कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना गाजर गवत निर्मुलन बद्दल मार्गदर्शन
कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना गाजर गवत निर्मुलन बद्दल मार्गदर्शन
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अर्तंगत कृषी महाविद्यालय अकोला येथे शिकत असलेले ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अर्तंगत समीर बोरोकार, आदेश घोडके, अतुल देशमुख, यांनी ग्राम कान्हेरी सरप येथे गाजर गवत निर्मुलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले .
जबलपूर येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तण संशोधन संस्थेच्या निर्देशानुसार दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. गाजर गवतापासून मानवी आरोग्यास संभावित धोके तसेच पिकास होणारे नुकसान याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या मध्ये गाजर गवताला आपण कश्याप्रकारे नियंत्रण करू शकतो या बद्दलची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
यासाठी कृषी महाविद्यालय अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नागरे सर तसेच प्राध्यापक डॉ. गिरिश जेउघाले सर , डॉ. ठाकुर सर ,डॉ धुळे सर , डॉ. निलम कनसे मँडम, डॉ. अनिल खाडे सर, डॉ. काळे सर , डॉ. कोकाटे सर व कृषी विज्ञान केंद्र अकोला चे डॉ. ठाकरे सर , डॉ. देशमुख सर ,डॉ. तुपकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL
गोपाल उगले