सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे हे जिवाणू तयार करतील शेताच्या बांधावर उत्तम दर्जेचे खत
सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे हे जिवाणू तयार करतील शेताच्या बांधावर उत्तम दर्जेचे खत
शेतकरी मित्रांनो करा आपल्या शेताच्या बांधावर झटपट खत तयार करा हजारो रुपयाची बचत होईल उत्पन्नाच्या माध्यमातून लाखोंचा फायदा. कमीत कमी वेळेमध्ये सेंद्रिय खत कशे तयार होईल हे आपण आज आपल्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.
इनोरा ही संस्था काय करते? कोणते प्रॉडक्ट आहेत या संस्थेचे
गेल्या ३० वर्षा पासून ईनोरा हि संस्था शेतकऱ्यासाठी दिवस रात्र झटत आहे. संस्थेचे वैशिष्ट म्हणजे 100% सेंद्रिय/जैविक शेतीवर आणि मातीची गुणवत्ता वाढवण्यावर भर देते. इनोरा हि महाराष्ट्रातील नामांकित संस्था आहे. तिचे सर्व प्रोडक्ट ग्रीनसर्ट प्रामाणिक आहे. म्हणजेच NPOP (National Program For Organic Production) प्रामाणिक तर आपण आज त्यातल्याच एका प्रोडक्ट बद्दल जाणून घेणार आहेत.
सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जिवाणू – इनोरा कंपोस्ट कल्चर
आज आपण इंनोराच्या कंपोस्ट कल्चर बद्दल जाणून घेऊ. शेतकऱ्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे पिकांचे राहलेल्या अवशेषांची योग्य ती विल्हेवाट लावणे. जवळ पास शेतकरी शेतातील पिकांचे अवशेष एकतर जाळून टाकतात किंवा नागरून टाकतात. तेचा आपल्या जमिनीला काहीच फायदा होत नाही उलट जाळल्यामुळे हवेचे प्रदुषणच होते. परंतु शेतातल्या काडी कचऱ्याचे जर आपण ते व्यवस्थीत कुजवून शेतात पुनर्वापर केला तर खुप फायदयाचे ठरेल. शेतातील अवशेषांमध्ये शिल्लक राहिलेले अन्नद्रव्य पुन्हा मातीत मिसळले जातील. शिवाय मातीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये बदल होऊन मातीची उत्पादकता वाढेल ज्याला आपण ‘मातीचा कस’ असे सुध्धा म्हणतो.
उदा. सोयाबिनचे, तुरीचे कुटार, कापसाच्या पाट्या, भाताचे तूस, उसाचे पाचट, धसकटे असे असंख्य शेतातील पाला पाचोळा आपण इंनोरा कंपोस्ट कल्चरच्या प्रक्रियेतून चांगल्या प्रकारे कुजवून आणि उत्तम प्रकाराचे खत आपल्या शेताच्या बांधावर तयार करू शकतो. इनोरा कंपोस्ट कल्चरमुळे शेतातील काडीकचर कुजण्यासाठी ६ महिन्या ऐवजी २.५ ते ३ महिनेच लागतील. अशाप्रकारे कमी वेळात चांगल्या प्रकारचे खत शेतकऱ्यांना मिळणार आहे. कुजवण्याची प्रक्रिया वाढवायची झाल्यास त्यावर योग्य प्रमाणात हिरवा काडीकचरा वापरल्यास ही प्रक्रिया अजून वेगवान होण्यास मदत होईल. (हिरवा काडीकचरा नसल्यास १ % युरियाचा वापर करा). शेण खत तयार करतांना इनोरा कंपोस्ट कल्चरचा वापर केल्यास शेण खत लवकर तयार होते.
तर इनोरा कंपोस्ट कल्चर विषयी सांगण्याचे झाल्यास हे सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे जिवाणू आहे. ५०० किलो कचऱ्यासाठी १ किलो इनोरा कंपोस्ट कल्चर पुरेसे आहे. ही रॅपिड कंपोस्टींग टेक्नोलॉजी इनोरा या संस्थेनी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर तुर्भे मुंबई यांच्याकडून घेतली आहे. आपण इनोरा कल्चरच्या साह्याने कचऱ्यातील सेंद्रीय पदार्थांचे जैव रसायनिक क्रियने विघटन करून ह्युमस युक्त खत तयार करु शकतो.
इनोरा कंपोस्ट कल्चर वापरण्याची पध्दत
पालापाचोळा आणि सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी ३ फूट बाय १ फूटच्या थरावर १० ग्रॅम कल्चर पसरुन किंवा १ लिटर पाण्यात मिश्रण करुन टाकावे. दर आठ दिवसांनी हे थर हलवावेत व योग्य ओलावा ठेवावा.
टिप : शेण उपलब्ध असल्यास कल्चर शेणात मिक्स करुन घातल्यास जिवाणू चांगल्या प्रकारे वाढतात व कचरा लवकर कुजतो. कंपोस्ट खताचे ढीग सावलीत रचावेत.
वापर – ५०० किलो कचऱ्यासाठी १ किलो कंपोस्ट कल्चर वापरणे.
इनोरा बायोटेक चे सर्व सेंद्रिय प्रॉडक्ट्स खालील फोननंबर किंवा लिंक वर उपलब्ध होतील.
फो. ९५५२५०३२५८
खालील लिंक वापरून हे देखील वाचा ”दीड एकरामध्ये शेतकऱ्याने घेतले तब्बल दोन लाखाचे उत्पन्न ”
https://krushigyan.com/framer-take-production-of-2-lakhs-in-1-5-acres/