ह्या पाच फवारण्या करतील आंबा मोहोराचे संरक्षण

ह्या पाच फवारण्या करतील आंबा मोहोराचे संरक्षण
आंबा पिकाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्या पासून ते जानेवारी अखेर पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मोहोर आलेला दिसून येतो . काही ठिकाणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहोर आलेला देखील दिसून येते. परंतु डिसेंबर ते जानेवारी ह्या दोन महिन्यामध्ये आपल्याला आंब्या वर मोहोर दिसून येतो आणि हीच ती वेळ असते ज्या वेळेस आंब्याच्या मोहोरा वर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. जसे कि तुडतुडे, कोळी, पिठ्या ढेकूण, करपा, भुरी, इत्यादी आणि या वेळी व्यवस्थित नियंत्रण करणे खूप गरजेचे असते.
आंबा मोहोर संरक्षणासाठी ह्या फवारण्या ठरतील फायदेशीर:-
शेतकरी मित्रांनो आंबा पिकाच्या मोहोर व्यवस्थापनासाठी आंब्याच्या मोहोराच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात आणि या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ज्या वेगवेळ्या पंच फवारण्या घेतल्या जातात त्या फवारण्या कश्या कराव्यात ते सविस्तर खालील प्रमाणे आहे.
पहिली फवारणी:-
या मध्ये पहिली फवारणी असते ती फवारणी आंब्याच्या पोपटी रंगाच्या पाली वर घेतल्या जाते. मोहोर येण्याच्या अगोदर या मध्ये डेल्टामेथ्रीन २.८ % ई सी फॉर्मुलेशन मधलं कीटक नाशक ९ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्या. या मुळे सुरवाती अवस्थेत मध्ये आंब्याच्या मोहोरावर येणाऱ्या तुडतुड्या पासून संरक्षण होईल.
दुसरी फवारणी :-
दुसरी फवारणी पहिल्या फवारणीच्या १५ दिवस नंतर करावी. एक कीटक नाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशका मध्ये लाम्बडा सायलोथ्रीन ५ % इ सी फॉर्मुलेशन मधलं कीटक नाशक ६ मिली + हेक्साकोनॅझोल ५ % इ सी बुरशीनाशक १० मिलीप्रती १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी , या फवारणी मुळे आंब्याच्या मोहोराचे संरक्षण वेगवेगळ्या रस शोषक किडींन पासून तसेच वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांन पासून होते.
तिसरी फवारणी :-
तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीच्या १५ -२० दिवसांनंतर करावी. या मध्ये सुद्धा दोन घटक घेतल्या जातात एक कीटक नाशक आणि एक बुरशी नाशक , कीटकनाशका मध्ये इमाडिक्लोप्रिड १७. ८ % एस एल ४ मिली + कार्बनडीझम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्लू ची हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.
या फवारणी मुळे आंबा पिकाचे मोहोराचे संरक्षण रसशोषक किडी तसेच करपा रोगापासून होते.
चौथी फवारणी :-
चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीच्या १५-२० दिवसा नंतर करावी या फवारणी मध्ये सुद्धा एक कीटक नाशक + एक बुरशीनाशक घेतले जाते . कीटकनाशका मध्ये थायोमिथोक्साम २५% डब्लू जी ५ ग्राम + झीनेब ६८% + हेक्साकोनॅझोल हे संयुक्त बुरशी नाशक २० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी घेतांना फवारणी हि संपूर्ण झाडावर घ्यायची आहे फक्त मोहोरावर न घेता.
या फवारणीचा आंबा पिकाला असा फायदा होणार आहे कि वेगवेगळ्या रसशोषक किडी तसेच भुरी रोगा पासून चांगल्या प्रकारे संरक्षण होणार आहे.
पाचवी फवारणी :-
पाचवी फवारणी हि जैविक फवारणी घेतल्या जाते या मध्ये एक जैविक कीटकनाशक आणि एक जैविक बुरशीनाशक घेतले जाते. जैविक कीटकनाशक मध्ये व्हर्टिसिलिअम लेकानी आणि जैविक बुरशीनाशका मध्ये सुडोमोनास फ्लुरोसन्स ४० मिली प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
या मुळे वेगवेगळ्या रसशोषक किडी, मर रोग, करपा रोगाचा अतिशय चांगल्या प्रमाणात कंट्रोल होतो.
आंबा फळ गळ नियोजन :-
तर शेतकरी मित्रांनो ह्या पाच फवारण्या झाल्या नंतर मोहोर व्यवस्थित सेट होईल. ज्या वेळेस फळे साधारण पाने ज्वारी च्या आकाराचे असतील त्या वेळेस एक जिब्रेलिक ऍसिड ची फगवारणी घेण्यात येते . या मध्ये जिब्रेलिक ऍसिड १ ग्रामी + ऍसिटोन ६० मिली + १०० ग्राम चिलेटेड झिंक १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी ( एक एकर साठी)
या मुळे सेटिंग खूप चांगल्या प्रकारे होते व जास्तीत जास्त फळे झाडांवर लागतात , फळांची गाळ कमी होते व फळांचा आकार आणि संख्या सुरवाती पासूनच सुधारण्यास मदत होते.
फवारणी करतांना ह्या गोष्टी लक्ष्यात असू द्या :-
१. फवारणी साठी पाण्याची मात्र अंदाज नुसार घ्याची आहे. खूप छोटी झाडे असतील तर ४ -५ लिटर पाणी लागते , माध्यम आकाराची झाडे असतील तर १५ लिटर पाणी लागते ,मोठी झाडे असतील तर १५ -२० लिटर पाणी लागते .
२. झाडांच्या वयानुसार , घेऱ्यानुसार, आकारमानानुसार, पाणी द्यायचे आहे.
३. फवारणी साठी चांगल्या प्रकारचे मोजणं वापरावे.
४. फवारणी घेतांना संपूर्ण बागे वर घ्या एखादं झाड चांगलं आहे त्या झाडाला सोडून द्यायचे नाही निरोगी असेल तरी फवारणी घ्या. त्या वर देखील खूप छोट्या प्रमाणात किंवा सुप्त अवस्थेमध्ये रोग व कीड असू शकते.
५. फवारणी घेतांना शक्यता सकाळी १० च्या आधी किंवा सायंकाळी ४ च्या नंतर घायची आहे.
६. फवारणी मध्ये स्टिकरचा वापर केला पाहिज़े.
हे सुध्धा वाचा
रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान आणि कांद्यामधील रोग नियंत्रण कशे करावे
https://krushigyan.com/rabi-onion-cultivation-and-disease-control/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
INFORMATIVE