शेतीमध्ये जैविक उत्पादने वापरून करा आपली माती सशक्त – महादेव नायकुडे
शेतीमध्ये जैविक उत्पादने वापरून करा आपली माती सशक्त – महादेव नायकुडे
(प्रतिनिधी – गोपाल उगले पाटील)
सोलापूर जिल्ह्यातील तालुका माळशिरस येथूनच जवळ असलेल्या जांभूड या गावामध्ये
दि ३१ जुलै बुधवार रोजी जैविक शेती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी मार्गदर्शक म्हणुन आयपीएल बायोलॉजिकल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी महादेव नायकुडे हे होते तर कार्यक्रमाचे आयोजन आयपीएल बायोलॉजिकल कंपनीचे तालुका प्रतिनिधी सूरज शिंदे यांनी केले होते.
सदर कार्यक्रम हा दि. ३१ जुलै बुधवारी सकाळी पार पडला.
त्यामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शेतीसाठी बहुउपयोगी जिवाणू खते (बायो फर्टीलायझर) , जैविक कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके याची ओळख आणि आपल्या शेतीत वापर कसा करावा? केव्हा करावा? याचे फायदे कशाप्रकारे होतात? शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांची वाढ कशी करावी?
त्याचबरोबर रायझोबियम, अझोटोबॅक्टर, हुमिक एसिड, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, बिव्हेरिया, मेटारायझियम, नत्र, स्फुरद व पालाश विघटन करणारे जिवाणू यांचा शेतीसाठी होणारा फायदा. यावर सखोल व मोलाचे मार्गदर्शन महादेव नायकुडे यांनी केले.
ते बोलताना समोर असे म्हणाले की जिवाणूंची शेती ही फायदेशीर शेती आहे
अनेक वर्षांपासून आपण रासायनिक खते जमिनीमध्ये टाकून आपली जमीन न- परवडणारी आणि निर्जीव करून ठेवली आहे त्यामुळे आता आपल्याला जिवाणूंचा वापर करून शेती जिवाणूंनी श्रीमंत करावी लागणार आहे. शेतकऱ्याला जर समाधानाने शेती करायची असेल तर उत्पादन खर्च कमी करून त्यामध्ये जिवाणूंचा वापर करून शेती केली तर नक्कीच शेतकऱ्यांना समाधानाचे आणि आनंदाचे दिवस दिसतील. आपण गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणा येथील शेत जमिनीचे प्रश्न एकत किंवा वाचले असेल. त्याप्रकारे आपली शेतजमिनीची परिस्थिती होऊ नये यासाठी आपल्याला हुशार व्हावं लागेल.
कार्यक्रमाच्या शेवटी चर्चासत्र पार पडले
त्यामध्ये सेंद्रीय शेती का करावी? सेंद्रिय शेतीचे फायदे याबाबत चर्चा झाली त्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रीय शेती करण्याचा निश्चय त्यावेळी घेतला.त्यानंतर कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी अल्पोहार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनीही प्रयत्न केले होते.
हे सुद्धा वाचा
शेतीच्या बांधावरच करा असरदार नैसर्गिक कीटकनाशक – दशपर्णी अर्क
https://krushigyan.com/natural-insecticide-dashparni-ark/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा