दुष्काळ GR : महाराष्ट्रातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; पाहा तुमचा तालुका यादीत आहे का?
दुष्काळ GR : महाराष्ट्रातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; पाहा तुमचा तालुका यादीत आहे का?
महाराष्ट्र सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ (प्रथम कळ) अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती अधिकृतपणे घोषित केली आहे. पर्जन्यमानाची तुट आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन मदत व पुनर्वसन विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्हावार व तालुकावार संपूर्ण यादी (२५५ तालुके)
१. कोकण विभाग
रायगड (१): श्रीवर्धन
रत्नागिरी (३): रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर
सिंधुदुर्ग (८): सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेगुर्ला
२. नाशिक विभाग
नाशिक (१०): मालेगाव, बागलाण, कळवण, चांदवड, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा
धुळे (४): धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर
जळगाव (१५): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल
नंदुरबार (६): अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अकाणी
अहिल्यानगर (१४): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता
३. पुणे विभाग
पुणे (८): भोर, वेल्हे, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर
सोलापूर (११): उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा
सांगली (४): मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ
सातारा (६): सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर
कोल्हापूर (६): पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड
४. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग
छत्रपती संभाजीनगर (९): छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
जालना (८): बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद
बीड (११): बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी
लातूर (१०): लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट
धाराशिव (८): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा
नांदेड (१४): नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव
परभणी (९): पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
हिंगोली (५): हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत
५. अमरावती विभाग
बुलढाणा (१३): जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देूळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा
अमरावती (१४): अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर
अकोला (७): अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बारशीटाकळी
वाशीम (६): वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा
यवतमाळ (१६): यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव
६. नागपूर विभाग
वर्धा (७): वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी
नागपूर (१४): नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर
भंडारा (३): भंडारा, पवनी, लाखंदूर
गोंदिया (१): तिरोडा
चंद्रपूर (१२): चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोभुर्णा
गडचिरोली (२): गडचिरोली, चामोर्शी
बळीराजाला मोठा दिलासा: शासनाकडून मिळालेल्या १२ मोठ्या सवलती
या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी राज्य शासनाने खालील सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत
जमीन महसुलात पूर्ण सूट: दुष्काळग्रस्त भागातील जमीन महसूल माफ करण्यात येणार आहे.
पिक कर्जाचे पुनर्गठन: शेतकर्यांच्या थकबाकीदार व चालू पिकांच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाईल.
कर्ज वसुलीस स्थगिती: शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जांच्या वसुलीस तात्काळ स्थगिती.
कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत: चालू वीज बिलात सवलत लागू राहील.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाईल.
रोजगार हमी योजनेत शिथिलता: मनरेगा (रोहयो) अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू केली जातील.
पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स: आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ टँकर्स सुरू केले जातील.
वीज जोडणी खंडित न करणे: टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी कापली जाणार नाही.
अन्न धान्याची टंचाई होणार नाही: शेतकरी व शेतमजुरांना पुरेसे अन्न धान्य उपलब्ध करून दिले जाईल.
जनावरांसाठी चारा छावण्या व पाणी: पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था केली जाईल.
जलसंधारणाची कामे: जल टंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे वेगाने सुरू केली जातील
पाण्याचे नियोजन: उपलब्ध पाण्याचे टंचाई आराखड्यानुसार नियोजन केले जाईल.
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत कधी मिळणार?
शासनाने स्पष्ट केले आहे की, या २६५ तालुक्यांमध्ये सध्या पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. पीक नुकसानीचे सर्वेक्षण, जीपीएस कोऑर्डिनेट आणि छायाचित्रांसह अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष आर्थिक मदतीबाबत स्वतंत्र शासन निर्णय (GR) जाहीर केला जाईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०९२६१११७१४७१४४४१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा…
मायकोरायझा म्हणजे काय? पिकांसाठी निसर्गाने दिलेला ‘सुपरफ्रेंड’
https://krushigyan.com/mycorrhiza-natures-superfriend-for-crops/
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/share/1FMhJ5TcHF/
