तुरीच्या अधिक उत्पादनासाठी करा ह्या फवारण्या होईल नक्कीच फायदा
तुरीच्या अधिक उत्पादनासाठी करा ह्या फवारण्या होईल नक्कीच फायदा
नमस्कार शेतकरी मित्रांनी मी सौरव विलास गायकवाड आज आपण बघणार आहोत तूर पिकावरील फवारणी व्यवस्थापन त्या आधी आपण तुरी बद्दल थोडी सर्व सामन्य माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या विविध कड धान्यांमध्ये सर्वात जास्त क्षेत्र हरभऱ्याचे असून त्या खालोखाल तुरीचे क्षेत्र आहे. खरीप हंगामा मध्ये तूर अत्यंत महत्वाचे पीक म्हणून ओळखल्या जाते जवळ पास २० ते २४ डिग्री सेल्सिअस तापमान या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी अनुकूल आहे. दरवर्षी महाराष्ट्रात जवळ पास १० लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर तूर पिकाची लागवड होते.
तूर पिकातील फवारणी व्यवस्थापन
तर शेतकरी बंधूंनो या वर्षी लवकरच तूर पिका मध्ये पाने गुंढाळणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे म्हणून यंदा ३ ते ४ फवारण्या घेने गरजेचे असेल. त्या कश्याप्रकारे घ्यायच्या आहे ते सविस्तर खाली दिले आहे.
तूर पिकावरील पहिली फवारणी
पहिली फवारणी ६० ते ६५ दिवसाच्या दरम्यान करावी परंतु आपण जर ती फवारणी शेंडे खुडण्याच्या तीन ते चार दिवसांनी केली तर जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी मदत होऊ शकते कारण आपल्याला या फवारणी मध्ये प्रोफेक्स सुपर ३० मिली +मोनोक्रोटोफॉस ४० मिली या कीटक नाशकांचा वापर करायचा आहे. मित्रानो जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी मोनोक्रोटोफॉस हे कीटक नाशक मदत करते व कीड नियंत्रण सुद्धा होईल.
तूर पिकावरील दुसरी फवारणी
आपल्या तूर पीक मध्ये जेव्हा फुलकळी यायला सुरूवात होईल तेव्हा दुसरी फवारणी करायची आहे. अर्थातच फुलकळी अवस्थे मध्ये. क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% w/w + १२ : ६१ : ०० या विद्राव्य खताचा वापर केल्यामुळे फुलकळी गळणार नाही व देठ मजबूत होईल . तर मित्रानो क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% w/w (हे कंटेंट एफएमसी च्या कोरजन मध्ये असते) याचा वापर का करावा ? तर या परिस्थिती मध्ये वातावरण ढगाळ असते आणि अश्या वातावरणामध्ये जास्तीत जास्त अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे आपल्याला क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% w/w या सिस्ट्मिक कीटकनाशकचा वापर करायचा आहे. क्लोराँट्रानिलिप्रोल चा वापर केल्या नंतर जवळ पास आपल्या पिका मध्ये २० ते २५ दिवस अळी येणार नाही.
तूर पिकावरील तिसरी फवारणी
या नंतर तिसरी फवारणी ७० टक्के फुल बसल्या नंतर करावी तिसऱ्या फवारणी मध्ये प्रोफेनोस या कीटक नाशकाचा वापर करावा परंतु आधी शेताचा फेर फटका मारून घ्या जर अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तरच तिसरी फवारणी करायला हरकत नाही.
तूर पिकावरील चौथी फवारणी
चौथी फवारणी २५ टक्के शेंगा भरल्या नंतर करावी कारण या परिस्थिती मध्ये अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. चौथ्या फवारणी साठी एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी या कीटकनाशकाचा वापर करा सोबतच ००:००:५० या विद्रव्या खताचा वापर करावा. हे खात दाणे भरण्यासाठी मदत करते.
तूर पिका मध्ये धुवारी नियंत्रण
धुवारी पडल्या मुळे तुरीचे फुल गळ होऊन भक्कम नुकसान होते आणि जवळ पास ५० % पर्यंत उत्पन्नात घट येऊ शकते. तर धुवारी पासून होणारे नुकसान आटोक्यात आणण्यासाठी शेतात जागो जागी शेकोट्या किंवा धुपणाचा वापर करावा सोबतच स्प्रिंकलरच्या साह्याने पाण्याचा फवारा द्यावा. बुरशीचा प्रादुर्भाव दिसल्यास बुरशीनाशकाचा वापर करावा. अश्या प्रकारे धुवारी योग्य नियोजन केल्यास आटोक्यात येऊ शकते.
शेतकरी मित्रांनो आपल्या तुर पिकाची काळजी घ्या. यंदा तुरी ला ७०००+ प्रती क्विंटल पर्यंत भाव मिळू शकतो.
हे सुध्धा वाचा “तूर पिकात हे बदलाव केल्यास नक्कीच होईल उत्पन्नात वाढ , A to Z नियोजन”
https://krushigyan.com/a-to-z-redgram-cultivation/