येणाऱ्या खरीफ हंगामात ह्या सोयाबीनच्या जाती ठरतील दुप्पट उत्पन्न देणाऱ्या
येणाऱ्या खरीफ हंगामात ह्या सोयाबीनच्या जाती ठरतील दुप्पट उत्पन्न देणाऱ्या
नमस्कार मी सौरव विलासराव गायकवाड कृषी ज्ञान टीमचा संस्थापक अध्यक्ष आज आपण सोयाबीनच्या विविध वाणांचा अभ्यास आपल्या या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत. भारतातील सोयाबीन लागवड हि देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारी एक महत्वपूर्ण कृषी क्रिया आहे . महाराष्ट्रात लागवड केल्या जाणाऱ्या काही सामान्य वाणांचा परिचय थोडक्यात खाली दिला आहे.
के डी एस -९९२ (फुले दुर्वा )
परिपकत्वा दिवस = ९० ते ९५ दिवस
उत्पन्न = २७ किलो /हेक्टर
बियाणे दर = २० ते २५ किलो / एकर
अंतर (इंच) = १८ ते २४ इंच
वैशिष्ट्ये
१.तांबेरा रोग, जांभळे दाणे , जिवाणूजन्य ठिपके मध्यम प्रतिकारक्षम.
२. मोठ्या आकाराचे दाणे.
३. हार्वेस्टरने काढता येण्यासारखे वाण.
४. उत्पन्न = १८ नेते २२ कुंटल / हेक्टर.
एम ए यू एस १६२ (MAUS 162)
परिपक्वता कालावधी = १०० ते १०५ दिवस
वैशिष्ट्ये
१. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा.
२. परिपक्वते नंतर १२ ते १५ दिवस शेंगा तडकण्यास सहनशील.
३. मूळकूज आणि खोडकूज रोगास प्रतिकारक.
४. मशीन द्वारे कापणीस योग्य.
पिडीकेव्ही अंबा (एएमएस-१००-३९)
१. हा वाण ९४ ते ९६ दिवसात काढणीकरीता परिपक्व होतो.
२. सरासरी उत्पादकता हेक्टरी २८ ते ३० क्विंटल.
३. वाणाच्या झाडाची पाने गोल अंडाकार आहेत.
४. हा वाण मुळकुज/खोडकुज या रोगास मध्यम प्रतिकारक असून चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक आहे.
जेएस- ३३५
१. परिपक्वता दिवस = ९० ते ९५ दिवस.
२. उत्पादन = १० ते १२ क्विंटल/एकर
३. बियाणे दर = ३० ते ३५ किलो/एकर
४. अंतर (इंच) = १८ ते २४ इंच
वैशिष्ट्ये
१. तांबेरा रोगास आणि चक्रीभुंगा व खोड किडीस प्रतिकारक.
२. कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या.
३. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा.
४. प्रमुख रोग आणि कीटकांवरील प्रतिक्रिया यात गर्डल बीटल आणि स्टेम फ्लाय विरूद्ध प्रतिकार आणि ओलावा तणावाच्या परिस्थितीला सहनशीलता आहे. पानांचा रंग गडद हिरवा.
५. जांभळा फुल.
एम ए यू एस 612 (MAUS 612)
हा वाण ९३ ते ९६ दिवसात काढणी करीता परिपक्व होतो.
वैशिष्ट्ये
१. विविध हवामानात तग धरणारा वाण.
२. परिपक्वतेनंतर १० ते १२ दिवस शेंगा तडकण्यास सहनशील.
३. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा.
फुले संगम (के डी एस ७२६)
१. शेंगा १०० ते १०५ दिवसात परिपक्व होतात. उत्कृष्ट उत्पादन क्षमता.
२. गंज रोगास प्रतिरोधक आणि प्रमुख कीटकांना सहनशील.
३. बीयाणे दर (किलो / एकर) २० ते २५ किलो
४. उत्पन्न-३० क्विंटल/हे.
वैशिष्ट्ये
१. तांबेरा रोगास कमी बळी पडणारा.
२. खोडमाशी किडीस, मूळकूज आणि खोडकूज रोगास माध्यम प्रतिकारक.
३. दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा.
४. खूप फांद्या व गोल आकाराचे pane
५. परिपक्वता कालावधी तेलाचा उतारा १८.४२ टक्के एवढा आहे.
सोयाबीन पिडीकेव्ही येलो गोल्ड (एएमएस-१००१)
१. या वाणाची सरासरी उत्पादकता हेक्टरी २२ ते २६ क्विंटल
२. ९५ ते १०० दिवसात परिपक्व होतो
३. या वाणाच्या झाडाला ३७ ते ५१ शेंगा लागतात.
४. पानांचा आकार टोकदार व अंडाकार आहे
५. पिडीकेव्ही येलो गोल्ड हा वाण मुळकुज/खोडकुज व पिवळा मोझक या रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
फुले किमया (के डी एस 753)
१. काढणी कालावधी = 100-105 दिवस
२. सुधारित वर्ष: 2017
३. बियाणे दर : 20 किलो प्रति एकर
४. उत्पादन: 18 ते 22 क्विंटल प्रति hectar
वैशिष्ट्ये :
१. जांभळ्या फुलांची कापणीसाठी चांगली उंची असते.
२. तांबेरा व मूळकूज रोगास कमी बळी पडतो.
३. हाताळण्यास सोपे, हलके पिवळसर तपकिरी बिया असलेले मध्यम आकाराचे, विल्ट प्रतिरोधक, कमी पावसाच्या क्षेत्रासाठी उपयुक्त, बागायती क्षेत्र, उशिरा पेरणी.
एम ए सी एस १४६० (Macs 1460)
१. परिपक्वता दिवस = ९७ दिवस.
२. उत्पन्न = ९.३ क्विंटल/एकर
३. बियाणे दर = ३० किलो/एकर
४. अंतर (इंच) १८ ते २४ इंच
५. प्रमुख रोग आणि कीटकांवरील प्रतिक्रिया इंडियन बड ब्लाइट, यलो मोझॅक विषाणू, जिवाणू पानांचे तुषार, पॉड ब्लाइट, कोळसा रॉट, टार्गेट लीफ स्पॉट आणि रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट. ऍफिड, स्टेम फ्लाय, पॉड बोअरर, व्हाईट फ्लाय, डिफोलिएटर्स, लीफ मायनर, बिहार केसाळ सुरवंट यांचा प्रतिकार.
सुवर्ण सोया (एएमएस-एमबी-५-१८)
१. वाणाची सरासरी उत्पादकता हेक्टरी २४ ते २८ क्विंटल.
२. हा वाण काढणीकरीता ९८ ते १०२ दिवसात तयार होतो.
३. सुवर्ण सोया या वाणाचे वैशिष्ठ्य म्हणजे या वाणाच्या झाड व शेंगावर दाट, तपकिरी रंगाचे केस आढळतात.
४. सुवर्ण सोया हा वाण मुळकुज/खोडकुज व पानावरील बुरशीजन्य ठिपके या रोगास प्रतिकारक आहे. तर चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक आहे.
आधुनिक शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
सोयाबीन वरील पिवळा मोझॅक आणि चक्रभूंगा रोगांना आना अशाप्रकारे नियंत्रणात
ttps://krushigyan.com/how-to-control-yellow-mosaic-virus-and-stem-borer-in-soyabean-crop/