नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं तरी काय ? ती शेती कशी करतात ?

नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं तरी काय ? ती शेती कशी करतात ?

नैसर्गिक शेती

नमस्कार शेतकरी मित्रहो आजच्या कृषि सल्ला मध्ये आपण नैसर्गिक शेती म्हणजे काय हे समजून घेऊयात.

नैसर्गिक शेती ही एकमेव अशी शेती करण्याची पद्धत आहे, ज्यात शेतीवरचा खर्च शून्यात असून, आपल्या उत्पन्नात दुप्पट वाढ होईल अशी शेती पद्घत आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण अहमदाबाद याठिकाणी नैसर्गिक शती पद्धतीवर भारतातील सर्वात मोठा प्रकल्प उभारला आहे व याच प्रकल्पाला आधारभूत धरून पूर्ण भारतात नैसर्गिक शती करण्याचे आश्वासन पण दिले आहे.

नैसर्गिक शेती म्हटल की बहुतांश लोकांच्या मनात ती एकदम पुरातन काळातील शेती पद्धत आहे असा गैरसमज आहे. तर हाच लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी हा लेख आहे.

नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय?

नैसर्गिक शेती ही एक अशी आगळीवेगळी शेती करण्याची पद्घत आहे या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये आपण जर शेती च्या खर्चा बद्दल बघितल तर जेवढा सेंद्रीय शेती करायला खर्च येतो त्याच्या शून्य पट कमी खर्च येतो म्हणजे म्हणजेच आपण या नैसर्गिक शेती ला झीरो बजेट शेती सुद्धा म्हणतात.

ही शेती कशी करतात ?

नैसर्गिक शेती ही निसर्ग व विज्ञान आणि धार्मिक या तिन्ही गोष्टीवर आधारलेली शेती पद्धत आहे. थोडक्यात जसं की आपण जुन्या काळात जशी शेती करत होतो त्या नुसारच पण याला विज्ञानातील नवीन संकप्लना चा जोड देऊन काही धार्मिक रीती रीवाजा चा जोड देऊन तयार केलेली पद्धत आहे.

या शती पद्धतीला शून्य रुपये खर्च कसा येतो?

१) नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये बाहेरून कोणतेच प्रकारची खरेदी करायची गरज नाही.

२) कोणतेही रासायनिक खत सेंद्रीय खत, गांडूळ खत आणून आपल्या शेतामध्ये टाकण्याची गरज नाही.

३) जीवाला हानिकारक असलेले अशे कीटकनाशकांचा फवारणी करायचं काम नाही.

४) महत्वाचे म्हणजे फळबागेत मशागत पूर्ण पणे बंद, कही काळानंतर नांगरण्याची पण गरज पडणार नाही.

५) या शती मध्ये आधुनिक व पुरातन यंत्र जसे की ट्रॅक्टर, बैलगाडी, इत्यादी अशी यंत्र लागत नाही.

अश्या पद्धतीने आपला जवळपास शेतीवरच खर्च हा शून्य रुपय होतो.

शेती म्हटल की शेतकऱ्याच्या शेती वरच सर्वात मोठ संकट म्हटल तर पाणी टंचाई, व वीज अनिमियत पुरवठा पण आपण जर रासायनिक शेती किंवा सेंद्रीय शेती या दोन्ही शेती पद्धतीच्या तुलनेत जर नैसर्गिक शेती चा विचार केला तर फक्त नैसर्गिक शेती ला १०% पाणी व १०% वीजे ची आवश्यकता आहे.

नैसर्गिक शेती पद्धतीचं उत्पन्न हे दुसऱ्यात शेती पद्धतीच्या तुलनेत कसं असेल?

आजच्या शेतकऱ्यांचा एक खूप मोठा गैरसमज आहे, की शेतीवर जेवढा जास्त खर्च होईल तेवढं जास्त उत्पन्न भेटेल, तर अस मुळीच नाही जर तुम्ही पूर्ण वर्षभराचे शेती च उत्पन्न व त्यावरचा खर्च याचं गणितं करून बघितल तर शेतकऱ्याची वर्षभराची मजुरी पण निघत नाही.

नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये खर्च हा जवळपास शून्य % च्या तुलनेत राहील व उत्पन्न दुप्पट राहील.

नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये शेतकरी मालामाल कसा होतो?

पूर्णतः नैसर्गिक शेती असल्यामुळे आपला शेतातील माल हा रसायनयुक्त, पौष्टिक, दर्जेदार व स्वादिष्ट या मुळे बाजारात अश्या मालाला खूप जास्त प्रमाणात मागणी राहते, विशेषतः या शेती करणाऱ्या शेतकरी आपल्या मालाचा भाव आपण स्वतः ठरवून बाजार मध्ये विक्री करू शकतो त्यामुळे शेतकऱ्याला या नैसर्गिक शेती पद्धतीचा चांगलाच फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हे अहमदाबाद नैसर्गिक शेती पद्धत प्रकल्प हा लवकरच पूर्ण भारत भर सुरू करणार आहे की ज्यामुळे माणसाला चांगल पौष्टिक आहार भेटून शेतकऱ्याला आर्थिक फायदा होईल.

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL

शेती विषयक माहिती साठी कृषी ज्ञानच्या  व्हाट्सअप ग्रुपला  जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://krushigyan.com/whatsapp-group/

कृषिदुत वैभव उगले

९३९११५७७०१

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *