लम्पी स्किन डिसीज : गायी-म्हशींमध्ये होणारा धोकादायक आजार व त्यावरील उपाय

लम्पी स्किन डिसीज : गायी-म्हशींमध्ये होणारा धोकादायक आजार व त्यावरील उपाय
गायी-म्हशी हे शेतकऱ्यांचे मुख्य आधारस्तंभ आहेत. दूध, शेतीकाम आणि उत्पन्नासाठी या जनावरांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. परंतु अलीकडच्या काही वर्षांत भारतभर पसरलेला लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) हा आजार पशुपालकांसाठी मोठं संकट बनून उभा आहे.
या आजाराची नोंद सर्वप्रथम १९२९ मध्ये आफ्रिकेतील झांबिया येथे झाली. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरला. भारतात २०१९ मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला, तर २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांत याचा तीव्र उद्रेक झाला. हजारो जनावरं बाधित झाली आणि दूध उत्पादनात मोठी घट झाली.
१. रोगाचा प्रसार कशामुळे होतो?
->माश्या, डास, गोचीड यांच्यामार्फत.
->आजारी प्राण्यांच्या लाळ, जखमा व स्त्रावांच्या संपर्कातून.
->दूषित पाणी, चारा व गोठ्यातील साधने वापरल्यामुळे.
२. आजाराची प्रमुख लक्षणं कोणती?
->उंच ताप (104–106°F).
->शरीरावर गाठी/गुटके येणे.
->डोळे, नाक, तोंडातून स्त्राव.
->भूक मंदावणे, सुस्ती.
->दूध उत्पादन अचानक कमी होणे.
->गाठी पू भरून जखमा होणे.
->पाय व थन सूजणे, लसीका ग्रंथी फुगणे.
३. शेतकऱ्यांना होणारे आर्थिक नुकसान
->दूध उत्पादनात ३०–५०% घट.
->प्रजननावर परिणाम.
->प्राण्यांचं वजन घटणे.
->मृत्यू झाल्यास मोठं नुकसान.
४. रोगी जनावरांची काळजी आणि सुश्रुषा
पाणी पाजण्याचे योग्य नियम
->दिवसातून ५–६ वेळा स्वच्छ पाणी द्यावं.
->थंडीत कोमट पाणी द्यावं.
->इलेक्ट्रोलाईट (गुळ-मीठ पाणी) पाजावं.
->मान खाली करता येत नसेल तर उंच भांड्यात पाणी ठेवावं.
गोठ्याचा निवारा आणि स्वच्छता
->गोठा हवेशीर, स्वच्छ व कोरडा ठेवावा.
->थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट/बल्ब.
->प्राणी मऊ गादीवर ठेवावा.
पौष्टिक आहार आणि जीवनसत्वं
->पचायला सोपा व पौष्टिक चारा द्यावा.
->जीवनसत्वं A, B, C, D, E पाण्यात मिसळून द्यावीत.
५. आजारी प्राण्यांसाठी उपचार पद्धती
मिथिलिन ब्ल्यूचा वापर
->१ gm पावडर १ लिटर पाण्यात.
->मोठ्या जनावराला ३०० मिली, वासराला वजनानुसार.
->दिवसातून ३ वेळा, ४–५ दिवस.
->गाठींवर फवारणी करावी.
ताप व्यवस्थापनाचे उपाय
->अंग ओल्या फडक्याने पुसावं.
->डोक्यावर थंड पट्टी बांधावी.
->ताप कमी न झाल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधं द्यावि.
६. पाय व लसीका ग्रंथीवरील सूज कमी करण्याचे उपाय
->मीठ/मॅग्नेशियम सल्फेट टाकून गरम पाण्यात शेक.
->मॅग्नेशियम सल्फेट + ग्लीसरीन लेप.
->गरजेप्रमाणे वेदनाशामक औषधं.
तोंड, नाक आणि डोळ्यांतील व्रणांचं व्यवस्थापन
तोंड – पोटॅशियम परमँगनेट द्रावणाने धुवून बोरोग्लीसरीन.
नाक – स्वच्छ करून बोरोग्लीसरीन थेब, निलगिरी तेलाची वाफ.
डोळे – १% बोरिक द्रावण किंवा कोमट पाणी.
७. जखमांची निगा राखण्याची पद्धत
ताजी जखम – पोटॅशियम परमँगनेट + पोव्हीडोन आयोडीन.
पू भरलेल्या – मॅग्नेशियम सल्फेट + ग्लीसरीन मिश्रण भरून पट्टी.
अळ्या पडल्यास – जखम स्वच्छ करून औषधी स्प्रे.
८. घरगुती आणि देशी उपाय
हळद + तुपाचा लेप गाठींवर.
नीम पानांचा काढा जखमा धुण्यासाठी.
तुळस + गुळवेल काढा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
नीम तेलाचा धूर करून डास-माशांचा बंदोबस्त.
९. लसीकरणाचे महत्त्व
->Goatpox लस उपयुक्त.
->Lumpi-ProVacInd – खास लम्पीसाठी विकसित.
->दरवर्षी लसीकरण आवश्यक.
->निरोगी प्राण्यांना लस द्यावी, आजारींना नाही.
लम्पी स्किन डिसीज हा गायी-म्हशींसाठी जीवघेणा आजार ठरू शकतो. मात्र योग्य वेळी लसीकरण, स्वच्छता, कीटक नियंत्रण, घरगुती उपाय आणि पशुवैद्यकीय उपचार घेतले तर हा रोग नियंत्रित करता येतो. शेतकऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी तज्ञ पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
महत्वाची सूचना :
वरील सर्व माहिती शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आहे. प्रत्यक्ष उपचार करण्यापूर्वी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क – डॉ. ज्ञानेश्वर भुसारी
📞 9767364823
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा