राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कृषी महाविद्यालय, अकोला येथे विद्यार्थ्यांसाठी “आरोग्य जनजागृती शिबिर संपन्न”

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कृषी महाविद्यालय, अकोला येथे विद्यार्थ्यांसाठी “आरोग्य जनजागृती शिबिर संपन्न”
आरोग्य हीच आजच्या काळातील सर्वात मोठी संपत्ती – डॉ. संजय भोयर
अकोला : कृषी महाविद्यालय, अकोल येथे राष्ट्रीय सेवा योजना व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आरोग्य जनजागृती शिबिर दि. २९/०९/२०२५ ला कमिटी हॉल येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन कृषी महाविद्यालयाचे सन्माननीय सहयोगी अधिष्ठाता, प्राध्यापक डॉ. संजय भोयर सर यांनी केले, तर प्रमुख वकत्या व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील समुपदेशक डॉ. माधुरी येलणे यांनी विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना २ वेगवेगळ्या सेशन मध्ये आरोग्याविषयी जनजागृती केली. त्यांनी PPT सादरीकरणा द्वारे वेगवेगळ्या रोगाबद्दल व खासकरून HIV चे लागण कशा प्रकारे होते व ते होऊ नये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डाॅ. संजय भोयर सर यांनी आपल्या उद्घाटनपर व अध्यक्षीय मार्गदर्शना मध्ये ” विद्यार्थ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे ही काळाची गरज आहे कारण आजचे विद्यार्थी वेगवेगळ्या व्यसनामुळे आपले जीवन बरबाद करत असून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावयाचे असतील तर निर्व्यसनी राहून वाईट सवयी पासून दुर राहावे ” असे आव्हान केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग डॉ. अनिल खाडे, डॉ. नारायण काळे, डॉ. राजेंद्र वाळके, डॉ. गिरीश जेऊघाळे, डॉ. प्रिती तोडसाम, डॉ. निशांत उईके, डॉ. प्रकाश कहाते व डॉ. निलिमा पाटील इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राप्ती देवगडे, कु. अर्पिता देशमुख, अनमोल शर्मा व अभिनव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल खाडे, कार्यक्रम अधिकारी रा. से. यो. यांनी केले.
हे सुध्धा वाचा…
पावसाचा कहर: महाराष्ट्र–पंजाबमधील शेतकरी संकट व शासनाची मदत – सविस्तर माहिती
https://krushigyan.com/flood-disaster-in-maharashtra-and-punjab/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा