चा स्पष्ट उल्लेख

  • वजन व किंमत

  • लेबलवर “नमुन्याकरता नाही” असलेलं बियाणं घेऊ नका

 बियाण्याचे सॅम्पल कसे काढावे?

  1. थैली उघडण्यापूर्वी फोटो-व्हिडीओ घ्या.

  2. बियाणं मिसळून 3 सॅम्पल घ्या (100 ग्रॅम तरी ठेवावं).

  3. एक स्वतःजवळ, एक विक्रेत्याजवळ, एक कृषी अधिकारी किंवा पंचनामा करणाऱ्याजवळ.

  4. सॅम्पलवर बॅच नंबर, तारीख, वेळ लिहून ठेवा.

  5. साठवताना हवाबंद व पाणीरोधक पिशवीत ठेवा.

जर बियाणं फेल गेलं, तर काय करावं?

पुढील टप्पे पाळावेत:

  1. शेतातील उगम कमी किंवा उगवणी नाही याचा फोटो/व्हिडीओ घ्या

  2. तत्काळ पंचनामा मागा — तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच यांच्या उपस्थितीत

  3. जिल्हा कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयात लेखी तक्रार द्या

  4. सर्व कागदपत्रं जोडा:

    • बियाण्याचा फोटो

    • बिल / पावती

    • शेतातील अवस्थेचे फोटो

    • पंचनामा

तक्रारीवर 15 दिवसांत कारवाई नाही झाल्यास कृषी आयुक्त कार्यालयात अपील करा.

कोणत्या कायद्यांतर्गत तक्रार करता येते?

बियाणे अधिनियम 1966 (The Seeds Act, 1966)

या कायद्यांतर्गत चुकीच्या वाणाची विक्री, चुकीचा अंकुरण दर, भ्रामक माहिती यावर कारवाई करता येते. शिक्षेस पात्र आहेत:

  • विक्रेता

  • वितरक

  • कंपनी प्रतिनिधी

बियाणे नियम 1968 (Seeds Rules, 1968)

बियाण्याच्या लेबलिंग व तपासणीची पद्धत यामध्ये स्पष्ट केली आहे.

ग्राहक संरक्षण कायदा 2019

शेतकरी “ग्राहक” या हिशोबाने कंपनीविरोधात फौजदारी तक्रार करू शकतो. यामध्ये नुकसानभरपाई, दंड व तातडीची मदत मिळवता येते.

हे सुध्धा वाचा…

बीज प्रक्रिया का ठरते पिकांन साठी वरदान ? हे आहेत फायदे आणि पद्धत

https://krushigyan.com/methods-and-bensfits-of-seed-treatme

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *