Turmeric Rhizome Rot: हळदीचे कंद सडण्याची कारणे काय? कंदसड रोगाची लक्षणे आणि उपाय

Turmeric Rhizome Rot: हळदीचे कंद सडण्याची कारणे काय? कंदसड रोगाची लक्षणे आणि उपाय

Turmeric Rhizome Rot: हळदीचे कंद सडण्याची कारणे काय? कंदसड रोगाची लक्षणे आणि उपाय

हळद पिकात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दिसणारी समस्या म्हणजे कंदसड (Rhizome Rot). सुरुवातीला पाने पिवळी पडतात, कडेकडून वाळू लागतात. खोडाचा तळ मऊ व पाणथळ होतो. मुळे कुजतात आणि पुढे कंद मऊ, तपकिरी व कुजलेला दिसतो.कंदसड ही फक्त एका बुरशीमुळे होत नाही. जास्त ओलावा, खराब drainage, संक्रमित बेणे आणि soil-borne pathogens यांचा एकत्र परिणाम यामागे असतो.

कंदसड वाढण्याची मुख्य कारणे

-> शेतात पाणी साचणे

-> भारी व चिकणमातीची जमीन

-> पाण्याचा निचरा कमी असणे

-> सतत ओलसर root-zone

-> संक्रमित बेणे, संक्रमित माती किंवा पाणी

-> रोगट झाडांचे अवशेष शेतात राहणे

-> एकाच ठिकाणी वारंवार हळद/आले घेणे

कंदसड करणारे रोगकारक कोणते? (Rhizome Rot)

कंदसडीत दोन प्रकारचे रोगकारक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

1. Oomycetes

Pythium आणि Phytophthora हे Oomycetes आहेत.

Oomycetes हे fungus सारखे दिसणारे रोगकारक आहेत; पण ते true fungi नाहीत.

काही Oomycetes मध्ये zoospores तयार होतात. त्यांना flagella असल्यामुळे ते पाण्यात हालचाल करू शकतात.

म्हणून:

Pythium/Phytophthora → Oomycetes → motile zoospores → पाण्याशी संबंधित spread

2. True fungi

Fusarium आणि Rhizoctonia हे true fungi आहेत.

यांच्यात Pythium सारखे swimming zoospores नसतात.

Fusarium/Rhizoctonia → True fungi → non-motile propagules → माती/बेणे/debris संबंधित spread

म्हणूनच कंदसडीत पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Preventive Management

1. चांगला drainage

बेडमध्ये पाणी साचू देऊ नका. पावसानंतर पाणी लवकर बाहेर जाण्यासाठी योग्य चर आणि निचऱ्याची व्यवस्था ठेवा.

2. निरोगी बेणे

कुजलेले किंवा संशयास्पद बेणे वापरू नका.

3. Trichoderma

Trichoderma root-zone मध्ये स्थिरावून soil-borne pathogens सोबत competition करण्यास मदत करू शकते.

4. Pseudomonas

Pseudomonas fluorescens root-zone मध्ये colonize होऊन beneficial microbial protection देण्यास मदत करू शकते.

5. Bacillus subtilis

Bacillus subtilis हा spore-forming beneficial bacterium असून root-zone protection मध्ये उपयोगी ठरू शकतो.

Trichoderma, Pseudomonas आणि Bacillus यांचा preventive program मध्ये वापर करता येतो; मात्र प्रत्येक formulation ची compatibility पाहून application करणे योग्य आहे. ICAR/TNAU च्या turmeric recommendations मध्ये Trichoderma, Pseudomonas आणि Bacillus आधारित व्यवस्थापनाचा उल्लेख आढळतो.

Hydrogen Peroxide + Nano Silver

Hydrogen Peroxide (H₂O₂) हे oxidizing agent आहे.

योग्य concentration मध्ये ते microbial load कमी करण्यासाठी आणि root-zone sanitation मध्ये मदत करू शकते. Nano Silver मध्येही antimicrobial properties असतात.

म्हणून Hydrogen Peroxide + Nano Silver आधारित treatment काही परिस्थितीत root-zone sanitation साठी उपयोगी ठरू शकते.

Curative Management — कंदसड दिसल्यानंतर

रोग दिसल्यानंतर फक्त पानांवर spray करण्यापेक्षा root-zone treatment महत्त्वाचे आहे. TNAU च्या माहितीनुसार affected plants च्या आसपास drenching आणि drainage यावर भर दिला जातो.

STEP 1

रोगट झाडे ओळखा आणि शक्य असल्यास मुळांसह बाहेर काढा.

STEP 2

रोगट भागातील पाणी निरोगी भागात जाणार नाही याची काळजी घ्या.

STEP 3

Drainage सुधारून root-zone मधील अतिरिक्त पाणी काढा.

STEP 4

रोगाच्या परिस्थितीनुसार label-approved fungicide/oomycete-targeted treatment चे root-zone drenching करा.

उपलब्ध chemical options मध्ये:

Metalaxyl / Metalaxyl आधारित formulation

Pythium/Oomycete-associated rhizome rot मध्ये वापरल्या गेलेल्या पर्यायांपैकी एक. TNAU आणि ICAR च्या recommendations मध्ये metalaxyl किंवा metalaxyl + mancozeb आधारित पर्यायांचा उल्लेख आहे.

Metalaxyl + Mancozeb

काही turmeric recommendations मध्ये rhizome rot साठी वापराचा उल्लेख आहे.

Copper oxychloride

Affected root-zone मध्ये drenching साठी turmeric recommendations मध्ये वापराचा उल्लेख आहे.

महत्त्वाचे:

सर्व औषधे एकत्र मिसळू नका.

Active ingredient, formulation, label claim आणि crop-specific dose पाहूनच treatment निवडा.

एकाच fungicide group ची वारंवार पुनरावृत्ती करण्यापेक्षा योग्य mode-of-action rotation ठेवणे चांगले.

कंदावर बारीक पांढऱ्या/पिवळ्या किडीसारख्या “सुती” अळ्या दिसत असतील तर?

इथे कंदसड आणि Rhizome Scale यांची गल्लत होऊ शकते.

हळदीच्या कंदावर सुरुवातीला बारीक पांढऱ्या scale दिसू शकतात. पुढे त्या कंदाच्या growing buds जवळ जमा होतात. प्रादुर्भाव वाढल्यास कंद आकसतो आणि सुकू शकतो. ही Aspidiella hartii (Rhizome Scale) नावाची कीड असू शकते.

परंतु काही वेळेस कंद माशीच्या प्रादुर्भाव मुळे कंदा जवळ कंदा मध्ये बारीक सुत अळी आढळून येते तिचा नायनाट करण्यासाठी खालील औषध वापरू शकता.

Thiamethoxam 12.6% + Lambda-cyhalothrin 9.5% SC

नगदी पीक केळी: आधुनिक लागवड तंत्रज्ञान आणि एकात्मिक पीक संरक्षण

https://krushigyan.com/modern-banana-cultivation-crop-protection/

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/share/1FMhJ5TcHF/

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *