बायोडायनॅमिक खत म्हणजे काय व बिडी ५०० आणि बिडी ५०१ यांचा पिकांना कसा फायदा होईल
बायोडायनॅमिक खत म्हणजे काय व बिडी ५०० आणि बिडी ५०१ यांचा पिकांना कसा फायदा होईल
तर शेतकरी मित्रानो मी सौरव विलास गायकवाड आज तुमच्यासाठी नवीन लेख घेऊन आलो आहे. नवीन लेख म्हणजे असं काही नवीन माहिती नाही परंतु जवळ पास ७० % शेतकऱ्यांना माहिती नसलेली माहिती आज तुम्हाला माझ्या लेखणीतून सांगण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असेल.
आपण आज बायोडायनॅमिक (Biodynamic) शेती बद्दल जाणून घेणार आहोत. बायोडायनॅमिक हा शब्द ग्रीक भाषेतून उदयास आला आहे. बायो म्हणजे सजीव आणि डायनॅमिक म्हणजे क्रियाशील. या शेती पद्धती मध्ये कोस्मिक एनर्जी (ब्रम्हांडनीय शक्ती) चा प्रभाव शेती वर कसा होतो हे सांगितले आहे. सन १८६१ ते १९२५ या काळात ऑस्ट्रिया येथे रुडॉल्फ स्टेनर यांनी बायोडायनॅमिक शेती पध्दत जगा समोर मांडली. त्यांना बायोडायनॅमिक शेतीचे जनक म्हणून सुध्धा ओळखल्या जाते.
बायोडायनॅमिक शेती म्हणजे तरी नेमकं काय??
ह्या शेती पद्धती मध्ये कुठल्या ही विषारी जनक औषधींचा वापर न करता निसर्गा पासून तयार करण्यात आलेल्या औषधींचा शेतात उत्पन्न वाढवण्यासाठी वापर करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर सेंद्रिय शेतीच.
बायोडायनॅमिक शेती पद्धती मध्ये सूर्य,चंद्र ,पृथ्वी,शनी,रास,नक्षत्र, हे सर्व नाना प्रकारचे अवकाशातील ग्रह ह्या शेती चे प्रमुख घटक मानले जातात. गाय चे मूत्र आणि शेन व शेतातली पिकांचे अवशेष सुध्धा तेवढच महत्वाचे भाग ठरतात.
बायोडायनॅमिक खते :-
बिडी ५०० :- (भूमी सुधारक काऊ हॉर्न मॅन्युअर/Cow Horn Manure)
बिडी ५०० हे 25 ग्राम खत एका एकर साठी पुरेसे आहे. 20 लिटर पाण्यात 25 ग्राम बिडी खत टाकून कमीत कमी एक तास ढवळावे जेणे करून खता मधले जिवाणू सक्रिय आणि गतिशील होतील.
त्यात सी पी पी ( cow pit pat ) २५० gram टाकून परत मिश्रण एक तास ढवळावे. या नंतर झाडूच्या किंवा कडू लिंबाच्या डहाळीने समान एका एकरावर शिंपडून घ्यावे. बिडी ५०० शिंपडताना आपल्या डावी कडे 15 फूट आणि उजवी कडे 15 फूट द्रवणाचे थेंब पडतील याची काळजी घ्यावी. बिडी ५०० द्रवणाचा एक थेंब १५० ते ६०० फूट पर्यंत परिणाम करतो. बिडी ५०० द्रावण शिंपडताना जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे. हे मिश्रण वर्षातून दोनदा शिंपडले तर नक्कीच उत्पादन वाढ होईल.
बिडी ५०० चे फायदे :-
१. जमिनीची सुपीकता वाढते जमीन भुसभुशीत होते.
२. असंख्य जिवाणूंची वाढ होते. जमिनीत ओलावा दीर्घ काळ टिकून राहतो. सूक्ष्म जीवनाची आणि गांडूळांची संख्या वाढते.
३. पिकांची मुळे खोलवर गेल्यानी मूलद्रव्य प्राप्त होतात.
४. जमिनीत अझॉक्टोबॅक्टर, पी एस बी, रायझोबियम, व्हाम , एक्टिनोमायसिन, प्रोटोझोवा अशे नाना प्रकारचे जिवाणू झपाट्याने वाढतात.
बिडी ५०१ :-
बिडी ५०१ हा एक प्रकारचा सिलिका आहे जो की बायोडायनॅमिक पद्धत वापरून तयार केलेले असतो. १ ग्राम बिडी ५०१ एका एकरा साठी पुरेसे आहे. १५ लिटर कोमट गरम पाण्यात एक ग्रॅम बिडी ५०१ टाकून चांगले ढवळून घ्या जेणे करून जिवाणू सक्रिय होतील. वाऱ्याची दिशा पाहून पंपाचे नोझल उलटे करून द्रावण फवारावे. झाडांच्या पानांवर थेंब पडतील याची काळजी घ्यावी. हे द्रावण सूर्योदय पूर्वीच फवारावे. संध्याकाळी बिडी ५००+ सी पी पी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बिडी ५०१ फवारले तर पिकांना नक्कीच फायदा होईल व पिके सुटसुटीत व हिरवेगार दिसतील.
बिडी ५०१ चे फायदे :-
बिडी ५०१ मध्ये सिलिका तेल वर्गीय पिकांन मध्ये वापरल्यावर बियाणांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते. तसेच दानांच्या आणि फळांच्या आकारात वाढ होते. फळ गळ फुल गळ होणारी थांबते.
बुर्शीजन्य रोगान पासून बिडी ५०१ संरक्षण करते. जसे की तांबेरा, भुरी, केवडा, मूळकूज, खोडकुज, फळकुज, पानांवरील डाग.
झाडांची उंची , फुले फळे पाने यांची संख्या वाढते. सूर्याची उष्णता आणि प्रकाश यांचं समन्वय पिकाशी करण्यास मदत करते.
रस रसशोषक किडींना अळा बसतो. सिलिकायुक्त रस शोषल्याने त्यांना इजा होते व ते पिकांन पासून दूर राहतात.
बायोडायनॅमिक कॅलेंडर :-
जवळ पास ७० देशातले शेतकरी बायोडायनॅमिक कॅलेंडरच्या सह्या ने शेती करतात. बायोडायनॅमिक कॅलेंडर मध्ये सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत ते सुध्धा वैज्ञानिक स्पष्टीकरणा सह. जसे की पेरणी करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस कोणता, फवारणी कधी करावी, प्रत्येक पिकाची माहिती अगदी तंतोतंत असते . हे कॅलेंडर दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस प्रकाशित होते.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून २०२३ या वर्षाचे बायोडायनॅमिक कॅलेंडर तुम्ही पाहू शकता.
https://biodynamics.in/biodynamic-planting-calendar-2023/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा