कपाशी मध्ये १००% किडींचा प्रादुर्रभाव कमी होईल असे नियंत्रण केल्यास

कपाशी मध्ये १००% किडींचा प्रादुर्रभाव कमी होईल असे नियंत्रण केल्यास

कपाशी मध्ये १०० टक्के किडींचा प्रादुर्रभाव कमी होईल असे नियंत्रण केल्यास

कपशी वरील रोग

कपाशी हे एक प्रमुख पीक आहे. त्याला आपण पांढर सोण किंवा नगदी पीक असे सुध्दा म्हणतो कपाशी हे पारंपारीक पद्धतीने व फार पूर्वी पासून घेण्यात येणारे पीक आहे. पूर्वी देशी कपाशी व अमेरीकन कपाशी आणि हॉयब्रीड घेण्यात येत होते, पण त्यावर, बोंडअळीचा प्रादुर्रभाव जास्त असल्यामुळे आपण बी.टी. कापसाची लागवड सुरू केली. या लागवडीमुळे देशाचे उत्पन्न खूप वाढले आहे. पण जेव्हा आपण बोंडआळीचा प्रादुर्रभाव कमी करण्यासाठी बी.टी ची लागवड सुरू केली आणि या मुळे  वेगवेगळे रोग येण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे कपाशी पीकाचे २० ते २५% पर्यंत नुकसान होऊ शकते त्यामुळे हे रोग नियंत्रणात आणणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपण काही गोष्टींवर लक्ष देणे सुध्धा गरजेचे आहे. जसे की जमीनीची  स्वच्छता त्यामुळे मागील वर्षाचा काडी कचरा व त्यामधे असलेले अंडी नष्ट होतील. ज्यामुळे पुढील पीकावर त्याचा परीणाम होणार नाही. कुठल्याही पीकावरील रोगसंख्या कमी करायची असेल ‘तर बीज प्रक्रीया अत्यंत महत्वाची ठरते.

कपाशीवरील महत्वाचे रोग :

लाल्या

पानावरील ठिपके कवडी

खोडकुज व मुळकुज

पानावरील ठिपके

जिवाणूजन्य करपा

दहिया

लाल्या :-

१) या रोगाचा बिटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात आढळुन येतो: हा रोग मुलद्रव्याच्या (मॅग्नेशियम, नत्र, बोरॉन) कमतरतेमुळे होतो.

२) दिवस व रात्रीच्या तापमानामधे फरक असल्यास हा रोग दिसुन येतो. जमिनीत अति पाणी किंवा पाण्याची कमतस्वा कमतरता असल्यास हा रोग आपल्याला दिसतो.

३) ऑक्टोबर महिन्यापसुन या रोगाची लक्षणे आपल्याला दिसतात रोग ग्रास्त जी पाने असतात त्याचा रंग तांबुस वा नंतर पूर्ण लालसर होऊन वाळतात वगळुन पडतात बोंडे सुध्दा लालसर होऊन गुकुन पडतात.

व्यवस्थापन :- 

१) जमिनीतील पानी जास्त झाल्यास त्याचा योग्य निचरा करावा व तसेच पिकास पाण्याचा ताण येण्यापूर्वी पाणी दयावे.

२) योग्य प्रमाणात खतांची योग्य मात्रा दयावीन पीक ५५ ते ६० दिवसाचे असतांना मॅग्नशियम सल्फेट 20 ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून २ ते ३ फवारण्या कराव्यात. किवा र टक्के डिएपी किंवा रटक्के युरिया खताच्या २ ते ३ फवारण्या कराव्यात.

३) वरीलप्रमाणे 6 रोग पाहूण आपल्या पिंकाचे पिकातील रोगाचे नियोजन करावे व आपले उत्पन्न वाढवावे.

कवडी रोग :-

१) या रोगाला आपण अॅयकनोज असे सुध्दा म्हणतो. हा रोग बुरशीमुळे होतो.

२) थंड व स्वामानासी हवामानामुळे या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.  रोग बियाण्यापासून ठिपके येतात व पाने करपुन जाता रोपे कुजुन जातात.

३) वोडावर काळपट व किंचीत खोलगट असे चट्टे पडतात, त्यामुळे बोंडे अर्धवट उमलतात व कापूस घाट चिटकुन राहतो.

४) कापसाचा रंग तपकिरी होते व धाग्याची प्रत खालावते. त्याला आपण पक्षीचा डोळा अस सुध्दा म्हणतो.

व्यवस्थापन :- 

१)  कपाशीचे रोगग्रस्त अवशेष जाकुन नष्ट करावीत. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो याची बीजप्रक्रिया करावी.

२)  तरीही हा रोग दिसल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा झायनेब २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळुन दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

खोड कुज व मुळकुजे :-

१) या रोगाचा प्रादुर्भाव जून जुलै महिन्यात होतो. रोगग्रस्त जी झाडे आहेत ती कोमेजुन वाळतात व अशी झाडे. सहजपणे आपण जमिनीतून उपटू शकतो.

२) मुळे व खोडाचा खालचा भाग तपकिरी रंगाचा होतो.

व्यवस्थापन :- 

१) पेरणीपूर्वी रोग वारंवार आल्यास पिंकांची फेरपालट करवी. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझीम १५ ग्रॅम किंवा कैष्टन ३ ग्रॅम.

२) १ ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति किलो या प्रमाणात लावावे, शेतामधे पाणी साचले असल्यास पाण्याचा योग्य निचरा करावा.

३) बिज प्रक्रिया केली नसल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रन रोगीट झाडाच्या बुडाशी गोलाकार टाकावे.

पाना वरील ठिपके :-

१) हे ठिपके अल्टरनेरिया बुरशीमुळे होतात.

२) सुरवातीचा काळस हे ठिपके गोलाकर तपकिरी रंगाचे असतात → नंतर एक ठिपके एकमेकात मिसळतात. व पानाच्या सर्व पृष्ठभागावर पसरतात – व रोगग्रस्त पाने वाळुन करपतात. हे ठिपके मोठ्या प्रमाणात आल्यास झाडाची पाणगळ होते. व प्रकाश सोसण्याची प्रक्रिया कमी होते व बोड व्यावस्थीत भरल्या जात नाहीत.

व्यवस्थापन :-

१) रोगग्रस्त पाने व बोंडी जाळून नष्ट करावी. | रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम – प्रति १० लीटर पाण्यात किंवा डायथेन झेड-७५, २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळुन त्याची का फवारनी करावी.

२) जर हा रोग मोठ्या प्रमाणात आहे आढल्यास वरील फवारनी दर 10 ते १२ दिवसांच्या अंताराने दोन फवारण्या कराव्यात.

जिवाणूजन्य करपा :-

१) हा रोग जिवाणुमुळे होतो.

२) या रोगाचे लक्षणे सुखातीलाच अपल्याला शेतामधे दिसतात.

३) सुखातीच्या रोपाच्या कालावधी मधे बीजदलावर, पानावर लहान असे तेलकर व पानथळ ठिपके आपल्याला दिसतात.

४) तसेच पानाच्या शिरा काळपट पडून गळुन पडतात पाने सुकतात पानांवर व बोंडावर कोणाकृती काळपट ठिपके आपल्याला व दिसतात.

५) रोगग्रस्त जी बोंडे आहेत उमलत नाही व त्यामधील कापुस कवडीसारखा होती.

व्यवस्थापन :-

१) बीयाण्यास कार्बेन्डाझीम १५ ग्रॅम प्रति किलो याची बीज प्रक्रिया – पेरणीपूर्वी करावी.

२) बुरशीनाशक कर्बोक्झीन (३७.७%) आणि यायरम (३७.५%) याचे मिश्रण ३ ग्रॅम प्रति किलो लावावे. केल्यावर सुद्धा पोनांवर रोग दिसल्यास कॉपर ऑकमीक्लोरा ५०% हे बुरशीनाशक 3 आणि त्यामधे २५० पीपीएम स्ट्रेप्टोसाऱ्याव स्ट्रेप्टोसायक्लिन (२.५ ग्रॅम) प्रति १० लीटर पाण्यात मिसळुन – त्याची फवारणी करावी ४) हे करून सुध्दा रोग नीयंत्रणत नाही आल्यास याची फावारनी दर १५ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

दहिया रोग :-

१) हा रोग रामुलेरीया व ओरिओला या बुरशीमुळे होतो. नावाप्रमाणे (दहिया म्हणजे दहि ) या रोगामधे पानांवर दही सोडल्या सारखे दिसते. हा यो रोगचा प्रदुर्रभाव दमट व पावसाळी वातावरणात जास्त होतो.

२) मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्रभाव झाल्यास रोगग्रस्त पाणे गळून पळतात  पाणे गळून पडल्यास प्रकाश सोसण्याची प्रक्रिया कमी होते व त्याचा परीणाम बोंडांवर होतो आणि ते व्यवस्थीत भरल्या जात नाहीत.

व्यवस्थापन :-

१) यामध्ये आपण जी रोगग्रस्त पाने किंवा झाडांचे अवशेष जाळून नष्ट करावे.

२) रोगाचा प्रदुर्भाव दिसताच ३०० पोताची गंधकाची भुक 20 किलो प्रति हेक्टरी.

३) कार्बेन्डाझीम 90 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळ धुरळावी १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.

 

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL

शेती विषयक माहिती साठी कृषी ज्ञानच्या  व्हाट्सअप ग्रुपला  जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

Related articles

2 thoughts on “कपाशी मध्ये १००% किडींचा प्रादुर्रभाव कमी होईल असे नियंत्रण केल्यास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *