सोयाबीन वरील पिवळा मोझॅक आणि चक्रभूंगा रोगांना आना अशाप्रकारे नियंत्रणात

सोयाबीन वरील पिवळा मोझॅक आणि चक्रभूंगा रोगांना आना अशाप्रकारे नियंत्रणात

सोयाबीन वरील पिवळा मोझॅक आणि चक्रभूंगा रोगांना आना अशाप्रकारे नियंत्रणात

नमस्कार मी सौरव विलास गायकवाड कृषी ज्ञान टीम चा संस्थापक अध्यक्ष आज आपण सोयाबीन वरील प्रमुख किडी आणि त्यांची माहिती भागणार आहोत. सोयाबीन महाराष्ट्र ले प्रमुख पीक असून मागच्या पाच सात वर्ष मध्ये त्या वरील रोग व किडी वाढत आहेत.

सोयाबीन पिकाबद्दल सर्व साधारण माहिती:-

उगम :- चीन

सामाण्य नाव :- सोयाबिन

शास्त्रीय नाव :- गल्यासिन मॅक्स

गुणसूत्र अंक :- 20

सोयाबीन हे आपले महत्वाचे पीक आहे, या पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी काय केले पाहिजे ते आता आपण बघू.

सोयाबीनची पेरणी करताना खतांचा बेसल डोस खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी एकरी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट,10/15 किलो पोट्याश,10 किलो बेनसल्फ अशी खताची मात्रा पेरणी करतानाच दिली पाहिजे.

खोड किडी साठी पेरणी पासून 10 ते 12 व्या दिवशीच 50%चे क्लोरोपायरीफॉस 50 मिली, निमार्क 30 ते 50 मीली बाविस्टीन 30 ग्रॅम, सिलिकॉन स्टिकर 5 मिली अशी फवारणी केली पाहिजे.

20 व्या दिवशी तणनाशक आणि सिलिकॉन स्टिकर 5 मिली अशी फवारणी करावी.

25 व्या दिवशी

20%चे क्लोरो 50 मिली

इमामेकटींन बेंझोइट 10 ग्रॅम ,19/19/19 70 ग्रॅम

सिलिकॉन स्टिकर 5 मिली.

अशी फवारणी करावी

42 ते 45 व्या दिवशी 12/61/00 60 ग्रॅम

चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएन्ट 25 ग्रॅम

सिलिकॉन स्टिकर 5 मिली

अशी फवारणी करावी.

सोयाबीन या पिकाला वर सांगितलेल्या 4 फवारण्या वेळेवर करणे अत्यन्त महत्वाचे असते.त्याशिवाय 50 ते 80 व्या दिवसापर्यंत वेळोवेळी सोयाबीन पिकावरील बुरशी आणि अळीचे नियंत्रण करावे.

50व्या दिवशी एकरी 1 बॅग अमोनियम सल्फेट हे खत द्यावे.50 ते 55 व्या दिवशी पाऊस असला तर ठीक नाहीतर पाण्याची व्यवस्था असल्यास 1 वेळ हलके पाणी द्यावे.

यलो (पिवळा) मोझॅक:-

गेल्या 3/4 वर्षांपासून सोयाबीन वर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक येत आहे, त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. हा विषाणूजन्य रोग खूप झपाट्याने फैलतो पेरणी नंतर 25 व्या दिवशीच याची लक्षणे दिसायला लागतात,पहिले शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर दिसतात, पानांच्या कडा करड्या दिसतात ,पानाच्या शिरा गर्द हिरव्या व पान लहान राहते,आतून वाट्यांसारखे होते अशा झाडांना कवचितच शेंगा लागतात लागल्याचं तर वेड्यावाकड्या असतात व त्यात दाणे भरत नाहीत पोकळ राहतात, हळूहळू संपूर्ण झाड पिवळे पडते व शेवटी वाळून जाते.काही वेळेस पेरणीकेल्यानंतर 15/20 दिवसाचा पावसाचा खंड पडला व नंतर पाऊस पडला तर सोयाबीनचे पीक पिवळे दिसायला लागते, म्हणजे येलो मोझॅकची लक्षणे दिसायला लागतात, उपाय केले नाही तर संपूर्ण शेतात हा रोग पसरतो. हा रोग विषाणूजन्य आहे, यावर अचूक असा कोणताच इलाज अजून हि आलेला नाही. हा विषाणूजन्य रोग मुंगबिन येलो मोझॅक या विषाणू मुळे होतो, या रोगाचा प्रसार मावा आणि पांढरी माशी मुळे होतांना दिसून आले आहे, डाळ वर्गीय कडधान्ये पिके मुंग,उडीद, चवळी,मटकी, वाल ,सोयाबीन या पिकांवर पेरणी केल्यानंतर 20 व्या दिवसापासून प्रतिबंधात्मक उपाय करणे फायद्याचे ठरते.

उपाय :- 

वरील सर्व पिकात एकरी 10/15 चिकट सापळे/पॅड लावावेत.
मावा आणि पांढऱ्या माशी च्या नियंत्रनासाठी पेरणीनंतर 25 आणि 32 दिवसांनी फवारणी आवश्यक असते.

1) पहिली फवारणी 20 दिवसांनी करावी.

5 मिली इमिडक्लारप्राईड, किंवा35 मिली मोनोक्रोटोफॉस किंवा 10 मिली फॉस्फोमीडॉन
यापैकी एक

30 मिली 20%चे क्लोरोपायरीफॉस
+
15 मिली दहा हजार पीपीएम चे निमार्क
+
5 मिली सिलिकॉन स्टिकर

2)दुसरी फवारणी 30 ते 32 दिवसांनी करावी.

35 मिली ट्रायझोफॉस
+
5 मिली सिलिकॉन स्टिकर
+
15 मिली दहाहजार पीपीएम निमार्क
+
अळी असल्यास इमामेकटीं बेंझोइट 8 ग्रॅम

पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ नये म्हणून या पिकावर कोणत्याही परिस्थितीत सिन्थेठिक पायराथराईड कीटकनाशकांचा वापर करू नये

येलो मोझॅक हा विषाणू जन्य रोग आहे शेतात अशी रोगग्रस्त झाडे आढळल्यास उपटून नष्ट करावीत.
ह्या रोगामुळे पिकाचे 50 ते 90% पर्यंत नुकसान होऊ शकते.
सोयाबीन पिकात 60 दिसानंतर चक्री भुंगा आढळतो ,हा भुंगा खोडाच्या आत घुसून मुळापर्यंत खोड पोखरतो,वरील दोन फवारणी जर वेळेवर केल्या तर चक्री भुंग्यावरही नियंत्रण मिळवता येते.

अशाप्रकारे करा चक्रभुंगा व्यवस्थापन:-

दरवर्षी या किडिचा उद्रेक दिसुन येतो व या किडीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायझोफाॕस, प्रोफेनोफाॕस, लॕम्बडा साहायलोथ्रीन, किंवा आणखी काही अंतरप्रवाही किटनाशके आपण वापरतो .पण खरच हा चक्रभुंगा नियंत्रणात येतो का. आपण फवारल्या नंतर आपण एखाद्या वेळेस प्रादुर्भावग्रस्थ खोड फोडुन पाहिले का की चक्रभुंगा अळी मेली का नाही. हे आपण केव्हाच बघत नाही.

फक्त किटनाशक फवारुन समाधान मानतो. मित्रहो ही किड पानाच्या देठाच्या आत किंवा खोडाच्या आतुन खाणारी आहे तिच्या पर्यंत किटनाशक पोहचणे बहुतेक शक्य होत नाही. आता पर्यंत मी बरेच निरिक्षणे घेतली कुठलेही किटनाशक या किडीसाठी प्रभावी नसल्याचे दिसुन येते.मग काय करायचे – आधी या किडीचे नुकसान बघून घेऊ. ही किड पिक 20-25 म्हणजे 5-6 पानाचे झाल्यावर नर – मादी भुंग्याचे मिलन झाल्यावर कोवळ्या देठावर किंवा खोडावर दोन चक्र काप करुन म्हणजे करकुंडा पाडुन मादी मधात एक पिवळसर अंड घालते व लांबुन अंडी घातलेले पान किंवा खोड सुखलेले दिसुन येते.

अशाप्रकारे एक मादीभुंग तीच्या जिवनात 70-80 अंडी घालते म्हणजे तेव्हढेच झाड बाधीत करते. हे अंड 7-8 दिवसांनी उबवते व अळी तयार होऊन 3-4 दिवसांनी मुख्य खोडात सिरते (म्हणजे ती 8-12 दिवस पानाच्या देठातच असते).पुढे खोडात शिरल्यावर खोड पोखरत पिक पक्व होईपर्यंत झाडाच्या बुडापर्यंत पोहचते व परत जमिनीपासून 1-2 इंचावर काप करते व झाड सोंगनी करतांना अलगत मोडून येते. या मुळे शेंगा भरत नाही दाने बारीक होतात. आशा प्रकारे ही किड नुकसान करते. मग व्यवस्थापन कसे करायचे जसे साप बाहेर असेल तोपर्यंतच आपण त्याला पकडू शकतो किंवा मारु शकतो, एकदा का तो बिळात गेल्यावर काहिच करु शकत नाही तसेच या किडीचे आहे जो पर्यंत

अंड्यात व देठात आहे तोपर्यंतच ही किड आपण नियंत्रणात आणु शकतो ती खोडात शिरल्यावर काहीच करु शकत नाही . तेव्हा ज्या शेतक-यांची शेती कमी आहे किमान त्यांनी तरी हा प्रयोग करुन पाहायला हरकत नाही. तो म्हणजे चक्रभुंग्यामुळे सुकलेले पान करकुंड्यासह तोडुन घेऊन नस्ट करने. तुम्ही म्हणाल हे शक्य आहे का. करुन बघायला काय हरकत आहे. पट्टा पद्धत आसेल तर आणखी सोपे जाते, सुरुवात एक एकराने करा किती वेळ लागतो ते बघा. एका बाईच्या मजुरीत एक एकर होते असे दर आठवड्याला चार -पाच आठवडे पिक जरड होईपर्यत केले तर 100% चक्रभुंगा चे व्यवस्थापन होईल. करुन बघा शक्य आहे. पटल तर करा नाही तर किटनाशक फवारा.

Saurav Gaikwad

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

Related articles

2 thoughts on “सोयाबीन वरील पिवळा मोझॅक आणि चक्रभूंगा रोगांना आना अशाप्रकारे नियंत्रणात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *