ह्या वाणांची लागवड करून घ्या हरभरा पीकामध्ये भरघोस उत्पादन ! संपूर्ण नियोजन

ह्या वाणांची लागवड करून घ्या हरभरा पीकामध्ये भरघोस उत्पादन ! संपूर्ण नियोजन
ह्या वाणांची लागवड करून घ्या हरभरा पीकामध्ये भरघोस उत्पादन ! संपूर्ण नियोजन

ह्या वाणांची लागवड करून घ्या हरभरा पीकामध्ये भरघोस उत्पादन ! संपूर्ण नियोजन

हरभरा पीक विषयी सामण्य माहिती :-

सामण्या नाव = हरभरा , चना

शास्त्रीय नाव = सायसर अरेंनटिनियम

मुळ उगम = आशिया

गुणसूत्र क्रमांक 20 = 16

हरबरा लागवड :-

हरभरा लागवडीसाठी पेरणीची वेळ :-

1) जिरायत हरभऱ्याची पेरणी सप्टेंबर अखेर अथवा ऑक्टोबर पर्यंत करावी.

2) हरभरा पेरणी नंतर सप्टेंबर च्या शेवटी किंवा ऑक्टोंबरच्या सुरवातीस पडणाऱ्या पावसाचा हरभऱ्याचा उगवणीस व वाढीस चांगला फायदा होतो.

३) हरभऱ्याची पेरणी  म्हणजेस बियाणे खोलवर ९० cm वर पेरणी करावी.

४) बागायत क्षेत्रात पाणी असल्यामुळे पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान करावी तसेत बागायत क्षेत्रात कमी खोलीवर म्हणजे ५ cm हरभरा पेरणी केल्यास चालते.

५) पेरणीस जास्त ऊशीर झाल्यास किमान तापमान कमी होऊन उगवण उशीरा आणि कमी होते. पीकाची वाढ कमी होऊन फांदया व फुले कमी लागतात. यासाठी जीरायत तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करावी.

६) पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० cm आणि दोन रोपातील अंतर १५ cm राहील अशा पद्धतीने पेरणी करावी. म्हणजे प्रती एकरी अपेक्षीत रोपांची संख्या मिळते.

हरभरा लागवडीसाठी बीजप्रक्रिया :-

१) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरची किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डेझीम प्रती किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.

हरभरा लागवडीसाठी पाणी व्यवस्थापन :-

१) हरभरा पीकाला सर्वसाधारण पणे २५ cm पाणी लागते.

२) प्रत्येक वेळे पाणी प्रमाणशील देणे महत्त्वाचे आहे. जास्त पाणी दिल्यास पीक उभळन्याची शक्यता असते.

३) जमिनीस फार मोठ्या भेगा पडु देऊ नये.

४) पीकास एक पाणी दिल्यास ३० टक्के दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनास १०० टक्क्यांपर्यंत वाढ होते.

५) जमिनीत पाणी कमी असल्यास आणि एकच पाणी  देणे शक्य असेल तर पीकाला फुले येऊ लागताच पाणी दयावे.

६) मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे असे, पाणी दयावे भारी जमिनीत ३० ते ३५ दिवसांनी पहिले व दुसरे पाणी ६० ते ७० दिवसांनी दयावे.

हरभरा लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत :-

१) खरीफ हंगामातील पीक निघाल्यानंतर त्या जमिनीची खोल नांगरामी करुण करावी. हरबऱ्याचे मूळ खोल जात असल्यास जमिण भुसभुसीत करणे गरजेचे आहे.जमीन भुसभुसीत झाल्यावर जमिनीतील काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.

२) शक्य असल्यास एकरी दोन टन चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागत करताना शेतात पसरून मातीत चांगले मिसळून दयावे सोबतच गांडूळ खात टाकले तरी उत्तमच.

३) यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रती १० किलो बियाण्यास गुळच्या थंड द्रावणातून बीजप्रक्रिया करावी.

हरभरा लागवडीसाठी पेरणीची पद्धत आणि बियाणाचे प्रमाण :-

१) देशी हरभ्याची पेरणी पावरीणे किंवा तीफणीने करावी.पेरणीचे अंतर हे ३० x १० cm ठेवावे.

२) लाहान दाण्याच्या वाणाकरीता ६० ते ६५ किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. तर मध्यम दाण्याच्या वाणाकरीता. ६५ ते ७० किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते आणि टपोऱ्या दाण्याच्या वाणाकरीता १०० किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. तर जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरीता  १२५ ते १३० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.

हरभरा लागवडीसाठी खतमात्रा :-

१) हरभऱ्याला हेक्टरी २५ किलो नत्र व हेक्टरी ५० किलो स्फुरद व २ टक्के युरीयाची फवारणी करावी.

हरभरा लागवडीसाठी आंतरमशागत :-

१) पीक २० त्ते २५ कोळपनी दिवासाचे असताना पहिली कोळपनी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपनी करावी.

२) कोळपनी नंतर दोन रोपातील तन काढण्या करीता आवश्यकते नुसार खुरपनी करवी.

हरभरा काढणी :-

१) १०० ते ११० दिवसांनी पीक चांगले तयार होते.

२) शेतातील सर्व भागांमधील पीक व पाने वाळल्यावर पाणे झडतात म्हणून पीक परीपक्व झाल्यावर कापनी करावी. कापनी जमिनी पासून करवी.

३) पीक ओलसर असताना कापनी करू नये.

४) यानंतर दाण्यास ५ ते ६ दिवस कडक उण दयावे.

हरभरा उत्पादन :-

१) अशा प्रकारे हरभऱ्याची शेती केल्यास २५ ते ३० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

२) यासाठी पीकाचे योग्य नियोजन व व्यवस्थापन होने गरजेचे असते.

दर्जेदार उत्पादनासाठी काही सुधारित वाण :-

हरभऱ्यामध्ये देशी वाण व काबुली वाण असे दोन प्रकार आहेत.

1) खालील वाणांची निवड कोरोडवाहू क्षेत्रा मध्ये प्रामुख्याने केल्या जाते हे वाण अतिशय कमी पाण्यात किंवा बिना पाण्याचे येऊ शकतात .

विजय
दिग्विजय
फुले विक्रम

2) बागायती क्षेत्रा साठी खालील वाणांची निवड करावी.

विशाल
फुले विक्रांत 
पिकेव्ही -२
पिकेव्ही -४
कृपा

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL

बीज प्रक्रिया का ठरते पिकांन साठी वरदान ? हे आहेत फायदे आणि पद्धत

https://krushigyan.com/methods-and-bensfits-of-seed-treatment/

 

Saurav Gaikwad

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

Related articles

3 thoughts on “ह्या वाणांची लागवड करून घ्या हरभरा पीकामध्ये भरघोस उत्पादन ! संपूर्ण नियोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *