तूर पिकात हे बदलाव केल्यास नक्कीच होईल उत्पन्नात वाढ , A to Z नियोजन
तूर पिकात हे बदलाव केल्यास नक्कीच होईल उत्पन्नात वाढ , A to Z नियोजन
तूर पिका बद्दल सर्व सामण्या माहिती :-
उगम :- भारत आणि आफ्रिका
सामाण्य नाव :- रेड ग्रॅम, पीजन पी, अरहर
शास्त्रीय नाव :- क्याजन्स क्याजन
गुणसूत्र अंक :- २२
तूर पेरणीची वेळ :-
मान्सूनचा पूरेसा पाऊस झाल्या नंतर म्हणजेच ८० ते १०० मिलिमीटर, जमीन कोरडी झाल्या नंतर लगेच पेरणी करावी.
तूर पिकाची पेरणी १५ जून ते १५ जुलै च्या आत करावी. कोणत्या ही परिसथितीत १५ जुलै पर्यंतच पेरणी करावी या नंतर पेरणी केल्यास ४० ते ५० टक्के उत्पादनात घट येऊ शकते.
हवामान :-
तूर हे पिक जवळ पास सर्वच हवामान आणि तापमनात येते पण २६ ते ३० डिग्री सेलसिअ तापमाना मध्ये तूर जोमाने येते.
सरासरी पाऊस ७०० ते १००० मिलिमीटर पाऊस आवश्यक आहे. जास्त पाऊस झाल्यास पाण्या चा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी.
फुले व शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे व समशीतोष्ण हवामान तूर पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
जमीन:-
काळी ते मध्यम भारी (ब्लॅक कॉटन आणि ॲलुवीअल) उत्तम निचऱ्या होणारी जमीन पिकास योग्य ठरते
तूर पिकास चोपण, पाणथळ व शार युक्त जमीन मर सारख्या रोगाना आमंत्रन देते.
६.५ ते ७.५ जमिनीचा सामू तूर पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे.
पुर्व मशागत :-
१५ ते २० सेंटिमीटर पर्यंत जमीन दोन किंवा तीन फाळी नगराच्या साह्याने नागरून घ्यावी. कारण तूर पिकाच्या मुळ्या खोल वर जातात ( डीप रुटेड) त्यामुळे नागराची खोली २० सेंटिमीटर पर्यंत असणे गरजेची असते. त्या लागो पाठो .पाठ जमीन वखरून घ्यावी. पावसाळ्या च्या तोंडी एक पाणी पडल्या वर तन उगलव्या नंतर एक वखराची पाळी मारून घ्यावी या मुळे तन नियंत्रणात राहते.
उन्हाळयात जमीन चांगली तापू द्यावी . कारण त्यामुळे जमिनीतील किडी व अंडी नाष्टा होतात त्या सोबतच अनशक झाडांची पडलेली बीज उन्हामुळे नष्ट होतात व खरिफ हंगामात तन नियंत्रणात येते.
अधिक उत्पादनासाठी १५ ते २० गाड्या शेन खत शेवटच्या वखर पाळी क्या आधी टाकावे.
आंतरपिके:-
तुरीच उत्पादन वाढवण्यासाठी आंतरपीक फायदेशीर दिसून येत आहे.
तुरी सोबत सोयाबीन ,मुंग , उडीत, कपाशी, सूर्यफूल , ई. अंतर पीके सहज रित्या घेता येतात . येत्या काळात सोयाबीन आणि तुरी चे आंतरपिक सगळी कडे दिसून येते आणि ते फायदेशीर आणि उत्पादन शिल सुध्धा ठरत आहे. सोयाबिन चे ६ तास आणि तुरी च १ तास (६:१) अश्या प्रकारे पेरणी केल्या जाते.
पेरणीचे अंतर :-
हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते.
कोरडवाहू साठी दोन ओळीतील अंतर ९० सेंटिमीटर व दोन रोपांतील अंतर २० ते ३० सेंटिमीटर ठेवावे.
बागायती साठी अंतर ९०×९० सेंटिमीटर वर ठेऊन टोकण पद्धतीने लागवड करावी.
बियाणे ४ ते ५ सेंटिमीटर खोल पडेल अश्या प्रकारे पेरणी करावी ५ सेंटिमीटर पेक्षा खोल वर बी पडू नाही याची दक्षता घेतली गेल्या पायजेत.
सुधारित वान :-
मध्यम जमीन तसेच कोरडवाहू लागवडीसाठी लवकर व मध्यम कालावधीत परिपक्व होणारे वाण
१. बी डी एन ७११ [ १४५ – १५० दिवसा मध्ये येणारे ]
२. बी डी एन ७०८ [ अमोल ] [१६० – १६५ दिवस ]
३. फुले राजेश्वरी [१५० – १६० दिवस ]
४. दुर्गा [ निर्मल ] & शंकरा [ खाजगी कंपनी चे वाण ]
५. आयसीपीएल ८७
६. विपुला
७. वैशाली
भारी जमीन तसेच बागायती लागवडीसाठी मध्यम ते उशिरा येणारे वाण
१. बी डी एन २०१३ ४१ [ गोदावरी ] – [ १६५ – १० दिवस ]
२. बी डी एन ७१६ [ १६५ – १७० ]
३. बी स एम आर ७३६ [ १७५ – १८० दिवस ]
४. पी के व्ही तारा [१७० – १८० दिवस ]
५. भिमा [ १६५ दिवस ]
६. फुले राजेश्वरी
७. परभणी रेणुका
८. चारू [ अंकुर कंपनी चे खाजगी वाण ]
बीज प्रक्रिया :-
तूर पिकांना विवीध रोगान पासून वाचवण्यासाठी पेरणी पूर्वी बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाचे आहे.
थायरम किंवा बाविसस्टीने तूर पिका बरोबर बीज प्रक्रिया करावी २ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.
मर रोग टाळण्यासाठी ट्रायकोडरमा प्रती किलो ५ ग्रॅम अशाप्रकारे बियानास चोळावे.
खत व्यवस्थापन :-
खत व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात आधी उन्हाळ्यामध्ये माती परीक्षण केल्यास खत नियोजन एकदम अचूक प्रकारे होऊ शकते. आपल्या जमिनी मध्ये कोणत्या सुक्ष्म अन्नद्रवाची कमी आहे ते ओळखून नियोजन बध्ध खत व्यवस्थापन केल्या जाऊ शकते.
तूर पिकात उत्पादन वाढवण्यासाठी नत्र:स्पुरद:पालाश २५:५०:२५ प्रती किलो द्यावे.
कोरडवाहू पिका मध्ये २ टक्के युरिया फुलोरा अवस्थेत द्यावे.
भारतातील माती मध्ये झिंक कमतरता आढळून येते. त्या साठी हेक्टरी प्रती १५ किलो झिंक सल्फेट वापरावे.
आंतरमशागत :-
तूर पिका जेवढे तन विहिरीत ठेवल्या जाईल तेवढे ठेवावे कारण त्यामुळे उत्पादन वाढवण्यासाठी मदत होते.
तूर पिका मध्ये २ ते ३ कोळपणी गरजे ची असते त्यामुळे मुळानां खेळती हवा मिळते आणि पाण्याचा योग्य निचरा होते.
पहिली कोळपणी २१ ते २५ दिवसा पर्यंत करावी नंतर दुसरी कोळपणी ३१ ते ३५ दिवसाच्या आत करावी .
तुरीची फुल गळ होऊ नये म्हणून फुलोरा अवस्तेथ NAA ची फवारणी फायदेशीर दिसून येते.
पाणी व्यवस्थापन :-
तूर हे खरिफ पीक असून ते जास्तितर पावसाच्या पाण्यातच वाढते.
पावसा मध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याची कमतरता पडली तर सिंचन केल्यास तूर पीकात उत्पादन वाढ होते.
शेंडे खुडणे :-
साधारणतः तूर ह्या पिकाचे उत्पादन झाडाच्या फांद्यावर पूर्णतः अवलंबून असते झाडाला जेवढ्या जास्त फांद्या तेवढं जास्त उत्पन्नात वाढ म्हणून तुरीचे शेंडे खुडने खूप महत्वाचे आहे.
तुरीचे शेंडे तीन वेळेस खुडल्यास उत्पन्नात दुप्टी ने वाढ होते पहिली शेंडे खुडनी २१ ते २५ दिवसा वर केली पायजेत त्या नंतर दुसरी खुडणी ४१ ते४५ दिवसा वर केली पाहिजे आणि शेवटची शेंडे खुडनी ६५ ते ७० या कालावधीत केली पायजेत.
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL
कपाशी मध्ये १०० टक्के किडींचा प्रादुर्भाव कमी होईल असे नियंत्रण केल्यास
https://krushigyan.com/100-insect-control-in-cotton-if-u-fallow-given-below-guidelines/