खरच आपल्या शेतातील माती आजारी पडली आहे का ? कदाचीत ती म्हातारी तर झाली नसेल ?

खरच आपल्या शेतातील माती आजारी पडली आहे का ? कदाचीत ती म्हातारी तर झाली नसेल ?

खरच आपल्या शेतातील माती आजारी पडली आहे का ? कदाचीत ती म्हातारी तर झाली नसेल ?

शेतकरी मित्रानो आज हा लेख लीहण्या मागचं कारण आहे की आपण सगळे शेतातील मातीची खरच काळजी घेतो का तीला जतन करण्याची काळाची गरज आहे. ती जर आजारी पडली तर आपल्याला अन्नाच्या दान्या साठी वन वन भटकावे लागले म्हणून शेतातील मातीचे सवर्धन करायला शिका त्यात आपलाच फायदा आहे. आज शेतकरी सर्व प्रकार ची शेती करता कोणी रासायनिक तर कोणी जैविक तर कोणी सेंद्रिय शेती करतात पण मला शेती करणाऱ्या बळीराजा ला सांगायचं आहे की आपण फक्त मातीमधून जास्तीतजास्त उत्पादन घेण्याचे प्रयत्न करतो आपल्या मनात आले तसे करतो पण कधी माती सुपीकतेचा विचार केला आहे का? आपण जमिनीतून गरजे पेक्षा जास्त घेतो पण कधी जमिनीला परतवा देतो का? हे कित पत योग्य आहे. आपला बळीराजा माती मध्ये वेगवेगळ्या प्रकरचे खत आणून टाकतो पण मातीला काय गरज आहे तो कधी विचारच करत नाही. शेतकरी सुपीकता वाढण्यासाठी कुजलेले शेन खत देतात तेही बुरशी ने माखलेलं. त्या विशेष म्हणजे काही शेतकरी कंपोस्ट खत तयार करतात मग जमिनीत देतात हे कीती योग्य आहे मला समजलेच नाही. जमिनी मध्ये कुजलेले खत देणे कित पत योग्य आहे.तिच्या मध्ये  तेवढी ताकद आहे की ती स्वतः  खत कुजऊ शकते. तिला माहिती असते काय कुजवयाचे आणि काय नाही. कुजलेले खत कश्या साठी आपल्याला तिच्या वर विश्वास नाही का ? ती म्हातारी झाली आहे का? शेतकरी बंधूंनी मातीमध्ये एवढी ताकद आहे की ती पंधरा ते वीस दिवसा मध्ये इन ऑरगॅनिक कार्बन चा रूपांतर ऑरगॅनिक कार्बन मध्ये करू शकते. (Immobalization to mineralization) शेती मधे टाकलेलं कुजलेले खत यांचे परीणाम काही दिवसापुरतेच मर्यादित असतात आपण आपला तिच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे खूप गरजे आहे. आपण तिच्याकडे नेहमी नकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघतो.

मित्रानो शेती बद्दल सकारात्मक विचार ठेवावे लागते तेव्हाच अपलायला शेती मध्ये बदल घडताना दिसेल.  आपण जमिनी मध्ये कंपोस्ट खत टाकतो काय गरज आहे बरं शेती मध्ये कुजलेले खत टाकण्या ची तिच्या मध्ये ताकद आहे स्वतः कुजवण्या ची असे करून आपण खरचं शेती मधल्या मातीचं म्हातारपण जवळ अनत आहे जसे आपण म्हातारी माणसाला बारीक करून खायला द्यावे लागते अगदी तसेच आपन माती सोबत करत आहे विषय समजून घ्या आपन शेताच्या बाहेर शेणखत कंपोस्ट का करतो? काही शेतकरी दुसर्याच्या सांगण्यावरून म्हणतात की कंपोस्ट मधे जिवाणू प्रमाणात भरपुर असतात बस एवढेच त्यांना माहीत असते. आपन फक्त कानाने ऐकून.कोणाला ही गुरू करतो. आपल्या जमिनीत कोणते कार्य  किती दिवस पर्यंत चालू राहते हे ही माहित नसते आपण फक्त लोकांचा एकूण जमिनी ची फार वाट लावली आहे. आपल्या मातीला कोणते कुजवावे व कोणते नाही कुजवावे हे सर्व समजतं नाही तर आपन जे बियाणे पेरणी करतो ते मातीत कुजले नसते का ! मला हेच सांगायचे आहे की ते माती एक जिवंत परीसंस्था आहे ती असंख्य मुलद्रव्याच माहेर आहे घर आहे .ती इतकी ताकदवान आहे की निर्जिव असलेलं सर्वच कुजवते.

काही लोकांना वाटते की शेकाऱ्यना काहीच समजत नाही कोणी काही तर कोणी काही येऊन शेतकऱ्यांना सांगुन जाते आणि तो बिचारा बळीराजा पेचात पडतो. जेवढे डोक्यावर केस नाही तेवढ्या कुजवण्याच्या पद्धती आता दिसून येतात.शेती मधे जो येईल तो अक्कल वाटुन पसार होतो. शेतकर्याची परीस्थिती काही सुधरेना. दिवसेंदिवस शेतकरी हा पाचीला पुजल्या सारखा होत आहे याची कुठे तरी खंत वाटते.

कुजलेलं खत म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातल्या सारखें व्हय. मला तर कधीं कधीं तर वाईट वाटते की हे काय चालु आहे. ती इतकी ताकदवान आहे की निर्जिव असलेलं सर्वच कुजवते तरी आपण का तिला कुजवलेलं देतो. जर माती मधे जिवाणू आहेत मग शेतीत कुजवले ल आणून टाकण्याची काय गरज आहे?  बाहेर कुजवण्याला काय अर्थ आहे या वर आपण जरा सखोल विचार करण्याची गरज आहे.

आपण शेतकरी मित्र पिकांवर वर तर लक्ष देतो पण माती वर नाही. जसे पिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या करतात तसे तर काही माती मध्ये करावे लागत . पण नियोजन बद्घ कामे आपल्याला माती सुपीकते कडे नेऊ शकते. माती मध्ये होईल तेवढे रासायनिक खताचे वापर टाळा जेणे करून तिचे आयुष्य वाढण्यास मदत होईल. माती परीक्षण करून आपण जमिनीच्या सुपीकतेचा सखोल अभ्यास करून नियोजन करू शकतो. माती मध्ये कुजलेले खत टाकण्या पेक्षा न कुजलेले टाकल्यास कधीही योग्य राहील कारण माती मधल्या जिवाणू चे कार्य वाढते व ते नेहमी सक्रिय राहतात व माती भुसभुीत ठेवण्या साठी उपयोगात येतात. माती ही असंख्य  मल द्रव्यांचे माहेर घर आहे तिला जतन करणे काळाची गरज आहे.

 

 

 

Saurav Gaikwad

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *