सोयाबीन पिकाची यशाची गुरुकिल्ली वाचा सविस्तर नक्कीच होईल फायदा

सोयाबीन पिकाची यशाची गुरुकिल्ली वाचा सविस्तर नक्कीच होईल फायदा

सोयाबीन पिकाची यशाची गुरुकिल्ली वाचा सविस्तर नक्कीच होईल फायदा

सोयाबीन हे पीक नगदी पैसे देणारे आहे, पण या पिकाची नियोजनबद्ध काळजी घेतली नाही तर या तून शेतकऱ्याला आर्थिक हानीचा फटका बसतो. या आर्थिक हानीच्या फटक्या पासून बचाव करण्यासाठी या पिकाची नियोजनबध्द काळजी घेणं गरजेचं आहे.

बळीराजाचं कमी उत्पादन होण्याचे अती महत्वाचे कारणे?

१.  शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे.

२. पेरणी करता वेळेस पूरक अस अंतर न ठेवणे.

३. एकरी किंवा हेक्टरी झाडांची योग्य संख्या न राखणे.

४. बीज प्रक्रिया (Seed treatment) न करणे.

५. रोग आणि तनाचे योग्य व्यवस्थापन न करणे.

६. खत योग्य त्या प्रमाणात उपयोग न करणे, असे इत्यादी खूप कारण आहेत.

सोयाबीन पीक नियोजन

१) हवामान

जिथे सरासरी पाऊस हा ७५० ते १००० मीमी असतो अश्या भागामध्ये सोयाबीन चांगले येऊ शकते.

सोयाबीनला सरासरी तापमान २०-३०°C असल्यास उत्पादनात वाढ होते.

जर तापमान ३५°C पेक्षा जास्त असल्यास उत्पादनात काही प्रमाणात घट होतांना दिसून येते.

पीक उगवण्यासाठी किमान तापमान ३०°C आसपास असल्यास उगवण क्षमता चांगल्या प्रकारे होते.

सोयाबीन पिकाला चांगल्या प्रकारे फुलोरा लागण्यासाठी किमान तापमान हे २२-२८°C पाहिजे.

पांढऱ्या माशी करीता किमान दिवसाचे तापमान हे ३३-३४°C हे खूप पोषक राहते.

सोयाबीन जेव्हा फुलोरा अवस्थेत व शेंगा भरण्याच्या अवस्थेत या वेळी जर पाऊसच कमतरता झाली तर नक्कीच उत्पादनात घट होते.

२) जमीन :-

भारी जमिनीमध्ये सोयाबीन चांगल्या प्रकारे येते, व हलक्या जमिनीमध्ये उत्पादन कमी होते.

सोयाबीनचा लागवडीसाठी काळी व गाळाच्या निचऱ्याची जमीन उत्तम आहे.

ज्या जमिनीत साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे असते त्या जमिनीमध्ये सोयाबीन पीक चांगल्या प्रकारे येते.

पूर्वमशागत व भरखते :-

जमिनीमध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्या शेतामध्ये हेक्टरी 10 ते बारा टन टाकल्यामुळे चांगले उत्पादन होते.

जमिनीची खोल नांगरणी करून व बैला द्वारे एक दोन पाळ्या मारून जमीन भुसभुशीत होईल.

३) सुधारित वाण :-

आपल्या जमिनीचा प्रकार व पेरणीची वेळ यावरून लवकर येणारे किंवा उशिरा येणारे वाणाची निवड करावी.

जमीन मध्यम व भारी जमीन मध्ये चांगला उत्पन्न अस्या वाणाची निवड करावी.

ज्या वानाची रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे अशा वाणाची पेरणी साठी निवड करावी.

मध्यम व हलक्‍या जमिनीमध्ये जस ९३०५ हे जातीचे वाण चांगले उत्पन्न देईल.

पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे ठरते फायदेशीर

सुधारित वाणांची अधिक माहिती

१. MAUS – 61

सोयाबिन पिकातील हे वाण अधिक उत्पादन देणारे व याचे वैशिष्ट्य असे आहे याचं दर्जेदार बियाणे आहेत, इतर जातीच्या तुलनेत अधिक एकरी उत्पादन तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते

२. MAUS – 158

हे वाण हेक्टरी अधिक उत्पादन देणारे सोयाबीन वाण आहे, पिकाची काढणी वेळेस शेंगा फुटण्याचे प्रमाण सगळ्यात कमी

३. MAUS – 162

या वाणाचे वैशिष्ट्ये असे आहे की हे वाण सरळ व उंच वाढणारे ,तसेच अधिक एकरी उत्पादन देणारे वाण, काढणी यंत्राने काढण्यासाठी सगळ्यात चांगले वाण.

४. DS- 228 फुले कल्याणी

राहुरी कृषी विद्यापीठाचे हे संशोधित वाण आहे, हे एक

अधिक उत्पादन देण्याची क्षमता असणारे वाण. आणि उशिरा येणारे असून पाण्याची सोय असणाऱ्या ठिकाणी पेरणीसाठी उपयुक्त.

५. KDS-344 फुले अग्रणी

राहुरी विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट उत्पादन देणारे सोयाबीन वाण,शेंगा गळत नाहीत व रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे.

५. फुले संगम 726

राहुरी कृषि विद्यापीठाच हे एक सर्वोधिक एकरी उत्पादन देणारे वाण आहे व तसेच काढणीच्या वेळेस शेंगा न फुटणारे, ,रोगास अधिक प्रमाणात प्रतिबंधक आहे.

६. JS-9705

-हे वाण 70-75 दिवसात येणारे आहे , जास्त पाऊस , आल्यास तेव्हा पण हे वाण अधिक उत्पन्न देते.

७. JS-9305

जास्त उत्पादनासाठी व रोग व किडीस कमी प्रमाणात बळी पडणारे वान.

४) बीज प्रक्रिया :-

बीज प्रक्रिया केल्यानंतर आपले बी बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते व उगम शक्ती चांगल्या प्रकारे होते.

बीज प्रक्रिया मुळे सोयाबीनचे चार्कॉल रॉट, कॉलर रॉट तसेच इतर रोगापासून संरक्षण होते व पीक उत्पादनाला हानी होत नाही.

बीज प्रक्रिया करताना अगोदर बुरशीनाशक प्रक्रिया करू नंतर जिवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करावी.

रायझोबियम व पीएसबी बीज प्रक्रिया करण्याचे प्रमाण प्रत्येकी २५० ग्रॅम १० किलो पेरणी च्या अगोदर २-३ तास अगोदर लावून ठेवावे.

आपल्या घरचे बी असल्यास आपल्या बियाची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी उगवण क्षमता ७०% कमी असल्यास असे बी पेरणीसाठी वापरू नये.

५) पेरणी :-

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर पाऊस ७५ ते १०० मिलीमिटर पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये वापसा असताना १५ जुलै पर्यंतच पेरणी पुर्ण करावी.

१५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.

जमिनीत चांगली ओल असल्यावरच पेरणी करावी. पेरणी करून पाणी दिल्यास बियाण्याची उगवण कमी होते.

दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ते ४५ सेंमी व दोन रोपातील अंतर ५ ते ८ सेंमी याप्रमाणे पेरणी करावी. (३०८ सेंमी) किंवा (४५ x ५ सेंमी) जेणेकरून रोपांची संख्या ४ ते ४.५ लाख एवढी राहील.

सोयाबीन पिकाची पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी.

पेरणी करताना बियाणे ४ सेमी. पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.

तांबेरा प्रभावित भागामध्ये पाण्याची सोय आहे तेथे सोयाबीनची पेरणी लवकर म्हणजे १५ मे ते २० मे च्या दरम्यान करावी.

सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड ही ज्या वाणाची रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे अश्याची लागवडीसाठी निवड करावी, जस्या की फुले अग्रणी, फुले संगम या तांबेरा प्रतिबंधक वाणाची पेरणी करावी त्यामुळे हे पिक तांबेरा रोगास अनुकूल वातावरण होईपर्यंत पक्क होऊन तांबेरापासून होणारे नुकसान टाळता येते.

पावसाच्या उशीरा आगमनामुळे पेरणीसाठी उशीर झाल्यास सोयाबीनच्या हळव्या वाणांची लागवडीसाठी निवड करुन पेरणीसाठी प्रति हेक्टरी २५ टक्के जास्त बियाणे वापरावे व दोन ओळीतील अंतर ३०-३३ सें. मी. ठेवावे.

हंगामात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी सोयाबीनची पेरणी बीबीएफ यंत्राने करावी किंवा दर चार ओळीनंतर चर काढावेत.

६) पाणी व्यवस्थापन:-

सोयाबीन या पिकाची पाण्याची एकुण गरज ५०० ते ६२५ मि.मी. एवढी आहे.

सोयाबीनमध्ये रोपावस्था (२० ते २५ दिवस), फुलोरा अवस्था (३५ ते ४५ दिवस) व शेंगा भरण्याची अवस्था (५५ ते ६५ दिवस) या संवेदनशील अवस्था असून या अवस्थांमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

या अवस्था संवेदनशील असल्याने या कालावधीत १५ ते २० दिवसांची पावसाची उघडीप झाल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे

दर चार ओळीनंतर चर काढलेले असल्यास जास्तीचा पाऊस झाल्यास पाणी पिकात साचून राहणार नाही व पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल.

७) खत व्यवस्थापन :-

१. शेणखत/ कंपोस्ट खत

सोयाबीनसाठी शेणखत / कंपोस्ट खत हे जैविक खते खूप फायदेशीर ठरतात या खताची मात्रा हेक्टरी २० गाड्या म्हणजेच ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत चांगले मिसळावे. जेणेकरून आपला खर्च कमी होईल व उत्पादनात वाढेल.

२. रासायनिक खत

माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी अथवा जास्त करावी.

सोयाबीनला हेक्टरी ३० कि.ग्रॅ. नत्र ६० कि.ग्रॅ. स्फुरद + ३० कि.ग्रॅ. पालाश २० कि.ग्रॅ. गंधक पेरणीच्या वेळेस द्यावे.

पेरणी करतेवळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी दोन चाडी पाभर अथवी पेरणीयंत्राचा करावा.

प्रति हेक्टरी २० कि.ग्रॅ. गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० कि.ग्रॅ. बोरॅक्स द्यावे.

खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास १ टक्के पोटॅशियम नायट्रेटची पहिली फवारणी ३५ व्या दिवशी आणि २ टक्के पोटॅशियम नायट्रेटची दुसरी फवारणी ५५ व्या दिवशी देण्याची शिफारस करण्यात २ आलेली आहे. पेरणीनंतर नत्रयुक्त युरिया खतांचा वापर टाळावा

८) काढणी :-

सोयाबीन पिक पक झाल्यानंतर म्हणजे ८५ ते ९० टक्के पाने देठासह जमिनीवर गळून पडल्यास व शेंगांचा रंग तांबूस काळसर

होतो अशा वेळेस सोयाबीन काढणीस तयार झाले असे समजावे. सोयाबीन काढणी वेळेवरच करावी. काढणी लवकर केल्यास अपक्क दाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच काढणी उशिरा केल्यास शेंगा फुटून नुकसान होतो.

कापणीचे वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ ते १७ टक्केअसावे कापणी नंतर पिकाचे छोटे छोटे ढीग करून २-३ दिवस उन्हात चांगले वाळू द्यावे.

पिक काढल्यानंतर लगेचच ढिग लावू नये. लगेचच ढीग लावल्याने

त्यास बुरशी लागुन धान्याची प्रत निकृष्ट होते व बियांची उगवण शक्ती कमी होते.

Saurav Gaikwad

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

Related articles

4 thoughts on “सोयाबीन पिकाची यशाची गुरुकिल्ली वाचा सविस्तर नक्कीच होईल फायदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *