शेतीच्या बांधावरच करा असरदार नैसर्गिक कीटकनाशक – दशपर्णी अर्क

शेतीच्या बांधावरच करा असरदार नैसर्गिक कीटकनाशक –  दशपर्णी अर्क

शेतीच्या बांधावरच करा असरदार नैसर्गिक कीटकनाशक – दशपर्णी अर्क

नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सौरव विलास गायकवाड कृषी पदवीधर आज आपल्यासाठी नैसर्गिक कीटकनाशक कश्याप्रकारे घरच्या घरी तयार करू शकतो या वर लेख घेऊन आलो आहे. तर आज मी तुम्हाला दशपर्णी अर्क बद्दल माहिती देणार आहे.

दशपर्णी अर्क या शब्दाचा अर्थ असा होतॊ कि ‘दशा’ म्हणजे ‘दहा ’ आणि ‘पर्णी’ म्हणजे वनस्पती किंवा झाडाची पाने. ‘अर्क’ या शब्दाचा अर्थ म्हणजे रस काढणे असा होय.

हे एक नैसर्गिक कीटकनाशक आहे, जे कोणत्याही पिकावर आणि भाजीपाला किंवा फळझाडांवर वापरले जाऊ शकते. विशिष्ट सुगंधामुळे कीटक वनस्पतींकडे आकर्षित होतात, दशपर्णी अर्कच्या उग्र आणि दुर्गंधीमुळे ते वनस्पतींपासून दूर राहतात आणि त्याद्वारे वनस्पतींचे संरक्षण केले जाऊ शकते. दशपर्णी अर्क अगदी थोड्या काळात शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर तयार करू शकतो आणि याला फार खर्च सुद्धा लागत नाही.

दशपर्णी अर्क तयार करण्या साठी लागणारे साहित्य

दशपर्णी अर्क तयार करण्या साठी एकूण १० झाडांचा पाला लागतो खालील प्रमाणे
१. कडूलिंबाचा पाला २. करंजाची पाने ३. सीताफळाची पाने ४. एरंडाची पाने ५. बेलाची पाने ६. टनटनीची पाने ७. पपईची पाने ८. रुईचे पाने ९. निर्गुडीची पाने १०. गुळवेलाची पाने
वरील सर्व १० वनस्पतीची पाने प्रत्येकी २ किलो या प्रमाणात घ्यावी.

वरील पैकी झाडांची पाने उपलबध न झाल्यास खालील पर्यायी पानांचा सुद्धा वापर करू शकता.
१. तुळशीचे पाने २. पेरूची पानें ३. आंब्याची पाने ४. पळसाची सापाने ५. कारल्याची पाने ६. चिंचेची पाने ७. मोहाची पाने ८. बाभुळाची पाने ९. शेवग्याची पाने

दशपर्णी अर्क तयार करतांना गुळवेल , कडुलिंब , सीताफळ , करंज या चार झाडांची पाने समाविष्ट करणे आवश्यक आहे.

दशपर्णी अर्क तयार करतांना झाडांच्या पानांन सोबत इतर साहित्य सुद्धा लागते जसे कि
१. २०० लिटर पाणी २. देशी गाईचे शेण २ किलो ३. गुमुत्र १० लिटर

चांगल्या परिणामासाठी शक्य असल्यास हे सुद्धा वापर :-
१. हळद पावडर २५० ग्राम
२. आले चटणी ५०० ग्राम
३. तंभाखु १००० ग्राम

दशपर्णी अर्क तयार करण्याची कृती :-

सर्व प्रथम २०० लिटर पाण्यामध्ये देशी गाईचे शेण व गोमूत्र टाकून चांगल्या प्रकारे घडाळीच्या काट्याच्या दिशेने ढवळून घ्यावे. त्यांनतर उपलब्ध असल्यास त्यामध्ये तंबाखू , आले चटणी आणि हळद पावडर टाकून मिश्रण व्यवस्तीत ढवळून घ्यावे. २४ तासा पर्यंत हे मिश्रण सावलीत झाकून ठेवावे. २४ तसा नंतर या मिश्रणा मध्ये १० प्रकारच्या वनस्पतींचा पाला चेचून या द्रावणात टाकावा आणि ढवळून घ्यावे. हे मिश्रण ४५ ते ५० दिवस आंबवत ठेवावे.
५० दिवसा नंतर द्रावण व्यवस्तीत ढवळून वस्त्र गाळ करून घ्यावे . गाळून घेतलेला अर्क ६ महिन्या पर्यंत साठवून ठेऊ शकतो आणि तेचा कीटक नाशक म्हणून वापर करू शकतो.

दशपर्णी अर्क वापरण्याचे फायदे :

१. सर्व पिकांवर हा अर्क प्रभावी असल्याने रासायनिक कीटकनाशकांवर वेगळा खर्च करावा लागत नाही.
२. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाल्याने पिकावर कीटकनाशकांचे अंश राहत नाहीत.
३. दशपर्णी अर्क फवारणी मुळे लहान अळ्या , रसशोषक कीड , किडींची अंडी अस्वस्थेचे निर्मूलन होते.
४. उग्र वासामुळे किडी पिकामध्ये अंडी देत नाही.
५. मित्र किडीचे संवर्धन होऊन नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होण्यास चालना मिळते.
६. पर्यावणपूरक कीड नियंत्रण झाल्याने विषमुक्त भाजी पाला उत्पादित होतो व शेती मालास सेंद्रिय म्हणून उत्तम दरही मिळू शकतो.

दशपर्णी अर्क वापरण्याचे प्रमाण :-

अर्धा लिटर अर्क प्रती पंप (१६ लिटर पाणी)

 

हे सुध्धा वाचा

असे करा धान्य साठवणुकीचे व्यवस्थापन

https://krushigyan.com/safe-grain-storage-management/

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://krushigyan.com/whatsapp-group/

Ajay

Ajay

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *