कांदा पिकात मधमाशी कमी दिसते? घाबरू नका! हे उपाय करा आणि उत्पादन वाढवा

कांदा पिकात मधमाशी कमी दिसते? घाबरू नका! हे उपाय करा आणि उत्पादन वाढवा

कांदा पिकात मधमाशी कमी दिसते? घाबरू नका! हे उपाय करा आणि उत्पादन वाढवा

मधमाशी कमी असेल तर काय कराल? संपूर्ण शास्त्रीय मार्गदर्शक

कांदा बीज उत्पादन करताना अनेक शेतकऱ्यांमध्ये एक सामान्य प्रश्न असतो –

“शेतात मधमाशी कमी दिसत आहे, मग बीज उत्पादन कमी येणार का?”

सोशल मीडियावर अनेक जुगाड, गुळ–साखरेच्या फवारण्या, वेगवेगळे प्रयोग सांगितले जातात. पण प्रत्यक्षात काय खरं आहे? मधमाशी नसली तर काय करावे? जास्तीत जास्त सेटिंग आणि बी भरण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत?

या लेखात आपण पूर्ण शास्त्रीय माहिती पाहणार आहोत.

कांदा पिकाची परागीभवन रचना (Pollination Biology of Onion)

कांदा हे Cross Pollinated (परपरागीभवन) पिक आहे.

फुलाची वैशिष्ट्ये

एकाच फुलात नर (Anther/परागकोश) आणि मादी (Stigma/Gynoecium) भाग असतो. परंतु कांद्यात Self Incompatibility – Protandry स्थिती आढळते. म्हणजेच परागकोश २–४ दिवस आधी mature होतात. त्यानंतर Stigma receptive होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने Self Pollination होत नाही. परागीभवनासाठी दुसऱ्या फुलाचा पराग आवश्यक असतो. म्हणजे कांदा पिकात परागीभवन दोन वेगवेगळ्या फुलांमध्ये होते.

कांद्यात परागीभवनाची माध्यमे

मधमाशी (Honey Bees)

घरातील माशी व इतर कीटक

हवा व वाऱ्याची झुळूक

मानवी हालचाल (Manual movement)

इतर नैसर्गिक तांत्रिक घटक

मधमाशीचा रोल अत्यंत महत्त्वाचा असला तरी तीच एकमेव घटक नाही.

कांदा पिकात मधमाशी कमी का दिसते?

कांद्याची फुले पांढरी असतात (रंग आकर्षक नसतो)

Nectar मधील साखरेचे प्रमाण कमी असते

आसपास इतर जास्त आकर्षक पिके असतात

म्हणून अनेक वेळा मधमाशी कमी प्रमाणात दिसते.

मधमाशी आकर्षित करण्यासाठी उपाय

बांधावर फुलझाडे लावा

झेंडू, मोहरी, जवस, शेपू

यामुळे परागीभवन करणारे कीटक शेतात वाढतात.

पाणी व्यवस्थापन

जमीन ओलसर ठेवा

पाण्याची कमतरता होऊ देऊ नका

५–१० ठिकाणी अर्धे पाणी भरलेले छोटे माठ ठेवा

गोड स्त्रोत उपलब्ध करा

उसाचे पाचाट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा

रसवंतीतील ऊसाचे अवशेष टाका

कीटकनाशक व्यवस्थापन

मधमाशीला हानिकारक औषधे टाळा

फुलोऱ्यात सकाळी/संध्याकाळीच फवारणी करा

लेबल क्लेमनुसारच औषध वापरा

हवा आणि वाऱ्याची भूमिका

जर शेतात हवा खेळती असेल तर

वाऱ्यामुळे सुद्धा परागीभवन होते.

म्हणून पूर्ण बंदिस्त रचना टाळा.

मधमाशी नसल्यास पर्यायी उपाय

Manual Pollination (हाताने सहाय्य).

३–४ दिवसांतून एकदा पिकात चालत जा.

डेंगळे/ टोळ/ गोट हलके हलवा.

इजा होणार नाही याची काळजी घ्या.

धोतर/साडी फिरवण्याची गरज नाही.

फक्त चालणे सुद्धा पुरेसे असते.

फुलोरा अवस्थेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन

ड्रिपमधून:

0:52:34

13:40:13

सूक्ष्म अन्नद्रव्ये

फवारणी (प्रति पंप):

0:52:34 – 100 ग्रॅम

Zinc + Boron + Calcium – 30 ग्रॅम

सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 2

फायदे:

फुलगळ कमी होते, सेटिंग वाढते, बी भरघोस भरते, वजन सुधारते

बी न भरण्याची खरी कारणे

अनेक वेळा मधमाशी कमी असल्यामुळे नव्हे तर:

धुके, करपा रोग, बुरशीजन्य प्रादुर्भाव

यामुळे बीज भरण्यास अडचण येते.

उपाय:

वेळेवर बुरशीनाशक फवारणी

अन्नद्रव्य संतुलन

धुके आल्यास शेकोटी करून धूपण

जास्तीत जास्त कांदा बीज उत्पादनासाठी सुवर्णनियम

संतुलित खत व्यवस्थापन

फुलोऱ्यात योग्य फवारणी

कीटकनाशकांचा योग्य वापर

शेतात वेळोवेळी हालचाल

खेळती हवा

बुरशी नियंत्रण

हे सुद्धा वाचा…

मायकोरायझा म्हणजे काय? पिकांसाठी निसर्गाने दिलेला ‘सुपरफ्रेंड’

https://krushigyan.com/mycorrhiza-natures-superfriend-for-crops/

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/share/1FMhJ5TcHF/

 

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *