कृषी महाविद्यालय अकोल्याच्या विद्यार्थ्यांन कडून बाभूळगाव यथे पशुधनाच्या लसीकरणाबाबत जनजागृती

कृषी महाविद्यालय अकोल्याच्या विद्यार्थ्यांन कडून बाभूळगाव यथे पशुधनाच्या लसीकरणाबाबत जनजागृती
कृषी महाविद्यालय, अकोला येथील RAWE 2025 च्या अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी बाभूळगावातील शेतकऱी तसेच गो पालक यांचासाठी एक महत्त्वपूर्ण लसीकरण जनजागृती उपक्रम राबवला. हा उपक्रम पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी अ , बाभूळगाव पंचायत समिती, अकोला येथे राबविण्यात आला. जातिवंत पशुधन संवर्धन, व्यवस्थापन व लसीकरण विषयी माहिती डॉ ज्ञानेश पोठे यांनी दिली.नियमित लसीकरण, पशुधनाचे संरक्षण ही काळाची गरज आहे म्हणूनच रोग येण्यापूर्वीच प्रतिबंध करने व त्यासाठी लसीकरण हेच उत्तम उपाय मानता येईल असे त्यांनी सांगितले.
जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते. दुग्धव्यवसायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जनावरांना विविध प्रकारच्या जिवाणू व विषाणूपासून संसर्गजन्य रोग होतात. या रोगांमुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटते, जनावरांची कार्य करण्याची क्षमता कमी होते व त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रत खालावते. त्यामुळे दुधव्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. जनावरांमध्ये विशिष्ट रोगांसाठी लस उपलब्ध आहे आणि अशाप्रकारची लस दिल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते. लसीकरणामुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, मात्र लसीकरणापासून मिळणारी रोगप्रतिकार शक्ती विशिष्ट कालावधीसाठी असते, त्यामुळे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करावे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.संजय भोयर सर तसेच पशुसंवर्धन व दुग्ध शाखा प्रमुख डॉ . प्रकाश कहाते व रावे समन्वयक डॉ.अनिल खाडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
या उपक्रमात गुडधी विभागाचे विद्यार्थी:
वैष्णवी चव्हाण, भाग्यश्री गायकवाड, साक्षी गाडगे, अंजली गावंडे,गायत्री गावंडे ,ईश्वरी घारडे, शामली घोडसकार, वेदांत लोखंडे, प्रसाद लोणे, वैभव ताजने सहभागी होते.
या उपक्रमामुळे गावातील शेतकऱी व गो पालक यांच्या मध्ये लसीकरण याविषयी जागरूकता निर्माण झाली व संपूर्ण शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला तसेच विद्यार्थ्यांचे हे कार्य सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरत आहे.
हे सुध्धा वाचा…..
बीज प्रक्रिया का ठरते पिकांन साठी वरदान ? हे आहेत फायदे आणि पद्धत
https://krushigyan.com/methods-and-bensfits-of-seed-treatme
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा