बीज प्रक्रिया का ठरते पिकांन साठी वरदान ? हे आहेत फायदे आणि पद्धत

बीज प्रक्रिया का ठरते पिकांन साठी वरदान ? हे आहेत फायदे आणि पद्धत
बीज प्रक्रिया का ठरते पिकांन साठी वरदान ? हे आहेत फायदे आणि पद्धत - कृषी ज्ञान

बीज प्रक्रिया का ठरते पिकांन साठी वरदान ? हे आहेत फायदे आणि पद्धत

”शुद्धबीजा पोटी फळे रसाळ गोमटी” संत तुकाराम महाराजांनी या ओवीच्या माध्यमातून शुद्ध बीजेचे महत्व सांगितले आहे. हीच ओवी स्मरणात ठेऊन आपल्याला पेरणीच्या वेळेस चांगल्या उत्पन्ना साठी बीज प्रक्रिया करायची आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सौरव विलास गायकवाड आज तुमच्यासाठी बीज प्रक्रिया म्हणजे काय, त्याची पद्धत, फायदे , प्रकार वर माहिती माझ्या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहे.

बीज म्हणजे काय ?

बीज म्हणजे बी, ज्याचे अंकुरण झाल्यावर झाडात रूपांनतर होते.

बीज प्रक्रिया म्हणजे काय ?

बीयानाचे व रोगाचे किडीपासून व रोगापासून संरक्षण करण्यासाठी व बीयानाची ऊगमक्षमता चांगली व्हावी जेणेकरून आपल्या पिकाची उगमक्षमता चांगली होईल व त्याची वाढ चांगली होऊन रोगमुक्त झाड निर्माण होईण यासाठी आपण बीजप्रक्रिया करतो.
बीज प्रक्रिया हे नेहमी पेरणीच्या आधी किंवा पेरणीच्या दिवशी केली जाते. त्यावर किटकनाशक व बुरशीनाशक आणि संजिवक याची फवारणी केली जाते. या सर्व प्रक्रियेला बीज प्रक्रिया असे म्हणतात.

बीजप्रक्रियेचे फायदे:-

१) बीज हे १००% समांतर उगते.

२) बीज हे रोग आणि किड पासून मुक्त राहते त्यामुळे रोपांची वाढ चांगली होते.

३) पीके चांगल्या प्रकारे उगवण्यासाठी मदत होते.

४) बियाण्याची उगवण क्षमता वाढते.

५)  मुळांची वाढ करून त्याचे रोगांपासून संरक्षण करते.

६)  रासायनिक खतांचा खर्च कमी होतो.

बीज प्रक्रिया कशी करावी ?

बुरशीनाशक म्यानकोझेब २-३ ग्रॅम प्रती किलो.

बीज प्रक्रिये साठी आपण कोणते बुरशीनाशके वापरू शकतो ?

एक किलो बियाण्यासाठी आपण साधारणतः ४ ग्रॅम बुरशीनाशके वापरतो.

1) थायरम हे बुरशीनाशक आपण वाटाणा, मका, गहू आणि → सोयाबीन या पिकांसाठी वापरतो, एक किलो बीयाकरीता.  2.5 ग्रॅम थायरम वापर करावा, व भुईमुगाकरीता आपण ५ ग्रॅम प्रती किलो चा वापर करावा.

2) गंधक हे बुरशीनाशक आपण ज्वारीकरीता वापरू शकतो. एका किलो करीता आपण ४ ग्रॅम पावडर वापरू शकतो.

3) कॅप्टन हे बुरशीनाशक आपण मका, भात, ज्वारी, वाटणा या करीता वापरावे. एका किली करीता २.५ ग्रॅम बुरशीनाशकाचा वापर करावा.

4) कार्बेन्डॅझिम हे बुरशीनाशक आपण करडई व सूर्यफल आणि भात या करीता 2.5 ग्रॅम प्रतिकिलो वापरावे.

 बीज प्रक्रियांचे प्रकार :-

१) जैविक बीज प्रक्रिया

२) भौतिक बीज प्रक्रिया

३) रासायनिक बीज प्रक्रिया

जैविक बीज प्रक्रिया :

1) १२५ ग्रॅम गुळाचे द्रावण एक लिटर गरम पाण्यात तयार करावे.

2) हे द्रावण थंडे झाल्यावर त्यामधे २०० ते २५० ग्रम जीवाणू मिसळावे.

3) १0 ते १२ किलो बियाण्यावर तयार केलेले द्रावण शिंपडावे.

4) शिपडल्यावर ते हलक्या हाताने बियाण्याला चोळावे.

5) पहिले बुरशी नाशकाची प्रक्रिया करावी व त्यानंतर त्यावर. रायझोबीयमचे मिश्रण लावावे.

6) ट्रायकोडर्मा ह्या जैविक बुरशीचा देखील बीज प्रक्रिया साठी वापर करू शकतो. एक किलो बियाणास जवळ पस ३० ते ४० ग्राम ट्रायकोडर्मा पावडर चोळावी

7) हे बियाणे आपण 24 तासाच्या आत वापरावे.

भौतिक बीज प्रक्रिया :-

1) प्रथम 30 ग्रम मीठ प्रात प्रती १ लीटर पाण्यात मिसळावे.

2) या पाण्यामधे बियाणे 5-10 मिनिटे बुडवावे.

3) दुषित बियाणे पाण्याच्या पृष्ठभागावर जमा झाल्यास ते काडून टाकावे.

4) रोगमुक्त बिया तळाशी जमा झालेले बियाणे, पेरणीसाठी वापरावे.

रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया:-

१) बुरशीचे घटट द्रावण तयार करावे  बियाण्यास लावावे.

२) हे बुरशीनाशक बियाण्यास व्यवस्थित पणे लावावे.

 बीज प्रक्रिया करतांना कोणती महत्वाची काळजी घ्यावी ?

1) बीज प्रक्रियेचा वेळेस वापरण्यात येणारे भांडे इतर गोष्टींकरता वापरण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.

२) हातात बीज प्रक्रियेचा वेळेस हातमोजे घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

3) बीज प्रक्रिया केलेले बियाचा जनावर व माणसाच्या खाण्याकरीता वापर करू नए नये.

४) बीज प्रक्रियेसाठी लागणारे औषधे हे दिले  त्या प्रमाणातच वापरावे. ते कमी पडल्यास रोगापासून हवे तेवढे संरक्षण मिळणार नाही.

५) ज्या बियाण्यावर प्रक्रिया केली आहे अशे बियाणे थंड व कोरड्या जागेत ठेवावे व बाब वाळवून पेरावे.

६) हे बियाणे हवाबंद डब्यामधे किंवा प्लास्टिक पिशवीत ठेऊ नये.

७) सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात औषधी लागेल याची, काळजी घ्यावी घ्यावी.

आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

https://www.facebook.com/krushiGyan?mibextid=ZbWKwL

हे सुध्धा वाचा

ह्या वाणांची लागवड करून घ्या हरभरा पीकामध्ये भरघोस उत्पादन ! संपूर्ण नियोजन

https://krushigyan.com/how-to-increase-production-in-chickpea/

Saurav Gaikwad

Saurav Gaikwad

Bsc Agri. From Dr. PDKV Akola Msc EVS. From Fergusson college Pune

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *