उन्हाळी भुईमुग लागवडीचे तंत्रज्ञान आणि भुईमुग विषयी बरेच काही
उन्हाळी भुईमुग लागवडीचे तंत्रज्ञान आणि भुईमुग विषयी बरेच काही
उन्हाळी भुईमुग
भारतात भुईमुग लागवडीचे खरीफ, रबी आणि उन्हाळी अशे तीन हंगाम आहेत खरीफात भुईमुग पीकाची लागवड मोठ्या प्रमाणत होते पण उन्हाळी हंगामात या पीकाची उत्पादकता जास्त असल्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता असते अशे शेतकरी उन्हाळी हंगामात हे पीक घेतात.
जमिन :-
भुईमुग पीकासाठी मध्यम व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन, वाळू व शेंद्रीय पदार्थ असलेली निसरीत जमिन योग्य- असते. ही जमिन नेहमी भुसभुसीत राहत असल्या कारणाने’ मुळांची चांगली वाढ होते
हवामान:-
उन्हाळी भुईमुग पेरणी किंवा लागवडीचा कालावधी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी हा काळ लागवडीसाठी उत्तम काळ आहे पण २० जानेवारी ते ५ फेब्रुवारी हा काळ अत्यंत योग्य मानल्या जातो. कारण या मध्ये पेरणी केल्यास पीकाला योग्य हवामान मिळते.
जातींची निवड :-
TAG – 24 – कालावधी हा ११० दिवसांचा आहे.
T61-26 – कालावधी हा ११० दिवसांचा आहे.
TG-37 कालावधी हा १०० दिवसांचा आहे.
TG-51 कालावधी हा ९५ दिवसांचा आहे.
J-11, GG-2, GG-4, GG-5, GG-6, GG-20, GAUG-1
वरील सर्व जाती उन्हाळी भुईमुग साठी योग्य आहेत.
बिज बीजप्रक्रिया :-
बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशक – ट्रायकोडर्मा PRD याची बीजप्रक्रिया करावी.
4-5 किलो ट्रायकोडर्मा प्रती किलो बियान्याला लावावे. ट्रायकोडर्मा हे फ्रेश असावं.
बियाण्याद्वारा पसरणाऱ्या रोगांचे नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने करते.
रासायनिक बुरशीनाशक प्रक्रियेसाठी कारबॉझीन + थायरम (विटाव्हॉस्क) हे ३ ते ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास याचा वापर करावा.
रासायनीक बुरशीनाशक नंतर रासायनीक किटकनाशक रिहांश ३ मिली प्रति किलो बियाण्यास वापरावे फॉसफरस किंवा रायझोबीयम याची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकता.
तीनही बुरशीनाशक लावायचे असल्यास आधी रासायनी बुरशीनाशक मग रासायनीक किटकनाशक व शेवटी ट्रायकोडर्मा अशा पद्धतीने लावावे.
जमिनीची पूर्वमशागत :
जमिनीची चांगली मशागत करावी. जमिन ही चांगल्या प्रकारे नांगरून घ्यावी व जेवढी भुसभुशीत करता येइल तेवढी करावी.
पिकाच्या दोन ओळीतल अंतर हे ३० cm असावे झाडातील अंतर है १० cm असावे.
पेरणी करतांनी किमान ४० किलो बियाणे वापरावे जमिन हे ७-८ तास पाणी देऊन थंडी करावी व त्यानंतर ट्रायकोडर्मा – ४ किलो व सुडोमोनस -२ कीलो हे शेणखतात मिसळून जमिनीवर फेकावे.
त्यानंतर जिप्सम एकरी 100 ते 200 किलो हे पेरणी पूर्वी वापरावे जिप्सम उपलब्ध नसल्यास सिंगल सुपर फॉसफेट एकरी ४ – बॅग पेरणी पूर्वी जमिनीवर फेकावे.
पेरणी च्या वेळेस रासायनीक खत NPK हे द्यायचे आहे.
पेरणी करताना १०:२६ : २६ – १ ते २ बॅग + सिंगल सुपर फॉस्फेट → ३ बॅग (अगोदर दिले नसल्यास) + पोटश १/2 + १ बॅग याचा वापर करावा.
सल्फर दाणेदार (अधी वापरले नसल्यास) १० किलो हे पेरणी च्या वेळेस देणे.
झिंक सल्फेट – १० किलो बोरॅक्स – 2 किलो हे आपल्याला पेरणी करायच्या वेळेस फेकावे पेरणी झाल्यावर एक ते दीड तास पाणी दयावे. तसेच उगवण होई पर्यंत २ किंवा ३ वेळा पाणी द्यायचे. पिकाची उगवण झाल्यानंतर फुले लागेपर्यंत 15 20 दिवासांचा ताण द्यावा.
हे पीक उष्ण व समतउष्ण कटीबंधातील आहे. पेरणीच्या वेळी रात्रीचे तापमाण १४° औण सेलसीएस पेक्षा जास्त कमी असावी तसेच फुलोरा अवस्थेदरम्याण या पीकाला दिवसाचे तापमान 24-25° औण सेलसीएस लागते अन्यथा फुलधारणा क्षमतेवर याचा विपरीत परीणाम होतो भरपूर सूर्यप्रकाश या पीकाचा वाढीस अत्यंत महत्त्वाचे असते.
बियाणाचे प्रमाण :-
पेरणी करताना 100 ते 125 किलो प्रति हेक्टर बियाणे लागतो बीज निवडताना बीयाणाचे प्रमाण ठरवताना आपण कोणते बियाणे निवडले आहे त्याचा आकार किती आहे, उगवण क्षमता कशा पद्धतीची आहे त्या सर्व गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
58 – 11 बियाणे TAAG – 24 १०० किलो या वाणांसाठी तसेच फुले प्रगती, TPG-41, JG-501 या वाणांसाठी १२५ किलो बियाणे लागते. तसेच पसऱ्या व निमपसऱ्या वाणांसाठी 80 ते 85 किलो बियाणे वापरा.
पाणी व्यवस्थापन :-
खरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस), आऱ्या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. भुईमुग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी (आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये.पीक बाष्पोपर्णोत्सर्जनाच्या ८० टक्के पाणी दिवसाआड द्यावे.
काढणी आणि उत्पादन :-
भुईमुगाचा पाला पिकला दिसू लागल्यास व शेंगाचे टरफर कडक टणक बणून आतल्या बाजूने काळसर दिसू लागल्यास काढणी करावी. काढणी करुण, शेंगा तोडूण झाल्यावर त्यामधील ओलाव्याचे प्रमाण 8-9 टक्के पर्यंत खाली आणावे. त्यामुळे शेंगाणा बुरशी निंत्रणाकरिता येत नाही. अशाप्रकारे नियोजन केल्यास उन्हाळी भुईमूगाचे २५ ते ३० क्विंटल हेक्टर उत्पादन मिळू शकते.
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL
TAGS : #उन्हाळी भुईमुग, #उन्हाळी भुईमुग, #उन्हाळी भुईमुग, #उन्हाळी भुईमुग, #उन्हाळी भुईमुग लागवडीचे तंत्रज्ञान आणि भुईमुग विषयी बरेच काही