ऊस लागवड पद्धतीमध्ये बदल करून एकरी १०० टन उत्पन्न कसे मिळवायचे
ऊस लागवड
ऊस पीक विषयी सामान्य माहिती –
सामान्य नाव – शुगरकेन
शास्त्रीय नाव – सच्चरम ऑफिसिनॅरूम
मूळ उगम – न्यू गिनी
गुणसूत्र क्रमांक – 110-120
जमिनीची निवड आणि मशागत :-
उसासाठी कोणत्याही प्रकारची जमिन चालते फक्त ती उत्तम निचरेची हवी. सर्वात आधी जमीन उभी आडवी नांगरून काढावी व त्या मातीमध्ये शेनखत व गांडुळ खत मिसळावे.
उसासाठी सरी किती फुटाची असावी :-
जर तुमची जमीन हलक्या स्वरूपाची असेल तर 4.5 फुटी सरी घालावी चांगली जमीन असल्यास 5-6 फुट इतकी सरी तुम्ही घालू शकता.
लागवान :-
उसाच्या लागवडीसाठी तुम्ही co-86032, Phule-265, MS-10001 या वाणाचा उपयोग करू शकता. एक डोळा पद्धतीने अडसाली व दोन डोळा पद्धतीने पूर्व हंगामी लागवड तुम्ही करू शकता लगवडीच्या वेळी यूरिया, DAP, SSP, मॅग्नेशियम सल्फेट व मायक्रो न्यूट्रीयंट याचा बेसल डोज नक्की दयावा.
रोप लावत असाल तर आगोदर जमिन भिजून घ्यावी व ती जमिनीत व्यवस्थीत दाबून घ्यावी. रोपांना टप्प्या टप्प्यांनी खत दयावे जसे की 19:19:19, 12:61:00, 14:48:00, हयूमिक ऍसिड, कीटकनाशक बुरशीनाशक, बायोस्टीम्युलन्ट, अमिनो ऍसिड बेस टॉनिक व जिवाणू यांच्या आळवण्या घ्याव्या त्याच बरोबर काही संजीविके वापरावी जसे की (GA, BA, 68A). यांच्या फवारण्या 15 दिवसाच्या फरकानं कराव्या.
भरणी :-
उसाला 60 किंवा 70 दिवशी बाळभरणी दयावी. त्यासाठी युरिया, DAP, SSP या सारखी खते दयावी. त्यानंतर रोपे एक ते सव्वा महिण्यांची झाल्यावर रोपांन भोवती खत टाकुन 2 इंच माती सोडून दयावी. 80-120दिवसात उसाला मुख्य भरणी घालावी. मुख्य भरणीसाठी नंतर उसाला अमोनियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, युरिया, पोठ्याश या खतांचा डोज दर 15 दिवसाला दयावा.
कीड व्यवस्थापण :-
खोडकीड,कांडीकीड, हुमनी,मावा या किडी पिकावर येण्याची शक्यता असते तर त्यापासून पिकाला वाचवण्यासाठी क्लोरोपायरीफॉस यासारख्या किटकनाशकाचा उपयोग करावा. बुरशीचा प्रादुरभाव होऊ नए म्हणून बुरशीनाशकाचा वापर करावा.
पाणी व्यवस्थापण:-
उसाला जास्तीत जास्त ठिबक सिंचनाने पाणी दयावे.
ऊस लागवड पद्धतीमध्ये बदल करून एकरी १०० टन उत्पन्न कसे मिळवायचे :-
ऊसाच उत्पादन घेताना आपल्याला संख्या किती मिळणार आहे त्यावर समोरच अवलंबून असते. एकरी 40 हजार उसाची संख्या असेल व एका उसाच वजन 2 ते 2.5 किलो असेल तर 80-100 किलो ऊसाचे उत्पादन तुम्हाला मिळू शकेल. पश्चिम महाराष्ट्र ऊसाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केल्या जाते पण पाण्याचा आणि खताचा अमाप वापर खारपड होत चाललेल्या जमिनी, बदलत हवामान आणि नवीन रोगांचा फटका बसल्यामुळे ऊसाच उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी शेतीमधे महत्त्वाचे बदल करने खूप गरजेचे आहे.
रोप लावताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरी मधली व्यवस्थीत पणे माती काढून घेत व त्यामधे रोप लावून त्यावर अलगत पणे थोडी माती टाकायची व ते रोप नीट माती मध्ये दाबायचे आहे जर रोप व्यवस्थीत पणे दाबल्या गेले नाही तर त्याला फुटवे होत नाही व अजून बऱ्याच समस्या येऊ शकतात.
ऊसाची लागवड करताना दोन सरितील अंतर हे 5 फूट असावे व 2 रोपातले अंतर 1.2 फूट असावे भरपूर रोप किंवा बेने लावल्या पेक्षा ते योग्य अंतरावर लावने अत्यंत गरजेचे आहे. संख्या नियोजन साठी समजा एकरी 40 हजार ऊस असेल तर 5 x 1.2 फुट वर लागन कल्यास ७-८ फुटवे एक गड्ड्या मधे ठेवले तर आपल्याला ४० हजार ऊसाची संख्या मिळते.
ऊस शेती मधे लागवडीची पद्धत अत्यंत महत्त्वाची असते आणि लगवडी च्या 40-50 दिवसा नंतर ऊसाची मदर शुट म्हणजेच जेठा काढावा जेणेकरून सर्व फुटव्यांची समान वाढ होते. जेठा काढताना जेठा हा मोडलाच पाहिजे, कापून घेतल्यास तुम्हाला आहे तसा परत तो वाढू शकतो.
जेठा काढताना वरचा कोंब हा व्यवस्थीत पकडावा व एक हिसडा देऊन मोडून घ्यायचा. लागवड झाल्यावर शेतात खत फेकल्याने त्याचा फायदा होण्यापेक्षा ऊसाला आणि जमिनीला त्याचे नूकसन होऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही खतांचा डोस देता त्यावेळेला ‘खरीच्या मदतीने एखादी गरी मारून मारून घ्या किंवा खते टाकल्यावर त्याचा मागे कोळपे चालवा त्यामुळे खत बरोबर मातीचा आळ होतात. सुरवातीला दोन ते तीन डोस तुम्हाला दयावे लागतात.
ऊस शेतीला भरपूर पाण्यांची नाही तर नियोजनाची जास्त गरज असते. अमाप पाणी सोडल्याने जमिन खारपर होण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही 5 फूट अंतरावर ऊसाची लागवड करत असाल तर त्यामध्ये 9 इंचा पर्यंत ते 1 फूटा पर्यंत त जरी दोनी बाजूने ऊसाचा रूट झोन भिजला तरी ऊसाची पाण्याची गरज भागू शकते. लागवडी नंतरचे 4-5महिने हे अत्यंत महत्त्वाचे असतात. सुरवातीच्या काळामधे रोपाची वाढ, फुटव्यांची वाढ, व फुटव्यांची जाडी व पाणाची रुंदी हे व्यवस्थीत मिळवायचे असेल तर काही फवारण्या आळवण्या करणे अत्यंत गरजेचे असते.
ऊसाचे पाचट काढणे
2-3 टप्यांत उसाची पाचट सोलून घ्यावी जेणेकरून उसास हवा खेळती राहिल व उसाची वाढ चांगली होईल. ऊसाचे पाचट काढणे हे ऊसाचा जातीनुसार ठरते Phule 265, MS-१०००१, CO-८००५ या जातीमधे ऊसाचे पाचट काढले तर अश्या शेतामधे अनसा फुटने म्हणजे ऊसाचे कोंब फुटण्याची शक्यता राहते. अशा शेतामधे तुम्ही बुडातली पाला जरी काढून घेतला तरी चालेल. १८६०३२ या जाती मधे जेव्हा तुम्ही पाचट काढता त्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतामधले पाचट काढल्या नंतर कोब तुम्ही पुर्णपणे काढून टाकता व तुम्हाला पाहिजे तेवढ़ी संख्या तुम्ही ठऊ शकता.
उसाचे पाचट शेतातल्या शेतात कुजवण्यासाठी डिकंपोझर चा शक्केतर शेतकरी उपयोग करतात. बाजारात विविध कंपनीचे डिकंपोसझर उपलब्ध आहेत परंतू इनोरा या कंपनीचे डिकंपोझरचे चांगले परिणाम पाहव्यास मिळतात. तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन इनोराचे सर्व शेंद्रीय प्रॉडक्ट्स पाहू शकतात.
खत नियोजन :
पहिला डोस आबवणी स्टेज ला एकरी १ युरियाची बॅग, 2 SSP बॅग आणि 25 किलो पोट्याश ची गरज असते. अशा प्रकारे खते दिल्यास फुटव्यांची वाढ चांगल्या प्रकारे होईल व ऊसाची चांगली वाढ होण्यास सुरवात होईल.
दूसरा डोस यूरिया किंवा २४:२४.०४ यांचा २ बॅग व १२:३२:१६ च्या २ बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट १ बॅग एकरी दयावे.
तीसरा डोस तीसरा डोस हा अमोनियम सल्फेट ची १ बॅग , DAP च्या 3 बॅग व MOP च्या २ बॅग एकरी द्याव्या.
शेती विषयक माहिती साठी कृषी ज्ञानच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
अत्यंत उपयुक्त माहिती