रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान आणि कांद्यामधील रोग नियंत्रण कशे करावे
रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान आणि कांद्यामधील रोग नियंत्रण कशे करावे
नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमच्या शुभचिंतक सौरव विलास गायकवाड आज तुमच्यासाठी रबी कांदा या वर लेख घेऊन आलोय. साधारणता आपल्याला तीन प्रकारचे कांदे पहावयास मिळतात पिवळा, लाल आणि पांढरा. कांदा उत्पादनासाठी महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे त्यामध्ये नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे भारतातील एकूण कांद्यांच्या उत्पादना पैकी १० % कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.
कांदा विषयी सर्व सामान्य माहिती
शास्त्रीय नाव- एलियम सेपा
सामान्य नाव – कांदा , प्याज
मुळ उगम – मध्य आशिया
जमिनीची निवड :-
पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी व कसदार जमिन निवडावी. जमिनीचा सामु पूर्णांक ५-७ च्या दरम्यान असावा. हलक्या मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते भारी चिकन माती असलेल्या, पाण्याचा निचरा न होण्याऱ्या तसेच चोपड्या किंवा खारवट जमिनीत पिकाची वाढ खुंटते, खरीफ लागवडीसाठी भारी जमिन निवडू नये.
हवामान :-
कांदयाच्या पिकासाठी हवामान लागवड साठी ठंड हवामान असने गरजेचे आहे. लागवन की मुख्यताहा: नोव्हेंबर ते डिसेंबर या महिण्यात केली जाते.
जमिनीची मशागत :-
कांदा लागवडीच्या वेळी जमीन उभी आडवी नागरून घ्यावी नंतर एकदा नांगरणी करून ढेकळं फोडून जमीन भुसभुशीत करावी एक हेक्टरला २५ टन शेणखत आणि ५ टन गांडूळ खत टाकावे.
लागवड :-
कांद्याची लागवड वाफे पाडून तसेच सरी पाडून केली जाते आधी गाडी वाफा १ मीटर रुंद, ३ मीटर लांब आणि १५ सेंटिमीटर उंच, असा तयार करून घ्यावा वाफेच्या रुंदीला समांतर अशा ५ सेंटिमीटर अंतरावर बोटाने रेशा पाडून घ्याव्या आणि त्या ओळी मध्ये बी पेरावे आणि मातीने झाकुन घ्यावे. बी उगवण्याच्या काळापर्यंत झारीने पाणी दयावे आणि उगवल्या नंतर गरजेने पाटाने पाणी दयावे रोपाला हरबऱ्या एवढी गाठ तयार झालेली दिसली की ते रोप लागवडीसाठी तयार होते खरीपातली रोप ६ ते ७ आठवड्यांनी व रबीतली रोप ८ ते ९ आठवड्यांनी तयार होतात. रोप काढायच्या २४ तास आधी वाफ्यांना चांगले भिजवून घ्यावे. रोपांची लागवड ७ ते ७.५ सेंटीमीटर अंतरावर करावी.
व्हेरायटी :-
कांद्या पिकासाठी खालील जाती अधिक उत्पादन देणारे आहेत
एन 241 :- १२० ते ११० दिवसात परिपक्व होणारे व अधिक उत्पादन देणारे वाण.
बसवंत 780 :- १०० ते ११० दिवसात परिपक्व होणारे वाण.
पुसा रेड :- १२० परिपक्व होणारे वाण.
एन 53 :- १०० ते १५० दिवसात परिपक्व होणारे वाण
खत व्यवस्थापन :-
१) कांद्याच्या लागवडी वेळी हेक्टरी नत्र स्फुरद पालाश हे खत ५० किलो प्रत्येकी द्यावे.
२) कांद्याच्या लागवडी पूर्वी सिंगल सुपर फॉस्फेट च्या एक ते दोन बॅग्स प्रति एकर वाफ्यांमध्ये टाकाव्या.
३) सरी पद्धतीने लागवड केल्यास सऱ्यांमध्ये एक ते दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व एक बॅग पोटॅशियमची लागवडी पूर्वी टाकावी.
कांदा पिकावर येणारे रोग व उपाय :-
१) जांभळा करपा :-
हा रोग पिकाचे ५० ते, ७० टक्के नुकसान करतो. याची लक्षणे म्हणजे पाणांवर किंवा फुलावर पांढरे ठिपके पडतात व कालांतराने ते जांभळट होत जातात व शेवटी काळे पडतात
उपाय :- उन्हाळ्यात जमीन नांगरून चांगली तापु दयावी मॅनकोझेब २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून रोपांच्या उगवनी नंतर ३० दिवसांनी ४५ व ६० दिवसांनी फवारनी करावी किंवा ट्रायकोडर्माचा वापर करावा.
२) काळ्या करणा :-
खरीफ हंगामातल्या रोगांना काळ्या करपाचा जास्त प्रादुर्भाव दिसतो.
लक्षणे :- बुडख्या जवळ व पाणावर राखाडी रंगाचे ठिपके पडू लागतात ते वाढत जाऊन पाणे काळी पडतात आणि शेवटी रोपे मरतात.
उपाय :- मॅनकोझेब २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळुन फवारनी करावी किंवा बॅसिलस सबटीलिस् आणि सुडोमोनस या जैविक बुरशींचा वापर करावा ५० मिली प्रती १० लिटर. जमिनीत पाण्याचा नीचरा- होईल व ते साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी
3) तपकीरी करपा :-
तापमान २० ते 25 सेल्सिअसच्या खाली गेले की या बुरशीयुक्त रोगाचे प्रमाण वाढते पानावर तपकीरी चट्टे पडू लगतात. नंतर त्याचा आकार वाढत जाते व रोपे सुकतात.
उपाय : २५ ग्रॅम मेनकोझेब प्रति १० लीटर पाण्यात मिसळुन त्याची प्रवारणी करावी किंवा ट्रायकोडर्माचा सुद्धा वापर करू शकता. पिकांची फेरपालट करावी. पाण्याचा नीचरा होईल याची काळजी घ्यावी.
४) मर रोग :-
या रोगामुळे पीक कोलमडून पडू लागते रोपे पिवळी पडतात व रोपांचा जमिनीलगतचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडु लागतात.
उपाय :- पेरणी पूर्वी बियांना कारबॉक्सीन २-३ ग्रॅम प्रती किलो चोळावे म्हणजेच पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून बी पेरावे.
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL
हे सुध्धा वाचा
अश्याप्रकारे हरभरा पिकाची लागवड केल्यास नक्कीच होईल उत्पादनात वाढ!
https://krushigyan.com/how-to-increase-production-in-chickpea/
2 thoughts on “रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान आणि कांद्यामधील रोग नियंत्रण कशे करावे ”