“डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राज्यस्तरीय दोन मानाचे पुरस्कार”
“डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राज्यस्तरीय दोन मानाचे पुरस्कार”
समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय कर्तव्य यांचा संगम असलेल्या राज्यस्तरीय ‘आव्हाण (चॅन्सलर्स ब्रिगेड) २०२५–२६’ या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे करण्यात आले. या राज्यस्तरीय ‘आव्हान’चे उद्घाटन दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते झाले.
१७ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत चाललेल्या या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना केवळ प्रशिक्षण देण्यात आले नाही, तर संकटाच्या क्षणी पुढे उभे राहण्याची मानसिकता घडवण्यात आली. सकाळच्या सत्रात योगा, शारीरिक व्यायाम, धावणे यांसारखे कठोर प्रशिक्षण देण्यात आले,तर
दुपारच्या सत्रात स्वयंसेवकांना नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा सामना कसा करावा, याचे सखोल बौद्धिक व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. हे संपूर्ण प्रशिक्षण एन.डी.आर.एफ. (National Disaster Rescue Force) च्या अनुभवी जवानांनी प्रत्यक्ष हाताळले.
तलावातील रेस्क्यू ऑपरेशन, हृदयविकाराच्या झटक्यात CPR द्वारे जीव वाचवण्याचे तंत्र, आग लागल्यावर तात्काळ बचाव कार्य, घरगुती गॅस सिलेंडर दुर्घटना तसेच उंच इमारतींमध्ये आग लागल्यास सुरक्षित बचाव कसा करावा, ही सर्व प्रात्यक्षिके स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष अनुभवली.
या राज्यस्तरीय ‘आव्हान’ मध्ये राज्यातील २४ विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विविध कामगिरीसाठी एकूण ९ पारितोषिक होते ज्यापैकी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील, कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीने विशेष ठसा उमटवत उत्कृष्ट स्वयंसेवकाची दोन मानाची पारितोषिके मिळवली.
मुलांमधून अथर्व ताठे व मुलींमधून प्रणाली टाले यांनी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड होत ही पारितोषिके माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते स्वीकारली. ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून, विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यपद्धतीची पावती आहे.
या उल्लेखनीय यशामागे ग्रुप लीडर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल एच. खाडे यांचे काटेकोर नियोजन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले. तसेच सहयोगी अधिष्ठाता(कृ.म.अकोला) डॉ. संजय भोयार यांची प्रेरणा व दिशादर्शक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
याशिवाय विद्यार्थी कल्याण अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ समन्वयक डॉ. संदीप हाडोळे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना या राज्यस्तरीय आव्हानात सहभागी होण्याची संधी मिळाली. डॉ. देशमुख मॅडम, डॉ. तांबे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच शारीरिक तंदुरुस्तीची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळणारे धीरज जैन यांचे योगदानही विशेष उल्लेखनीय ठरले.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यस्तरावर मिळालेले हे दैदिप्यमान यश डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकीचे आणि नेतृत्वनिर्मितीच्या परंपरेचे सशक्त प्रतीक असून, संकटसमयी समाजासाठी निर्भीडपणे उभे राहणारे नेतृत्व येथे घडते, हे पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध झाले आहे. यामुळे विद्यापीठावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे सुध्धा वाचा…
मायकोरायझा म्हणजे काय? पिकांसाठी निसर्गाने दिलेला ‘सुपरफ्रेंड’
https://krushigyan.com/mycorrhiza-natures-superfriend-for-crops/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
