“डॉ. प्रणिता कडू: कृषीच्या नव्या उंचीवर ग्रामीण महिलांचे भविष्य घडवणारी”

“डॉ. प्रणिता कडू: कृषीच्या नव्या उंचीवर ग्रामीण महिलांचे भविष्य घडवणारी”
डॉ. प्रणिता कडू, कृषी विज्ञान केंद्र, घातखेड येथील गृहविज्ञान तज्ञ, यांनी ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि शेतकरी कुटुंबांच्या उन्नतीसाठी अतुलनीय कार्य केले आहे. अमरावती जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांच्या सक्षमीकरणावर आधारित त्यांच्या डॉक्टरेट संशोधनाने ग्रामीण जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत.
१६ वर्षांहून अधिक काळ त्यांनी ग्रामीण महिला, शेतकरी कुटुंब आणि मेळघाटातील आदिवासी महिलांच्या समस्या व गरजा ओळखून, भारतातील विविध संशोधन केंद्रे व कृषि विद्यापीठांच्या शिफारसीवर आधारित २३ प्रकारच्या तंत्रज्ञानाचा प्रयोगशील उपयोग करून ४०० प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत. या प्रशिक्षणांमधून अंदाजे १०,००० महिला सक्षम बनल्या आहेत.
तसेच, संपूर्ण महाराष्ट्रातील बचतगट, बचतगट प्रेरिका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व कृषिविभागातील विस्तार अधिकाऱ्यांना ऑनलाईन व प्रत्यक्ष व्याख्यानांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले गेले आहे. विविध आकाशवाणी केंद्र, प्रसिद्ध मासिक लेख, कार्यशाळा, प्रदर्शने आणि व्याख्यानाद्वारे शेतीवरील प्रक्रिया, मूल्यवर्धन, उद्योजकीय निर्मिती, श्रम कमी करणारे तंत्रज्ञान आणि कुटुंब पोषण सुरक्षिततेसाठी सातत्याने सूचना व मार्गदर्शन केले गेले आहे. जिल्हास्तरावर कृषि विभागाच्या सहकार्याने तृणम्य व रांनभाज्यांवर माहिती पुस्तिकाही प्रसिद्ध झाली असून, महिला व बाल कल्याण विभागाने रक्तक्षय व नियंत्रणावर आधारित विविध पुस्तिका देखील लाँच केल्या गेल्या आहेत.
महिलांना जास्तीतजास्त मार्गदर्शन करण्यासाठी १८ प्रकारच्या केंद्रीय व राज्यस्तरीय शासकीय व खाजगी संस्थांसोबत एकत्रितपणे काम करण्यात आले आहे. २५ पेक्षा जास्त सात दिवसीय उद्योजकीय प्रशिक्षण कार्यक्रमांमधून ८७ महिला उद्योजिका तयार झाल्या आणि १३ महिलांना राष्ट्रीय, राज्य व जिल्हापातळी स्तरावर त्यांच्या कार्याची दखल घेत शासन व विद्यापीठाचे अवॉर्ड मिळाले आहेत.
डॉ. कडू यांचे पुण्यातून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध शेतकरी मासिक (उदा. ऍग्रोवन) व विविध वृत्तपत्रांद्वारे १५ पेक्षा जास्त लेख तसेच एकूण ३५ लेख प्रसारित झाले आहेत. १३ महत्वाच्या विषयांवर माहिती पुस्तिका प्रकाशित करून त्या सर्व स्तरावर प्रशिक्षण व प्रचार प्रसारासाठी वितरित केल्या जातात. पोषण परसबाग निर्मिती साठी त्यांनी बियाणे किट, माहिती पुस्तके व फळझाडे देऊन १०० पेक्षा जास्त परसबागांची स्थापना केली आहे – ज्याचा अमरावती जिल्हा आणि मेळघाट सारख्या आदिवासी भागात महत्त्वाचा प्रभाव पडला आहे.
शेतीवर आधारित कृषि उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मसाले निर्मिती, मशरूम उत्पादन, सोयाबीनवर आधारित विविध खाद्यपदार्थ आणि दुधापासून पनीर निर्मिती यासारख्या प्रयोगात्मक उपायांनी यशस्वी प्रात्यक्षिके सादर केली गेली आहेत. २०२०-२१ या कोरोना काळात ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे २७ कार्यक्रमांतर्गत २००० कर्मचाऱ्यांना – ज्यात अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या प्रेरिका आणि कृषी विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे – मार्गदर्शन करण्यात आले आणि नागपूर, अमरावती, जळगाव येथील ४० पेक्षा जास्त आकाशवाणी प्रसारणाद्वारे विविध विषयांवर मुलाखती प्रसारित केल्या गेल्या आहेत.
मानव विकास संस्थेच्या माध्यमातून पालघर येथील ५० आदिवासी महिलांना त्यांच्या पाडावर जाऊन लोणचे, पापड, चटण्या, कँडी, सरबते अशा पदार्थांचे सलग १० दिवसांचे प्रशिक्षण घेऊन उद्योजकतेचे धडे देण्यात आले आहेत. नुकत्याच केंद्रीय योजनेनुसार, जैवसमृद्ध बियाण्यांतून लोह समृद्ध लाल तांदूळ, ज्वारी व बाजरीचे बियाणे देऊन मेळघाटात रक्तक्षयासारख्या गंभीर स्वरूपातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नवीन पीकपद्धतींचा प्रायोगात्मक अवलंब करण्यात आला आहे. तसेच, टाकाऊ धान्याच्या भुश्यावर मशरूम उत्पादन, उच्च प्रथीन निर्मितीची स्वस्त व सुरक्षित पद्धत विकसित करून आदिवासी महिलांमध्ये आवड निर्माण केली आहे. केरळमधील त्रिवेंद्रम येथील केंद्रीय कंद संशोधन केंद्राचे जैवसमृद्ध क्रौटीनयुक्त भूकांती नावाचे रताळीचे प्रयोग लाकटु, ता धारणी येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात यशस्वी रित्या राबवून लहान मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत केली जाणार आहे.
विशेष मुद्दे:
समुदाय आणि पर्यावरण यांचा समतोल: डॉ. कडू यांच्या प्रशिक्षणातून महिलांना फक्त तंत्रज्ञानाची ओळख नव्हे तर समुदायातील पर्यावरणीय जपणूक, टिकाऊ शेती व नैसर्गिक संसाधनांचा संरक्षण कसा करावा यावरही जागरूकता निर्माण झाली आहे.
डिजिटल आणि ऑनलाईन क्रांती: आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण भागातील माहितीचा प्रसार व प्रशिक्षण अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यात यश मिळाले आहे.
समग्र विकासाचा दृष्टिकोन: महिला सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक, आर्थिक आणि मानसिक विकासावर देखील भर देत, कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रगतिशील दिशेने नेण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.
१६ स्रीशक्तीला खऱ्या अर्थाने सक्षम करणाऱ्या डॉ. प्रणिता कडू यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागात नवे दिग्दर्शक उभे राहिले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांनी हजारो महिला केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यदृष्ट्या सशक्त झाल्या आहेत, ज्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला आहे.
हे सुध्धा वाचा…
“कमी दिवसांत अधिक उत्पादन देणारे फायदेशीर पीक – उन्हाळी उडीद!”
https://krushigyan.com/cultivation-of-summer-black-gram-vigna-mungo/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा