हवेची गुणवत्ता सुधारणारी झाडं – तुमच्या घरासाठी १० उत्तम पर्याय

हवेची गुणवत्ता सुधारणारी झाडं – तुमच्या घरासाठी १० उत्तम पर्याय

शहरी घरातील हिरवळ: इंडोर, बाल्कनी आणि शेड-लव्हिंग प्लांट्ससाठी मार्गदर्शक

आजच्या शहरी जीवनात, निसर्गाशी जोडले जाणे म्हणजे मनाला शांती आणि पर्यावरणाला आधार देण्याचा एक सुंदर मार्ग आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट्समध्ये राहणाऱ्यांसाठी इंडोर गार्डनिंग, बाल्कनी गार्डनिंग आणि टेरेस गार्डनिंग ही लोकप्रिय आणि आनंददायी गोष्ट बनली आहे. घरात झाडे लावण्यामागे सौंदर्याबरोबरच शास्त्रीय फायदेही आहेत. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडतात, हवेचे प्रदूषण कमी करतात आणि मानसिक ताण कमी करतात. संशोधनानुसार, इंडोर प्लांट्स हवेची गुणवत्ता सुधारतात, आर्द्रता नियंत्रित ठेवतात आणि एकाग्रता वाढवतात. बाल्कनी आणि शेड-लव्हिंग प्लांट्स शहरी उष्णता कमी करून घर थंड ठेवण्यास मदत करतात.
या लेखात आपण इंडोर आणि बाल्कनीसाठी योग्य शेड-लव्हिंग प्लांट्स, त्यांचे शास्त्रीय फायदे, काळजी आणि वाढीसाठी लागणारे माध्यम याबद्दल जाणून घेऊ. तसेच, शहरी लोकांच्या एका सामान्य समस्येवरही प्रकाश टाकू.

शहरी गार्डनिंगचे महत्त्व

पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये जागेची कमतरता असली तरी गार्डनिंगमुळे निसर्गाशी नाते जोडता येते. झाडे हवेची गुणवत्ता सुधारतात, तापमान नियंत्रित ठेवतात आणि मानसिक आरोग्य वाढवतात.
इंडोर आणि बाल्कनी गार्डनिंगमुळे शहरी जीवनात हिरवळ येते. स्नेक प्लांट, पोथोस, पीस लिली, झझ प्लांट, फर्न, स्पायडर प्लांट, ड्रासिना, अॅलोव्हेरा, फिलोडेंड्रॉन आणि रबर प्लांट ही झाडे कमी देखभालीत घराचे सौंदर्य वाढवतात. योग्य काळजीने नर्सरीतील टवटवीतपणा टिकवता येतो. पुणे, मुंबईच्या फ्लॅट्समध्ये ही झाडे निवडणे म्हणजे पर्यावरण आणि स्वतःसाठी सुंदर पाऊल आहे.

हवेची गुणवत्ता सुधारणारी झाडं – तुमच्या घरासाठी १० उत्तम पर्याय

1. स्नेक प्लांट (Snake Plant)

शास्त्रीय नाव: Sansevieria trifasciata
लोकप्रिय नाव: मॉदर-इन-लॉज टंग
उपयुक्तता: NASAच्या संशोधनानुसार, हे रोप हवेतील हानिकारक पदार्थ जसे की बेंझीन आणि फॉर्मल्डिहाइड कमी करतं. रात्री ऑक्सिजन निर्मिती करणारं हे मोजकं झाड आहे.
देखभाल: कमी पाणी आणि प्रकाशातही टिकून राहतं. आठवड्यातून एकदाच पाणी द्यावं.
माध्यम व खत: कोकोपीट, माती व वाळू समप्रमाणात. एनपीके 10-10-10 दर महिन्याला एकदा.

2. झेडझेड प्लांट (ZZ Plant)

शास्त्रीय नाव: Zamioculcas zamiifolia
लोकप्रिय नाव: ZZ
उपयुक्तता: हे रोप हवेतील झायलिन आणि टॉल्यूनि यांसारख्या घातक घटकांना शोषून घेऊन घरातील वातावरण शुद्ध करतं.
देखभाल: अत्यल्प देखभाल आवश्यक. महिन्यातून एकदा पाणी.
माध्यम व खत: कोकोपीट आणि माती. सौम्य प्रमाणात 5-10-5 एनपीके.

3. स्पायडर प्लांट (Spider Plant)

शास्त्रीय नाव: Chlorophytum comosum
लोकप्रिय नाव: स्पायडर प्लांट
उपयुक्तता: हे रोप घरातील कार्बन मोनॉक्साइड आणि झायलिन कमी करतं. मुलांसाठी सुरक्षित आहे.
देखभाल: मध्यम प्रकाशात चांगली वाढ होते. आठवड्यातून दोनदा पाणी द्यावं.
माध्यम व खत: कोकोपीट व माती. एनपीके 10-10-10 महिन्याला एकदा.

4. अ‍ॅलोवेरा (Aloe Vera)

शास्त्रीय नाव: Aloe barbadensis miller
लोकप्रिय नाव: अ‍ॅलोवेरा
उपयुक्तता: फॉर्मल्डिहाइड शोषून घेतं आणि याचं जेल त्वचेसाठी फायदेशीर असतं.
देखभाल: मध्यम प्रकाश आणि खूप कमी पाण्याची गरज.
माध्यम व खत: वाळू व माती. हलकं एनपीके खत 10-10-10.

5. रबर प्लांट (Rubber Plant)

शास्त्रीय नाव: Ficus elastica
लोकप्रिय नाव: रबर प्लांट
उपयुक्तता: घरातली आर्द्रता वाढवतो आणि हवेमध्ये असलेली अशुद्धता कमी करतो.
देखभाल: माती कोरडी झाली कीच पाणी द्यावं. मध्यम प्रकाश योग्य.
माध्यम व खत: कोकोपीट, माती, कंपोस्ट. 10-10-10 खत दर चार आठवड्यांनी.

6. फिलोडेंड्रॉन (Philodendron)

शास्त्रीय नाव: Philodendron hederaceum
लोकप्रिय नाव: हार्ट लीफ फिलोडेंड्रॉन
उपयुक्तता: तणाव कमी करतं आणि फॉर्मल्डिहाइड कमी करतो.
देखभाल: कमी प्रकाशात चांगली वाढ. आठवड्यातून एकदाच पाणी.
माध्यम व खत: माती आणि कोकोपीट. लिक्विड खत 20-20-20 दर महिन्याला.

7. ड्रॅसीना (Dracaena)

शास्त्रीय नाव: Dracaena fragrans
लोकप्रिय नाव: कॉर्न प्लांट
उपयुक्तता: बेंझीन, फॉर्मल्डिहाइड सारखे हानिकारक वायू शोषतो.
देखभाल: कमी प्रकाश, कोरडं झाल्यावर पाणी द्यावं.
माध्यम व खत: माती, कोकोपीट आणि वाळू. 5-10-5 लिक्विड खत दर सहा आठवड्यांनी.

8. मनी प्लांट (Pothos)

शास्त्रीय नाव: Epipremnum aureum
लोकप्रिय नाव: मनी प्लांट, डेव्हिल्स आयव्ही
उपयुक्तता: हवेतील अशुद्धता काढून टाकतं आणि हिरवीगार पाने मन:शांती देतात.
देखभाल: मध्यम प्रकाश आणि आठवड्यातून एकदा पाणी. पाने स्वच्छ ठेवावीत.
माध्यम व खत: कोकोपीट, माती. एनपीके 20-20-20 महिन्यातून एकदा.

9. पीस लिली (Peace Lily)

शास्त्रीय नाव: Spathiphyllum wallisii
लोकप्रिय नाव: पीस लिली
उपयुक्तता: घरातील आर्द्रता वाढवते आणि सौंदर्यवर्धन करते. बेंझीन शोषते.
देखभाल: कमी प्रकाश. पानांवर फवारणी आवश्यक.
माध्यम व खत: कोकोपीट आणि कंपोस्ट. लिक्विड खत 10-10-10 दर सहा आठवड्यांनी.

10. बोस्टन फर्न (Fern)

शास्त्रीय नाव: Nephrolepis exaltata
लोकप्रिय नाव: बोस्टन फर्न
उपयुक्तता: घरातील हवेतील कोरडेपणा दूर करते आणि फॉर्मल्डिहाइड कमी करतं.
देखभाल: सावलीची जागा आणि ओलसर माती योग्य. पानांवर अधूनमधून फवारा.

गार्डनिंगसाठी सामान्य टिप्स

माध्यम: कोकोपीट, माती, वाळू, कंपोस्ट (1:1:1) मिश्रण. कोकोपीट पाणी धरून ठेवते.
खत: एनपीके (10-10-10 किंवा 20-20-20) लिक्विड खत महिन्यातून एकदा.
पाणी: माती कोरडी झाल्यावरच पाणी द्यावे.
प्रकाश: शेड-लव्हिंग प्लांट्सना अप्रत्यक्ष प्रकाश पुरेसा.
कुंडी: छिद्र असलेल्या मातीच्या किंवा प्लास्टिकच्या कुंड्या.

नर्सरीतील टवटवीत झाडे घरी कशी टिकवावीत?

बरेच शहरी लोक म्हणतात की, नर्सरीमध्ये झाडे टवटवीत आणि फ्रेश दिसतात, पण घरी आणल्यानंतर त्यांची ती चमक कमी होते. यामागे काही कारणे असतात: नर्सरीमध्ये झाडांना नियंत्रित प्रकाश, पाणी आणि खत मिळते, जे घरी बदलते. यासाठी खालील टिप्स पाळाव्यात:
हळूहळू वातावरणाशी जुळवून घ्या: झाडाला घरी आणल्यानंतर थेट सूर्यप्रकाश किंवा जास्त पाणी देऊ नये. 1-2 आठवडे मध्यम प्रकाशात ठेवावे.
योग्य पाणी आणि प्रकाश: प्रत्येक झाडाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. नर्सरीतून येताना माती तपासून पाण्याचे प्रमाण ठरवावे.
पानांची स्वच्छता: पानांवर धूळ साचल्यास टवटवीतपणा कमी होतो. ओलसर कापडाने पानांवर पुसावे.
खताचा योग्य वापर: नर्सरीतून आल्यानंतर 1 महिना खत देऊ नये, कारण मुळांना नवीन मातीत स्थिर होण्यास वेळ लागतो. त्यानंतर हळूहळू एनपीके खत सुरू करावे.
कुंडी आणि माती: नर्सरीतून आलेली माती काही वेळा जास्त पाणी धरते. कोकोपीट आणि वाळू मिसळून माती हलकी करावी.

हे सुध्धा वाचा…

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/share/1FMhJ5TcHF/

गव्हाच्या अवशेषांचे व्यवस्थापन: जाळावे की कुजवावे? फायदे, तोटे आणि शास्त्रीय दृष्टिकोन

https://krushigyan.com/wheat-residue-management-burn-or-decompose/

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *