जगाच्या पाठी वर पहिल्यांदाच आता रंगीत कापुस शेती मध्ये पिकणार
जगाच्या पाठी वर पहिल्यांदाच आता रंगीत कापुस शेती मध्ये पिकणार
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शोधून काढला नवीन रंगाचा कापूस सहसा आपल्याला पांढरा रंगाचा कापुस आढळुन येते किंबुहूना आपण सर्व पांढरा रंगाचा कापुस बघूनच लहान चे मोठे झालो पण आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शोधून काढला ‘खाकी’ रंगाचा कापुस विद्यापीठातील कृषीतज्ञांनी अहो रात्र मेहेनत करून खाकी रंगाच्या कापसाच्या बीज उत्पादन करण्यात त्यांना यश आले आहे. विद्यापीठाच्या वनी रंभापुर येथे ‘वैदेही ९५’ हा खाकी कापसाची जात बहरत आहे. कृषी विद्यापीठाच्या साडेबारा एकर जमिनीवर ‘वैदेही ९५’ या नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या (CICR) खाकी रंगाच्या कापूस वाणाची यावर्षी जून महिन्यात पेरणी केली. ही पेरणी यशवी रित्या पार पाडण्यासाठी कृषी विद्यापीठातील प्रत्येक कृषीतज्ञांनी मोलाचा हात भार लावला.
जवळपास १६० दिवसाच्या या पिकावर कोणत्याही किडींचा किंवा रोगाचे पेरणी पासून च्या काळात आला नसल्याचा कृषी तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे या कापसा मध्ये पांढऱ्या कापसापेक्षा अधिक रोगप्रतकारक शक्ती दिसून येते. पहिल्यांदाच झालेल्या या प्रयोगातून सुमारे ३० ते ३५ क्विंटल कापसाचे उत्पन्न भेटेल अशी अपेक्षा कृषी तज्ज्ञ डॉ. तारासिंग राठोड सांगत आहेत.
नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमधील (CICR) कृषी संशोधक डॉ. विनिता गोतमारे यांनी हे बीज रायमंडी आणि थरबेरी या रानटी कापसाच्या दोन प्रजातीचे मिश्रण करून तयार केले आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे शास्त्रज्ञ डॉ. विनिता गोतमारे सांगतात की या खाकी रंगाच्या कापसा वर प्रक्रिया करून नैसर्गिक रित्या रंगीत कापड निर्मिती करता येऊ शकते. कापूस म्हंटल की डोळ्यासमोर येतो शुभ्र पांढरा रंग मात्र आता कापसाचं नाव घेताच आणखी एक रंग डोळ्यासमोर येईल तो म्हणजे ‘ खाकी ‘ रंग तो ही पूर्ण पने नैसर्गिक रित्या हा कापुस तयार केला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे शास्त्रज्ञ डॉ. विनिता गोतमारे सांगतात.
हा रंगीत कापूस आय.सी.आर.सीडकॉट, मुंबई यांना पुरविण्यात येईल असे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कापूस शास्त्रज्ञ तारासिंग राठोड सांगतात. वैदेही ९५ या वाणाची लागवड आम्ही जून महिन्यात विद्यापिठाच्या ५ हेक्टर क्षेत्रावर आम्ही केली आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था मुंबई, (CIRCT) केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर (CICR) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खाकी रंगाच्या बीजोत्पादन घेण्यात आला आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वनी रंभापुर अकोला प्रक्षेत्रावर खाकी कापूस उत्पादनाचा हा जगातील पहिलाच प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी करून दाखविला आहे कृषी संशोधक सांगत आहेत का खाकी रंगाच्या कापुस पांढरा रंगाच्या कपसा पेक्षा दर्जेदार आणि उत्तम आहे. आता कापूस केवळ पांढरा राहिला नाही तर रंगीत कापूस उत्पादनाचे स्वप्न कृषी शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात उतरविले आहेय . या खाकी रांगाच्या आणि सेंद्रियकापूस वाणाची अकोल्यातील वनी रंभापुर प्रक्षेत्रावर पेरणी करून पहिल्या वेचातील उत्पादन काढले आहे. यातून निघणाऱ्या सरकीचे बियाणे करून पुढील वर्षी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरच 100 एकरावर या सेंद्रीय आणि रंगीत कापूस वाणाचे उत्पादन घेण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे .रंगीत कापसामध्ये विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. रंगीत कपाशीचे संशोधन आम्ही करत आहोत आणि त्यातून रंगीत कपाशीचे अजून नवीन वाण निर्मितीचा प्रयत्न विद्यापीठ करत आहे. रंगीत कापसाला अंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठा वाव असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी सांगितले.
बाजारात हा भाव राहील खाकी कापसाला :-
# रंगीत कापुस, या कापसाला मोठी मागणी असणार आहे कारण जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच रंगीत कापुस दिसेल. आंतराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खाकी रंगाचा कापसाचा ब्रँड तयार करण्याचा प्रयन्त सुरू आहे. खूप मोठा वाव असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी म्हटले. मोठ मोठ्या कापुस कंपन्या या कापसाच्या खरिदी साठी उस्तुक आहे. कारण रंगीत कापुस या आधी कधी कोणी पहिलाच नाही आणि या कापसाला घेऊन कपड्याचे नव नवीन ब्रँड तयार करून त्या ब्रँडना बाजारात आणायच्या हेतू ने कंपन्यांचा रंगीत कापसा कडे जरा जास्तच कल वाढत चालला आहे. येत्या काही दिवसात राज्य सरकार ची परवानगी मिळाली तर लवकरच या कापसा चे बीज बाजारात उपलब्ध होतील आणि सर्व साधारण शेतकऱ्याना रंगीत कापसाची शेती करायला मुभा मिळेल. या कापसाची सर्वत्र चर्चा सुरू असून हा कापुस शेतकऱ्यांन साठी जनू काही वरदानच ठरेल कारण या खाकी कापसाला पांढऱ्या कापसा पेक्षा अधिक भाव अंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक असेल.असे शेती विषेक तज्ज्ञा कडून कळत आहे.
#रंगीत कापुस
हे सुद्धा वाचा बीज प्रक्रिया का ठरते पिकांन साठी वरदान ? हे आहेत फायदे आणि पद्धत
https://krushigyan.com/methods-and-bensfits-of-seed-treatment/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL
TAGS : #रंगीत कापुस, #रंगीत कापुस, #रंगीत कापुस
I visited several websites except the audio quality for audio songs current at this web page
is actually wonderful.
Thanks
Excellent post. I was checking constantly this blog and I’m impressed!
Very helpful information particularly the last part :
) I care for such info a lot. I was seeking this particular information for a long time.
Thank you and best of luck.
Have a look at my page :: tracfone coupon
My coder is trying to convince me to move to .net from
PHP. I have always disliked the idea because of the costs.
But he’s tryiong none the less. I’ve been using WordPress
on a number of websites for about a year and am concerned about switching to another platform.
I have heard very good things about blogengine.net. Is there a way I can transfer all
my wordpress content into it? Any kind of help
would be greatly appreciated!
My web-site; tracfone special