कृषिदूतांकडून विद्यार्थांना स्वच्छता व गाजर गवत निर्मूलनाबद्दल मार्गदर्शन
कृषिदूतांकडून विद्यार्थांना स्वच्छता व गाजर गवत निर्मूलनाबद्दल मार्गदर्शन
अकोला – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय अकोला येथे शिकत असलेले ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत योगेश उगले चेतन अगळते आकाश मोगल यांनी मासा येथे स्वच्छ्ता व गाजर गवत निर्मूलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
जबलपूर येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तण संशोधन संस्थेच्या निर्देशानुसार दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. गाजर गवतापासून मानवी आरोग्यास संभावित धोके तसेच पिकास होणारे नुकसान याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये गाजर गवताला आपण कश्याप्रकारे नियंत्रण करू शकतो याबद्दलची माहिती विद्यार्थांना देण्यात आली तसेच स्वच्छ्ता शपथ सुद्धा देण्यात आली.
अकोल्याचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नागरे तसेच प्रा. डॉ. गिरीश जेऊघाले, डॉ. ठाकूर, डॉ. धुळे, डॉ. नीलम कनसे, डॉ. अनिल खाडे, डॉ. काळे, डॉ. कोकाटे व कृषी विज्ञान केंद्र अकोल्याचे डॉ. ठाकरे, डॉ. देशमुख, यासाठी कृषी महाविद्यालय डॉ. तुपकर यांचे मार्गदर्शन लाभले.
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL
गोपाल उगले