अद्रक/आले पिकतील सड येणाचे मुख्य कारणे व त्यावरील उपाय योजना

अद्रक/आले पिकतील सड येणाचे मुख्य कारणे व त्यावरील उपाय योजना

अद्रक/आले पिकतील सड येणाचे मुख्य कारणे व त्यावरील उपाय योजना

नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सौरव विलासराव गायकवाड आज आपण अद्रक/आले पिकामध्ये येणाऱ्या सड व बुरशीचे कशे नियंत्रण करायचे ते आपल्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

अद्रक पिकावर सड येणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंताजनक समस्या आहे, ज्यामुळे उत्पादनात घट येते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. हा रोग प्रामुख्याने बुरशी पिथियम व फ्युजॅरियम, सुत्रकृमी, किंवा  कंदमाशी यांच्यामुळे होतो पण काळजी करू नका या समस्येवर तुम्ही योग्य पावले उचलून प्रभावी उपाय करू शकता.

कंद माशी नियंत्रण

सध्या सगळी कडे अद्रक/आल्या पिकामध्ये कंद माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही माशी उघड्या गड्ड्यांमध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात आणि आल्याच्या बांडीला डंक मारून बांडी शेंड्या पासून ते बुडख्यापर्यंत वाळून जाते. असे दिसून आल्यास समजून जावे की १०० % डंक माशीचा प्रादुर्भाव आहे.

कंद माशी (नाशक माशी) हे अद्रक पिकांमध्ये विविध लक्षणे दर्शवितात. यामध्ये मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत

पानांचे रंग बदलणे: पानांवर पांढरे किंवा तपकिरी डाग दिसणे.

पानांचा कुडकुडणे: पानांच्या काठावर वाळलेल्या किंवा कुडकुडलेल्या लक्षणांचा आढळ.

कंदांचा सडणे: कंदांमध्ये गडद रंग किंवा सडलेली भाग आढळणे.

अवशिष्टांचे प्रमाण वाढणे: अद्रकाच्या कंदामध्ये गड्डा तयार होणे किंवा कुरूप होणे.

अवस्था निस्तेज होणे: पिकाची सामान्य वाढ कमी होणे.

या साठी खाली दिलेली फवारणी घ्यावी.

फेनप्रोपॅथ्रिन ३०% इ.सी. ( 30 मिली प्रती पंप) + टेबुकोनाझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन 25% w/w WG (75 WG). (१० ग्राम प्रती पंप)

कंद माशी संध्याकाळी शेतात आढळून येते त्यासाठी फवारणी संध्याकाळीच करावी जेणेकरून चांगला परिणाम झालेला दिसेल.

पिथियम व फ्युजॅरियम बुरशी नियंत्रण

पिथियम नावाची बुरशी पळणारी बुरशी असते ती आपल्या शेतात अली तर प्लॉट पाळायला सुरु करतो एका रात्र मध्ये प्लॉटला बुरशी विळखा घालू शकते इतकी हि बुरशी हानिकारक आहे . ह्या बुरशी ला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.

दुरसी बुरशी म्हणजे फ्युजॅरियम

हि बुरशी पळणारी बुरशी नसून पण तितकीच हानिकारक नुरशी आहे. पानांच्या सुकण्यास , मुलांच्या कुजण्यास आणि अखेरीस पूर्ण पिकाच्या नाशास कारणीभूत हि बुरशी ठरते. पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे किव्वा खराब निचरा असलेल्या मातितुलें हि बुरशी जोमाने वाढते.

अद्रक पिकांमध्ये बुरशी येण्याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

पानांचे वाळणे: पानांवर पांढरे किंवा तपकिरी डाग दिसायला लागतात.

कंदांचा सडणे: कंदांमध्ये गडद, नरम भाग येतात, ज्यामुळे ते सडतात.

वाढ कमी होणे: पिकाची सामान्य वाढ थांबते किंवा कमी होते.

कंदांची कुरूपता: कंदांचा आकार बदलतो आणि ते अस्वच्छ दिसतात.

गलितगात्र होणे: कंदांमध्ये सडपातळपणा येतो.

ज्या ठिकाणी सड लागलेली आहे त्या ठिकणी खालील उपाय योजना कराव्यात.

शेतात ज्या ठिकणी स्पॉट लागलेले आहेत त्या त्या ठिकाणी खाली दिलेल्या औषध घेऊन सलग दोन दिवस स्पॉट ड्रेचिंग करावी.

मेटालॅक्सिल 35% WS + कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WP + 3% बेंफेन्थ्रीन आणि 30% क्लोरोपायरीफॉस ईसी +कासुगामाइसिन 3% एसएल.

 

सुत्रकृमी नियंत्रण

सूत्रकृमी (Nematodes) हे अद्रक पिकांसाठी महत्त्वाचे नुकसान करणारे कीड आहेत. या सूत्रकृमी प्रभाव पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो. खालील माहिती सूचनात्मक आहे.

अद्रक पिकांमध्ये सूत्रकृमींची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत

कंदांची कुरूपता: कंदांवर गड्डे किंवा उंचावलेले भाग दिसतात.

वाढ कमी होणे: पिकांची सामान्य वाढ धीमी होते.

पानांचे वाळणे: पानांवर काळे किंवा तपकिरी डाग येऊ शकतात.

कंदांचा आकार कमी होणे: कंद लहान राहतात, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.

जर हे लक्षणे आढळली, तर त्वरित खाली दिलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

जर सुत्रकृमी / निम्याटोडस पहिल्या स्टेज मध्ये असेल तर आपण त्याला पेसिलोमायसिस किंवा एन्टोमोपॅथोजेनिक नेमाटोड या सारक्या बॅक्टरीस चा वापर करून सुद्धा सुत्रकृमी / निम्याटोडस प्रभावी नियंत्रण आणू शकतो.

जर मुळांन वर जास्त प्रमाणात सुत्रकृमी / निम्याटोडस आढळून आल्यास म्हणजेच तिसऱ्या स्टेज मध्ये गेल्या नंतर आपल्याला त्याला केमिकल औषध घेऊन तो प्लॉट नीट करावा लागेल त्या साठी 34.48% Fluopyrum SC  हे घटक असलेलं औषध गुणकारी आहे. औषध सोडल्या नंतर प्लॉट काही दिवस प्लॉट स्तब्ध अवस्ते मध्ये जातो प्लॉटला परत ऍक्टिव्ह करण्यासाठी NPK अपटेकिंग / सोलुब्लिझिंग बॅक्टरीया सोडाव्यात.

लेखन संदर्भ – डॉ. शिवराज कणसे ( कृषी संशोधक )

हे सुध्धा वाचा

दीड एकरामध्ये शेतकऱ्याने घेतले तब्बल दोन लाखाचे उत्पन्न

https://krushigyan.com/framer-take-production-of-2-lakhs-in-1-5-acres/

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://krushigyan.com/whatsapp-group/

अधिक माहिती साठी संपर्क – सौरव विलासराव गायकवाड (९१४५०५०४४१)

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *