ॲग्रोटेक -२०२५ मध्ये कृषी विद्यार्थ्यांचा उद्योजकतेकडे आत्मविश्वासपूर्ण प्रवास.
ॲग्रोटेक -२०२५ मध्ये कृषी विद्यार्थ्यांचा उद्योजकतेकडे आत्मविश्वासपूर्ण प्रवास
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अॅग्रोटेक चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७ डिसेंबर, थोर कृषी शिक्षणतज्ज्ञ व भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त या प्रदर्शनात विद्यापीठाशी संलग्न कृषी महाविद्यालय, अकोला येथील विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले.
या उपक्रमात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारून प्रत्यक्ष विक्री, ग्राहकांशी संवाद, उत्पादन सादरीकरण व व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. शिक्षणासोबतच अनुभवात्मक शिक्षण मिळावे, या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमासाठी कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. उंदीरवाडे, तसेच कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयर आणि तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा दिली. कुलगुरू डॉ. एस. आर. गडक हे स्वतः उद्योजकतेचे उत्तम उदाहरण असून त्यांनी विद्यापीठात उद्योजकता विकास मंच स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी बाजारपेठ समजून घेण्यासाठी अभ्यासदौरे आयोजित केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
“जसे ताऱ्यांना सूर्यामुळे तेज प्राप्त होते, तसेच आम्हाला आमच्या गुरूजनांच्या मार्गदर्शनामुळे प्रेरणा मिळते,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमात सहभागी झालेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांमध्ये योगेश पतंगे, प्रतीक झोडे, सृष्टिराज जगदांबे, वेदांत लोखंडे व प्रणव देशमुख यांचा समावेश आहे. या संधीमुळे आम्हाला मोठी ऊर्जा मिळाली असून ती नक्कीच विधायक व रचनात्मक कार्यासाठी उपयोगात आणू, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
अॅग्रोटेकसारख्या उपक्रमातून कृषी शिक्षणासोबतच उद्योजकतेची दिशा मिळत असून भविष्यातील सक्षम ‘अॅग्रीप्रेन्युअर’ घडविण्यात हे प्रदर्शन मोलाची भूमिका बजावत आहे.
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL
हुमणी अळी : मुळांवरील अदृश्य शत्रू – संपूर्ण मार्गदर्शन
https://krushigyan.com/white-grub-the-invisible-enemy-of-root/
