रब्बी हंगामात पाण्याची कमतरता? कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी सविस्तर वाचा
मी सौरव विलासराव गायकवाड, बीएससी कृषी आणि एमएससी पर्यावरण या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेतलेले असून, गेल्या दोन वर्षांपासून कृषी क्षेत्रातील खासगी कंपनीत कार्यरत आहेत. माझा यांचा कृषी पिकांच्या पाणी व्यवस्थापनात अनुभव आहे, ज्यामुळे मी शेतकऱ्यांना त्यांचे पीक व्यवस्थापन प्रभावीपणे कसे करावे यावर मार्गदर्शन करत असतो आज आपण रब्बी काळातली पाणी व्यवस्थापन कशे करावे जेणे करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल ते आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून बघणार आहे.
रब्बी हंगामातील पीक माहिती :
1. गहू (Wheat):
पीक कालावधी: 100 ते 120 दिवस
महाराष्ट्रातील लागवड क्षेत्र: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी गव्हाच्या क्षेत्रात थोडी घट दिसून आली आहे, तरीही गहू महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केला जातो.
2. हरभरा (Chickpea):
पीक कालावधी: 90 ते 110 दिवस
महाराष्ट्रातील लागवड क्षेत्र: मागील वर्षाच्या तुलनेत हरभऱ्याची लागवड वाढली आहे कारण हे कमी पाण्यावरही तग धरते.
3. मका (Maize):
पीक कालावधी: 90 ते 120 दिवस
महाराष्ट्रातील लागवड क्षेत्र: मक्याची रब्बी हंगामात लागवड काही प्रमाणात झाली असून, बाजारातील मागणीनुसार ह्या पिकात वाढ आहे.
गहू, हरभरा, मका पिकांसाठी पाणी व्यवस्थापन:
1. गहू (Wheat):
प्रारंभिक पाणी: गव्हाच्या बियांच्या उगवणीसाठी लागवडीवेळी 5-6 सें.मी. पर्यंत माती ओलसर असावी. या अवस्थेत प्रथम पाणी देणे आवश्यक आहे.
महत्वाच्या अवस्था:
कुडी फवारणी (Tillering stage) – पेरणीनंतर 25-30 दिवसांनी. ह्या अवस्थेत कमी पाण्याचा वापर करावा.
फुलोरा फवारणी (Flowering stage) – पेरणीनंतर 55-60 दिवसांनी.
धान्य भरणी (Grain filling) – पेरणीनंतर 75-85 दिवसांनी.
पाण्याचे प्रमाण: प्रत्येकी 50-60 मिमी पाण्याचा वापर करावा, परंतु मृद्रातल्या ओलाव्यानुसार ते कमी-जास्त होऊ शकते.
2. हरभरा (Chickpea):
प्रारंभिक पाणी: हरभऱ्याच्या पेरणीनंतर 3-4 दिवसांनी पाणी दिल्यास बियांचे अंकुरण जलद होते.
महत्वाच्या अवस्था:
पान फवारणी (Branching stage) – पेरणीनंतर 30-35 दिवसांनी.
फुलोरा फवारणी (Flowering stage) – पेरणीनंतर 55-60 दिवसांनी.
शेंगा भरणी (Pod development) – पेरणीनंतर 75-80 दिवसांनी.
पाण्याचे प्रमाण: प्रत्येक पाण्यात 40-50 मिमी पाणी देणे पुरेसे आहे, परंतु उगवणीनंतरचे दिवस पावसावर अवलंबून असतील.
3. मका (Maize):
प्रारंभिक पाणी: मकाच्या बियांना अंकुरण्यासाठी भरपूर पाणी द्यावे लागते. पेरणीनंतर लगेच पहिल्या आठवड्यात पाणी द्यावे.
महत्वाच्या अवस्था:
रोप विकास (Vegetative growth) – पेरणीनंतर 20-25 दिवसांनी.
गर्भधारण (Silking) – पेरणीनंतर 55-65 दिवसांनी.
धान्य भरणी (Grain filling) – पेरणीनंतर 75-85 दिवसांनी.
पाण्याचे प्रमाण: मकाच्या प्रत्येक पाण्यात 50-60 मिमी पाण्याचा वापर होतो.
प्रत्येक रब्बी पिकाच्या वेगवेगळ्या विकासाच्या अवस्थेनुसार योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते. पाणी कमी असताना शक्यतो अधिक महत्वाच्या अवस्थांमध्ये पाणी द्यावे, त्यामुळे पाण्याचा योग्य वापर होतो.
हे सुध्धा वाचा
ह्या पाच फवारण्या करतील आंबा मोहोराचे संरक्षण
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL