दीड एकरामध्ये शेतकऱ्याने घेतले तब्बल दोन लाखाचे उत्पन्न

दीड एकरामध्ये शेतकऱ्याने घेतले तब्बल दोन लाखाचे उत्पन्न
दीड एकरामध्ये शेतकऱ्याने घेतले तब्बल दोन लाखाचे उत्पन्न

दीड एकरामध्ये शेतकऱ्याने घेतले तब्बल दोन लाखाचे उत्पन्न

दीड एकरामध्ये फलटण तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले तब्बल दोन लाखाचे उत्पन्न ! तेही फक्त ६५ दिवसाच्या कालावधी मध्ये. हे सगळं शक्य झालं ते फक्त इनोरा बायोटेक पुणे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि नियमित पाठपुराव्या मुळे.

शेतकरी मित्रांनो मी सौरव विलास गायकवाड, आज माझ्या लेखातून मांडणार आहे एका यशस्वी शेतकऱ्याची गाथा.

प्रताप रामदास मुळीक, राहणार – मुळीकवाडी, तालुका- फलटण, जिल्हा- सातारा. ह्या शेतकऱ्याने दीड एकरामध्ये काशीफळ /मोठा भोपळा/ डांगर लागवड करून घेतले विक्रमी उत्पादन . त्यांनी उन्हाळ्यामध्ये नांगरणी आणि रोटर करून जमीन तयार केली व इनोरा कंपनीचे एकरी २ टन गांडूळ खत वापरून परत वखरणी करून जमीन तयार केली.
१० जूनच्या सुमारास सरी वरंबा पद्धतीवर “दिशा” नावाची काशीफळाची जात लावली.  दोन सरी मधले अंतर ५-६ फूट ठेवले आणि दोन झाडा मधले अंतर २.५-३ फूट इतके ठेवले.

एक साधारणतः १० दिवस नंतर पिके तीन पानावर आल्यावर त्यांनी इनोरा कंपनी चे सेंद्रिय प्रॉडक्ट्स पिनाक आणि इनोवाम ची आळवणी पिकान भोवती केली. पिनाक अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश चे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देते. उत्तम फुल व फळ धारणा होते व पिकांची कीड व रोगांविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढवते. आणि इनोव्हाम पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी मदत करते.

पहिली फरवारणी वेल सोडायला लागल्यावर इनोरा कंपनीच्या मायक्रोमस्ट सेंद्रिय प्रॉडक्ट्सची घेतली.  मायक्रोमस्ट हे सूक्ष्म अन्नद्र्व्यचा पुरवठयासाठी द्रवरूप खत आहे. त्यांनी कीड व्यवस्थापन सुद्धा इनोराच्या तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली केले. आधी फळ माशीला घेराव घालण्यासाठी त्यांनी इनोरा कंपनी जैविक कीडनाशक ग्रबहिट एकरी १ लिटर वापरले. फळमाशी हि अतिशय घातक असते तिला वेळीच आळा  घालणे गरजेचे असते.
दुसरी कीड म्हणजे पांढरी माशी होय त्यांनी या पांढरी माशीचा प्रादुर्भाव  टाळण्यासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे कीटकांना आकर्षित करण्यासाठी वापरलेत. इनोरातील तज्ञ लोकांच्या सांगण्या प्रमाणे शेतात जागो जागी टी आकाराचे पक्षी थांबे लावलेत.

एक साधरणतः दीड ते दोन महिन्यानी पहिली फळ तोडणी त्यांनी केली जवळ पास पहिल्या तोडणीला प्रताप मुळीक यांना १४ टन उत्पन्न मिळाले. आणि एक आठवड्या नंतर दुसरी  तोडणी केली असता १२ टन पर्यंत  उत्पादन मिळाले. सरासरी ७ रुपये किलो त्यांना मार्केट भाव मिळाला म्हणजे एकूण २६ टन च्या हिशोबानी १८२००० चा मोबदला मिळाला त्यात त्यांना जवळपास ५०००० खर्च आला त्या मध्ये २५००० पर्यंत त्यांना वाहतुक खर्च आला आणि उर्वरित २५००० पर्यंत लावणी ते काढणी पर्यंत.

शेवटी त्यांनी सर्व काशीफळाचे वेल उपटून मजुरांच्या साहाय्याने जमा करून १०० फूटचा ढीग लावून इनोरा बायोटेकची कंपोस्ट ढीग पद्धतीने सेंद्रीय खत तयार केले. त्यातून त्यांना अंदाजे १ टना पर्यंत सेंद्रिय खत शेताच्या बांधावरच उपलब्ध होईल.

प्रगतशील शेतकरी प्रताप मुळीक
७०५७९६०२१५

इनोरा बायोटेक चे सर्व सेंद्रिय प्रॉडक्ट्स खालील फोननंबर किंवा लिंक वर उपलब्ध होतील.

फो. ९५५२५०३२५८  https://www.indiamart.com/inora-biotech/?utm_campaign=imob_company_share&utm_medium=social&utm_source=social

 

Saurav Gaikwad

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

Related articles

6 thoughts on “दीड एकरामध्ये शेतकऱ्याने घेतले तब्बल दोन लाखाचे उत्पन्न

    1. आपल्याला 350 ऐकरात प्लॅन बसवायचा आहे. जमेल ka तुम्हाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *